Maharashtra News Today : सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एकीकडे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. तर दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापलं आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत क्रॉसव्होटिंग होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. या बरोबरच वरळीतील हिट अँड रन प्रकरणही सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today Updates and Maharashtra Assembly Monsoon Session 2024 Live Updates Legislative Council Election Updates

11:32 (IST) 11 Jul 2024
“महायुतीने त्यांचे आमदार सांभाळावे”, संजय राऊतांचा इशारा

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं असून आमदारांचे क्रॉसव्होटिंग होऊ नये, यासाठी सर्वच पक्ष काळजी घेत आहेत. यावर संजय राऊत यांनी महायुतीला सूचक इशारा दिला आहे. “महायुतीने त्यांचे आमदार सांभाळावेत”, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.

10:57 (IST) 11 Jul 2024
“शेकापचे जयंत पाटील यांची विकेट जाणार”, आमदार महेंद्र दळवींचं मोठं विधान

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठं विधान केलं आहे. “विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांची विकेट जाणार आहे”, असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.

10:45 (IST) 11 Jul 2024
विधानपरिषदेच्या निवडणुकीचं राजकारण तापलं, सर्वच पक्षांचे आमदार हॉटेलमध्ये मुक्कामी

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापलं आहे. विधानपरिषदेच्या ११ उद्या १२ जुलै रोजी निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्या आमदारांचे क्रॉसव्होटिंग होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्यावतीने आपल्याकडे संख्याबळ पुरेसं असल्याचा दावा करत आपले उमेदवार निवडून येतील, असं सांगण्यात येत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच एनडीए सरकार २३ जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्वाची मानली जात आहे.

ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार आहेत.