Maharashtra News Today : सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एकीकडे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापलं आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत क्रॉसव्होटिंग होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. या बरोबरच वरळीतील हिट अँड रन प्रकरणही सध्या चर्चेत आहे.

Live Updates

Maharashtra News Today Updates and Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates Legislative Council Election Updates

19:06 (IST) 11 Jul 2024
कोल्हापूर जिल्ह्यात उन्ह पावसाचा खेळ; कुंभीकाठी सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी उन्ह पावसाचा खेळ सुरु राहिला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी आणखी चार फूट घट झाली असून पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या पाचने कमी झाली आहे. कुंभीकाठी मात्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात आज बहुतेक भागात पावसाची उघडझाप सुरु राहिली. पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस राहिला. शहरात तो हलका होता. पावसाने विश्रांती घेतल्याने हवेतील उष्मा वाढला. सायंकाळी अनेक भागात जोरदार पाऊस पडला. पावसाची गती कायम राहावी अशी अपेक्षा केली जात आहे.राधानगरी धरणातून १३२१ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याखालील बंधार्‍यांची संख्या काल २१ होती, ती आज १६ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी काल तीन फूट कमी होऊन ती आज १७ फूट २ इंच होती.

18:44 (IST) 11 Jul 2024
लाडकी बहीण योजनेसाठी शिवसेनेचे कोल्हापुरात ५० शिबिरांचे आयोजन

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली केल्यानंतर तिची काटेकोरपणे अंमलबजावणी होवून महिलांना याचा लाभ मिळावा याकरिता शहरात ५० ठिकाणी ऑनलाईन अर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा....

18:34 (IST) 11 Jul 2024
विशाळगड अतिक्रमणांबाबत दिखाऊ प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या गुरुवारच्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी जाहीर केले.

सविस्तर वाचा....

18:14 (IST) 11 Jul 2024
"विरोध आले नाही म्हणून काय झालं? सरकारने आरक्षण द्यायचं ना?", मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज बीडमध्ये पार पडत आहे. या शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. यावेळी संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली. "मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोध आले नाही म्हणून काय झालं? सरकारने आरक्षण द्यायचं ना?", असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

17:33 (IST) 11 Jul 2024
कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीच्या प्रश्नासाठी रोहित पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी आता आक्रमक झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर आंदोलनाला बसले असून जो पर्यंत यावर ठोस निर्णय होत नाही, तो पर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीचा प्रश्न फक्त एका सहीसाठी अडकला आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

17:22 (IST) 11 Jul 2024
पनवेलमध्ये २०० खाटांचे सरकारी रुग्णालय

पनवेल : पनवेल तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन आरोग्य विभागाने दिलेल्या प्रस्तावाला सरकारने बुधवारी तत्वता मंजूरी देत पनवेलकरांसाठी २०० खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याचा शासन निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

17:21 (IST) 11 Jul 2024
आयएएस पूजा खेडकर प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे विधान; म्हणाले, “दोषी आढळल्यास त्यांना…”

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी स्वतंत्र दालनाची मागणी, त्यासाठी माजी अधिकारी असलेल्या वडिलांचा वशिला, स्वतंत्र दालन, वाहन, शिपाई मिळत नसतानाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, तसेच आलिशान खासगी गाडीवर लाल दिवा लावणे. या कारनाम्याबाबत पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी थेट तक्रारींचे सविस्तर पत्र राज्य शासनाला मागील आठवड्यात पाठवले आहे. प

सविस्तर वाचा...

17:21 (IST) 11 Jul 2024
विरार अलिबाग महामार्गाच्या भूसंपादनात दलालांकरवी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार ?

पनवेल : राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यामध्ये सुरू असणार्‍या विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाच्या भूसंपादनात दलाल संस्कृती रुजवून पनवेलचे प्रांत अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी करुन सरकारचे लक्ष वेधले.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 11 Jul 2024
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एसटी बसचा अपघात, ६ प्रवाशी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

अलिबाग– शहापूर पंढरपूर एसटी बसला जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खालापूरजवळ अपघात झाला. कंटेनरने बसला धडक दिल्याने बसमधील ६ प्रवाशी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सविस्तर वाचा...

16:42 (IST) 11 Jul 2024
"महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात", शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका

"महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने बदलाच्या अनुषंगाने काही निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये ४८ खासदार आहेत. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली होती, त्यानिवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांचे फक्त ६ लोक निवडून आले होते. त्यामध्ये ४ राष्ट्रवादीचे होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत लोकांना सत्ताधाऱ्यांच्या कामाचा जो अनुभव आला तो अनुभव चांगला नाही", असं म्हणत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

16:12 (IST) 11 Jul 2024
आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अडचणी वाढणार? त्यांच्या घरी पुणे पोलीस दाखल

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्या खासगी ऑडी या गाडीवर लाल दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी पुणे पोलीस दाखल झाले आहेत. तसेच यासंदर्भात चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

15:27 (IST) 11 Jul 2024
मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील रॅलीला सुरूवात

मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये शांतता रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला सुरुवात झाली असून मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत.

15:11 (IST) 11 Jul 2024
पनवेल : महाराष्ट्र भवनासाठी सिडको १२१ कोटी रुपये खर्च करणार

पनवेल : नवी मुंबई येथील वाशी रेल्वेस्थानकाजवळील सेक्टर ३० ए येथे सुमारे ८ हजार चौरस मीटरच्या भव्य भूखंडावर सिडकोने महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून लोकसभा आणि पदवीधर निवडणूकीची आचारसंहिता संपल्यावर १२१ कोटी रुपयांची निविदा यासाठी सिडको मंडळाने जाहीर केली आहे.  

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 11 Jul 2024
वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन

खासदार वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात संदर्भात मुंबईत आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने बीकेसी पोलीस ठाण्याबाहेर कॉग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे.

15:07 (IST) 11 Jul 2024
शरद पवारांच्या सभेची पिंपरीत जोरदार तयारी; अजित पवारांचा एक गट शरद पवार गटात जाणार!

पिंपरी- चिंचवड शहरामध्ये शरद पवार यांची २० जुलैला भव्य सभा होणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची माहिती शहरात पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली. पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. वॉटरप्रूफ मंडप टाकला जात आहे.

सविस्तर वाचा....

14:56 (IST) 11 Jul 2024
मेहता पिता पुत्रांच्या आत्महत्येचे गूढ कायम, कर्जबाजारी नसल्याचा सुनेचा दावा

वसई- भाईंदर रेल्वे स्थानकात मेहता पिता पुत्रांनी आत्महत्या का केली त्याचे गूढ अद्याप कायम आहे. मेहता कुटुंबीय कर्जबाजारी असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले असले तरी आमच्यावर कसलेच कर्ज नव्हते तसेच कुठलाही तणाव नव्हता, असे मेहता यांच्या सुनेने बुधवारी पोलिसांना सांगितले. पोलिसांनाही ते कर्जबाजारी असल्याची माहिती मिळाली नाही.

सविस्तर वाचा...

14:45 (IST) 11 Jul 2024
सोलापूर : लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराने मृत्यू

सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांचे अर्ज भरताना एका अंगणवाडी सेविकेचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मोहोळ तालुक्यातील वाळूज देगाव येथे हा प्रकार घडला.

सविस्तर वाचा....

14:39 (IST) 11 Jul 2024
मुंबई उच्च न्यायालयात मागासवर्गीय आरक्षण अंमलबजावणी नाही! राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नोटीस...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयात मागासवर्गीयांच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते अंकित थुल यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला (मुंबई) नोटीस बजावली आहे.

सविस्तर वाचा

14:31 (IST) 11 Jul 2024
कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी रोहित पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी आता आक्रमक झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर आंदोलनाला बसले आहेत.

14:27 (IST) 11 Jul 2024
वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुलींसह तिघांचा अपघातात मृत्यू

मालेगाव : रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर वाहन आदळून झालेल्या अपघातात वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन मुलींसह जावई अशा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. युवती गंभीर जखमी आहे. गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ हा अपघात झाला.

सविस्तर वाचा....

14:24 (IST) 11 Jul 2024
"विधानसभेला महाविकास आघाडी २२५ जागा जिंकेल", शरद पवारांचं विधान

विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी तयारीही सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जागावाटपाची तयारीही सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीत २२५ जागा निवडून येतील, असं म्हटलं आहे.

14:22 (IST) 11 Jul 2024
माहिती अधिकारात प्रसूतीची आकडेवारी चुकवली! नागपूर महापालिका म्हणते...

नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे माहितीच्या अधिकारात महापालिकेच्या रुग्णालयात किती प्रसूती झाल्या याबाबतची माहिती मागण्यात आली होती. त्यावर दिलेल्या उत्तरात आरोग्य विभागाने प्रसूतींची आकडेवारीच चुकवली आहे.

सविस्तर वाचा

14:08 (IST) 11 Jul 2024
पालघर, अलिबाग एमएमआरडीएकडे! विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

मुंबई: मुंबई, ठाणे या क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना आर्थिक चणचण सोसत असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता पालघर, अलिबागमध्येही कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार आहे. पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचा शासननिर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 11 Jul 2024
मुंबई: फसवणूकप्रकरणी दाम्पत्याविरोधात गुन्हा

मुंबई : पैसे दामदुप्पट करण्याचे आमीष दाखवून ४४४ जणांची २० कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रईसा खान पूनावाला उर्फ रईसा बेग आणि पती मुस्तफा बेग यांनी सुमारे ९० दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून आणखी ५६ जणांची सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 11 Jul 2024
‘एमएमआरडीए’कडून विकासकामांना सुरुवात; पालघरमध्ये ११०० कोटींच्या रस्तेकामांसाठी निविदा

मुंबई : पालघर तालुक्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती होताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पालघरमध्ये विकासकामे सुरू केली आहेत. याअंतर्गत एमएमआरडीएने पालघरमधील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी चार रस्ते प्रकल्प हाती घेतले असून ११०० कोटी रुपये खर्चाच्या कामांसाठी बुधवारी निविदाही प्रसिद्ध केल्या आहेत.

सविस्तर वाचा

14:05 (IST) 11 Jul 2024
पवईत मगरीच्या पिल्लाच्या विक्रीचा प्रयत्न; आरोपी अटकेत

मुंबई : मुंबईतील पवई येथे मगरीच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला वन विभागाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी  अटक केली. दरम्यान, आरोपीने तस्करी केलेले मगरीचे पिल्लू आयआयटी पवई परिसरात विक्रीसाठी आणले होते.

सविस्तर वाचा

14:04 (IST) 11 Jul 2024
पालघर, अलिबाग एमएमआरडीएकडे! विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

मुंबई: मुंबई, ठाणे या क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना आर्थिक चणचण सोसत असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता पालघर, अलिबागमध्येही कोट्यवधींचे प्रकल्प राबवणार आहे. पालघर, वसई, अलिबाग, पेण आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचा शासननिर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे.

सविस्तर वाचा

14:00 (IST) 11 Jul 2024
सात लाखाची लाच मागणाऱ्या कल्याणमधील पोलिसावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा

एका गुन्ह्याच्या प्रकरणात एका तक्रारदाराकडून सात लाख रूपयांची लाच मागणारा आणि तडजोडीने पाच लाख रूपये स्वीकारण्यास तयार झालेला कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार सुचित निवृत्ती टिकेकर (४०) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने भ्रष्टाचार प्रतिबंंधक कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

13:42 (IST) 11 Jul 2024
माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटात प्रवेश

विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. आता भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

12:17 (IST) 11 Jul 2024
भाजपाला धक्का! माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा सदस्यत्वाचा राजीनामा

विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. आता भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आज भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सुधाकर भालेराव हे लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच एनडीए सरकार २३ जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Mamata Banerjee Meet Sharad Pawar

ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार आहेत.

Story img Loader