Mumbai-Maharashtra News Updates, 07 November 2022 : महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होते. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याचबरोबर आर्थिक दुर्बलांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय आज (७ नोव्हेंबर) निकाल देणार आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती. आरक्षणासह घटनादुरुस्तीच्या वैधतेला वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलेले होते. याच याचिकांवर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठातर्फे हा निकाल देण्यात येईल, यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

20:08 (IST) 7 Nov 2022
सांगलीत राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तारांविरोधात जोडे मारो आंदोलन

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सांगलीतही उमटले. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी जिल्हा कार्यालयासमोर सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

20:03 (IST) 7 Nov 2022
नाशिकमध्ये राष्ट्रवादीतर्फे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना सुळे त्यांचा एकेरी उल्लेख करत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. सत्तारांच्या या टिप्पणीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिमध्येही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

18:21 (IST) 7 Nov 2022
कल्याण पूर्वमध्ये १३ बंगले मालक वीजचोर ; ७९ लाखाची वीज चोरी उघड

महावितरणच्या कल्याण पूर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत कल्याण पूर्व भागातील १३ बंगले मालकांनी वीज मीटरमध्ये फेरबदल करुन चोरुन वीज घेऊन विजेचा वापर केला असल्याचे उघड झाले आहे. या १३ बंगले मालकांनी ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी केली आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली. सविस्तर वाचा…

18:19 (IST) 7 Nov 2022
आता ठाण्यातही रंगणार ‘आयपीएल’चे सामने ?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने व्हावेत, यासाठी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी तयार करण्यात आली असतानाच, या क्रीडा प्रेक्षागृहात आयपीएलचे सामने होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिले. सविस्तर वाचा…

17:58 (IST) 7 Nov 2022
शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मुलीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू साथीदार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची कन्या मेघना काकडे-माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. बातमी वाचा सविस्तर…

16:55 (IST) 7 Nov 2022
ठाण्यातील महामार्गाच्या जबाबदारीचा चेंडू पालिकेने ढकलला एमएआरडीच्या कोर्टात

शहरातून जाणाऱ्या पुर्व द्रुतगती महामार्गावरील मुलूंड चेक नाका ते माजीवाड्यापर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेकडे कायमस्वरुपी हस्तांतरीत करण्यासंबधीचा निर्णय घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तसे पत्र ठाणे महापालिकेला महिनाभरापुर्वी दिले होते.

सविस्तर वाचा…

16:22 (IST) 7 Nov 2022
देव माशाच्या उलटीची विक्री करणाऱ्या आणखी एका टोळीवर कोल्हापूर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर: गेल्या आठवड्यात देव माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री करणाऱ्या एका टोळीस पकडल्यानंतर लगेचच कोल्हापूर पोलिसांनी आणखी एका टोळीचा छडा सोमवारी लावला. बातमी वाचा सविस्तर…

16:14 (IST) 7 Nov 2022
“आम्ही अल्टिमेटला घाबरत नाही; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसून तेथील काचा फोडल्या व आंदोलन सुरू केले आहे. याशिवाय सत्तारांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी अशी मागणी करत २४ तासांचा अल्टिमेटमही दिला आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. वाचा सविस्तर बातमी…

16:14 (IST) 7 Nov 2022
“२४ तासांच्या आत नाक घासून सुप्रिया सुळेंची माफी मागा, अन्यथा…”; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्टिमेटम!

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एका वृत्तवाहिनीशी बोलताना अपशब्द वापरले आहेत. यावरून आता राजकीय वातावरण चांगलच तापायला सुरूवात झाली आहे. सत्तारांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना अल्टिमेटम दिला आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:51 (IST) 7 Nov 2022
नागपूर: पालकांनो सावधान…स्कूलव्हॅनचालकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

पालकांचा मुलांशी मनमोकळेपणाने संवाद नसल्यामुळे मुले घराबाहेर झालेल्या गैरवर्तन किंवा अत्याचाराबाबत घरी बोलत नाहीत. त्यामुळे अनेक जण मुलांचा गैरफायदा घेतात. अशीच एक घटना कोराडीत उघडकीस आली असून स्कूलव्हॅनचालकाने नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढून तिच्यावर अत्याचार केला. सविस्तर वाचा…

15:47 (IST) 7 Nov 2022
राज्यभरातील टीकेनंतर अब्दुल सत्तार यांची पुन्हा शिवराळ भाषा, म्हणाले “मग त्यांना..”

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला आहे. वाचा सविस्तर

15:06 (IST) 7 Nov 2022
‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो पिंपरीत बंद पाडला, संभाजी ब्रिग्रेडचे आंदोलन

पुणे: संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपट निर्मात्यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संभाजी ब्रिग्रेड या विषयावरून आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी शहरामध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपट बंद पाडला आहे. बातमी वाचा सविस्तर…

14:54 (IST) 7 Nov 2022
बाळासाहेब ठाकरे दवाखाना संकल्पनेसाठी मुंबईत जागाच नाही; पालिका भाड्याने सदनिका घेणार

नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा देण्यासाठी पालिकेने आणलेल्या बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र योजनेअंतर्गत कंटेनरमधील दवाखान्यांसाठीही जागा उपलब्ध होत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अखेर पालिकेने नागरिकांनाच जागा भाड्याने देण्याचे आवाहन केले आहे. झोपडपट्टी परिसरात २०० ते २०००चौरस फुटाची जागा असलेल्या मालकांना पालिकेने आवाहन केले आहे. सविस्तर वाचा…

14:34 (IST) 7 Nov 2022
शिल्लक आमदार, खासदार कोठे जाऊ नयेत म्हणून मध्यावधी निवडणुकांचे भूत; श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

उध्दव बाळासाहेब ठाकरे’ पक्षातील बहुतांशी आमदार, खासदार ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात दाखल झाले आहेत. आता उरलेले आमदार, खासदार कोठे जाऊ नयेत. ते आपल्या भोवती गिरक्या घेत रहावेत यासाठी मध्यावधी निवडणुकांचे भूत उभे करण्यात येत आहे. अशी कितीही भूत उभी केली तरी इतर पक्षांसह मूळ शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत, सविस्तर वाचा…

14:30 (IST) 7 Nov 2022
अकोला: गद्दारांचे घटनाबाह्य सरकार काही महिन्यात कोसळणार; आदित्य ठाकरे

गद्दारांनी घटनाबाह्य सरकार स्थापन करून शिवसेनेसह महाराष्ट्रातील जनतेला मोठा धोका दिला. येत्या काही महिन्यात गद्दारांचे घटनाबाह्य सरकार कोसळणार, अशा शब्दात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सविस्तर वाचा…

14:28 (IST) 7 Nov 2022
पुणे: वारजे, कर्वेनगर, बाणेरचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद

पुणे: वारजे जलकेंद्र अखत्यारित गांधी भवन टाकी आणि चांदणी चौक टाकीच्या मुख्य जलवाहिनीला फ्लो मीटर बसविण्याचे काम; तसेच अन्य कामे गुरुवारी (१० नोव्हेंबर) करण्यात येणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

14:04 (IST) 7 Nov 2022
ऊस आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कोल्हापूर- सांगली महामार्गावरअंकुश संघटनेचा रास्ता रोको

कोल्हापूर : चालू गळीत हंगामासाठी उसाला 3300 रुपये दर मिळावा आणि ऊस आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर – सांगली महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. बातमी वाचा सविस्तर…

13:29 (IST) 7 Nov 2022
कोल्हापूर: ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. बातमी वाचा सविस्तर…

13:25 (IST) 7 Nov 2022
वाहन हस्तांतरण सोपे होणार ; सेवा आधारकार्डशी जोडल्यास आरटीओत जाण्याचा खटाटोप वाचणार – आठवड्याभरात सेवा

वाहन मालकांसाठी आता वाहन हस्तांतरणाची प्रक्रिया सोपी होणार आहे. सध्या ही सेवा ऑनलाईन असली तरीही कागदपत्रांची छापील प्रत काढल्यानंतर त्यावर सही करुन आरटीओत सादर करावे लागत होते. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी जाणे गरजेचे होते. त्यामुळे वाहन हस्तांतरण प्रक्रिया आधार कार्डशी जोडल्यास वाहन मालकाची सर्व माहिती त्वरित त्या-त्या आरटीओला उपलब्ध होणार आहे. सविस्तर वाचा…

13:07 (IST) 7 Nov 2022
कोल्हापूर: दत्त दालमिया कारखान्याविरोधात जय शिवराय संघटनेचे आंदोलन

पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया या खाजगी साखर कारखान्यात विरोधात ऊसदरासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेने सोमवारी आंदोलन सुरू केले.दत्त दालमिया शुगर (आसुर्ले पोर्ले) या कारखान्याने एमआरपी पेक्षा पहिली उचल कमी जाहीर करून कारखाना सुरू केलेला आहे. बातमी वाचा सविस्तर…

13:05 (IST) 7 Nov 2022
डोंबिवली : ठाकुर्लीतील जवाहिऱ्यांकडून महिलांची ११ लाखाची फसवणूक

ठाकुर्ली मधील एका जवाहिऱ्याने याच भागात राहत असलेल्या चार महिलांना तुम्ही माझ्याकडे दागिने गहाण ठेवा त्यावर मी तुम्हाला कर्ज देतो. तसेच काही महिलांकडून दागिने घडविण्यासाठी आगाऊ पैसे घेतले. या महिलांकडून दागिने ताब्यात आल्यावर वर्षभरात त्यांना कर्ज आणि दागिने नाहीच, पण मूळ ऐवज, रक्कम परत न केल्याने या महिलांनी जवाहिऱ्या विरुध्द ११ लाख ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. सविस्तर वाचा…

12:49 (IST) 7 Nov 2022
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पाकीट चोराला वाहतूक पोलिसांनी पकडले

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात वाहतूक नियोजन करत असताना शनिवारी संध्याकाळी वाहतूक पोलिसांना एका इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. या इसमाने विष्णुनगर मासळी बाजार येथील स्कायवॉक वरुन जात असलेल्या एका नोकरदाराची पाठीमागील पिशवीची चेन हळूच उघडून त्यामधील तीन हजार रुपये चोरले. सविस्तर वाचा…

12:47 (IST) 7 Nov 2022
पुणे: पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रस्त्यावर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर…

12:41 (IST) 7 Nov 2022
मुंबई : रेरा कायद्याला छेद देणाऱ्या मार्केटिंग पार्टनर्सचा सुळसुळाट

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण म्हणजेच महारेराकडे नोंदणी असल्याशिवाय इस्टेट एजंट घर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करू शकत नाही, अशी रेरा कायद्यातच तरतूद आहे. परंतु महारेराकडे नोंदणीकृत नसलेले असंख्य एजंट विविध विकासकांचे मार्केटिंग पार्टनर म्हणून वावरत आहेत. त्यामुळे विकासकांना आपल्यावरील जबाबदारी झटकणे सहज सोपे होणार आहे. सविस्तर वाचा…

12:25 (IST) 7 Nov 2022
“ज्यांच्या शेतात दोन-दोन हेलिपॅड, ते…” शिंदेंवर आदित्य ठाकरेंची टोलेबाजी, कृषीमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणाले, “लाज न बाळगता …”

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या नुकसानीचा राज्यभरात आढावा घेत आहेत. आज ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शेतीची पाहणी करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तुफान टोलेबाजी केली आहे. पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच खरे मुख्यमंत्री कोण? असा मिश्किल सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

सविस्तर बातमी वाचा…

12:17 (IST) 7 Nov 2022
“मुख्यमंत्र्यांना टोल माफी दिली जाते मग आम्हाला….”, स्वाभिमानी संघटना आक्रमक

सातारा: जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाका येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. पुणे येथे राजू शेट्टी यांच्या आंदोलनासाठी निघालेल्या वाहनांकडून टोल आकारणी केल्याने विरोध करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर…

12:16 (IST) 7 Nov 2022
कल्याण : पोलिसांच्या उपद्रवाने कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर हैराण ; भौगोलिक हद्दी शोधण्याचे डॉक्टरांना काम

रुग्णालयात जखमी, कोणी विषय पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला रुग्ण कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खासगी रुग्णालयात दाखल झाला की संबंधित रुग्णालयाला त्या रुग्णाची माहिती (मेडिकल लीग केस) तात्काळ जवळच्या किंवा तो रुग्ण ज्या भौगोलिक भागातून आला आहे. त्या पोलीस ठाण्याला रुग्णालय प्रमुखांना प्रथम द्यावी लागते.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 7 Nov 2022
जोगेश्वरी टर्मिनसच्या कामाला आठ महिन्यानंतर सुरुवात ; रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरु मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटणार

मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा भार हलका करण्यासाठी भविष्यात जोगेश्वरीत टर्मिनस बांधण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील हे तिसरे टर्मिनस उभारणीच्या कामासाठी आणखी आठ महिन्यांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. सविस्तर वाचा…

11:49 (IST) 7 Nov 2022
मोरा- मुंबई जलसेवा तीन तास बंद राहणार; बंदरातील गाळामुळे प्रवाशांचा खोळंबा

उरण : मोरा ते मुंबई या जलसेवेत सोमवारी ओहटी मुळे अडथळा निर्माण होणार असून मुंबई वरून दुपारी २ ते साडेपाच तर मोरा येथून दुपारी ३ ते ६.३० वाजेपर्यंत ही लाँच सेवा बंद रहाणार आहे. बातमी वाचा सविस्तर…

11:22 (IST) 7 Nov 2022
पुण्यात कंपनी मालकाच्या नावे दोन कोटींचे कर्ज, फसवणूक प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

पुणे : खासगी कंपनी चालविण्यास घेऊन कंपनी मालकाच्या नावावर दोन कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बातमी वाचा सविस्तर…

शरद पवार (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते.