Mumbai News Today : देश आणि राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करावा अशी मागणी घेऊन सध्या शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे कूच करत आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हजारो पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे सध्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. यासह अशाच प्रकारच्या सर्व घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra News Today 14 February 2024 : महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लीकवर...

16:35 (IST) 14 Feb 2024
पक्षश्रेष्ठींचे आदेश; काँग्रेसचे आमदार मुंबईत दाखल!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षत्याग केल्याने हादरलेल्या काँग्रेसने ‘डॅमेज कंट्रोल’ चे प्रयत्न सुरू केले आहे.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 14 Feb 2024
चला खरेदीला, सोने निच्चांकी पातळीला…

हे दर गेल्या काही महिन्यांची आकडेवारी बघितली तर निच्चांकीवर असल्याचे दिसत आहे.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 14 Feb 2024
पिंपरी: वाकडमध्ये वाकलेली इमारत अखेर जमीनदोस्त

पिंपरी : दाट लोकवस्ती असलेल्या वाकड भागात बांधकाम करण्यात येत असतानाच वाकलेली इमारत अखेर महापालिकेने पाडली. दरम्यान, धोकादायक काम केल्यामुळे विकासकाला नोटीस दिली जाणार आहे. पाडण्याचा खर्च वसूलही केला जाणार आहे.

सविस्तर वाचा...

15:57 (IST) 14 Feb 2024
माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी भाजपच्या राज्यसभा उमेदवार; कुलकर्णी यांचे पुनर्वसन

पुणे : राज्यसभेची उमेदवारी हे पक्षनिष्ठेचे फलित आहे, अशा शब्दात मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कोथरूडच्या माजी आमदार प्रा. कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 14 Feb 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही- अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांचेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. तसा प्रश्नच उपस्थित होत नाही. ही चर्चा जाणूनबुजून पेरण्यात आली आहे. काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे. आम्हाला लवकरात लवकर निवडणूक चिन्ह मिळायला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे.

15:17 (IST) 14 Feb 2024
आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी, तळोजा तुरूंगात रवानगी

कल्याण – कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना बुधवारी सकाळी उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यासह सहकारी पाचही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गायकवाड आणि आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

वाचा सविस्तर...

14:33 (IST) 14 Feb 2024
VIDEO : ‘नयनतारा’ पडली प्लास्टिक बाटलीच्या प्रेमात! ताडोबातील जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यावरून पाणी न पिता बाटली घेऊन परतली…

वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 14 Feb 2024
सावधान! ‘स्वाईन फ्लू’ पुन्हा परतला, ‘या’ शहरात गेले दोन बळी

उपचारानंतरही दोघांची प्रकृतीत खालावतच असल्याने त्यांना नातेवाईकांनी मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 14 Feb 2024
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमध्ये निदर्शने

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतोय. असे असताना आता संभाजीनगरमध्ये त्यांच्या सनर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.

13:36 (IST) 14 Feb 2024
भंडारा : दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, काय आहे कारण जाणून घ्या…

दलालांना पैसे देण्यास असमर्थ असलेल्या दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी आज सकाळी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

सविस्तर वाचा...

13:34 (IST) 14 Feb 2024
मुंबई : शिवनेरी अटल सेतूवरून चालवण्याचा विचार

मुंबई : अटल सेतूवरून आता मुंबई-पुणे एसटी (शिवनेरी) सुरू करणे विचाराधीन असून मुंबईतच बसमध्ये ४५ प्रवासी बसल्यास अटल सेतूवरून एसटी पुणे गाठणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे शिवनेरी बसने प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

वाचा सविस्तर...

13:20 (IST) 14 Feb 2024
मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी मेट्रो धावली

मकर संक्रातीचा सण संपून महिना लोटला आहे. आकाशात पतंगांचा वावर कमी झाला असला तरी मांजा मात्र जागोजागी अडकला आहे.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 14 Feb 2024
खारघर-तुर्भे १० मिनिटांत! लिंक रोड भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात

पनवेल : अवघ्या दहा मिनिटांत पार करता येईल असा खारघर-तुर्भे लिंक रोड (केटीएलआर) च्या कामास लवकरच सुरुवात होणार असून यासंदर्भातील कार्यादेश संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.

सविस्तर वाचा...

13:15 (IST) 14 Feb 2024
खासगी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी तरूणाला मध्यप्रदेशातून अटक

मुंबई : आंतरराष्ट्रीय ट्रेडिंगच्या नावाखाली खासगी बँकेच्या व्यवस्थापकाची साडेपाच लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका तरूणाला अटक केली. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

वाचा सविस्तर...

13:14 (IST) 14 Feb 2024
पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळच्या पत्नीला धमकी देणाऱ्या आरोपीचे ससूनमधून पलायन…दोन पोलीस निलंबित

पुणे : ससून रुग्णालयातून आरोपी पसार झाल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस शिपाई निखिल अरविंद पासलकर, पोलीस शिपाई पोपट कालूसिंग खाडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

सविस्तर वाचा...

13:13 (IST) 14 Feb 2024
पनवेलकरांची पाणी टंचाईची समस्या निकालात निघणार…

पनवेल : अपु-या पाणी पुरवठ्यामुळे पनवेलकरांना तब्बल सहा महिने आठवड्यातील एक दिवस पाण्याविना कोरडा पाळावा लागतो. मागील दोन वर्षांपासून हीच पद्धत रुजली आहे. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विविध कामांना गती मिळाली.

सविस्तर वाचा...

13:00 (IST) 14 Feb 2024
नागपूर : कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीशी लग्न करणाऱ्या प्रियकरावर तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात तो दोन महिने कारागृहात होता.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 14 Feb 2024
नाशिक : शहरातील चार स्थानकांतून बससेवेचे नियोजन

नाशिक : शहरातील अद्ययावत मेळा स्थानकातून बससेवा सुरु झाली असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेळा स्थानक, नवीन सीबीएस, जुने सीबीएस आणि महामार्ग स्थानकावरून सुटणाऱ्या मार्गनिहाय बससेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

12:32 (IST) 14 Feb 2024
“ये दिल मांगे…” व्हॅलेंटाईन डेनिमित्त अकोल्यात झळकले वंचितचे रेड बॅनर; राजकीय संदेश की…

महाराष्ट्रात पक्षांतराच्या राजकारणाने जोर पकडला असतांना ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने लाल रंगात केलेल्या फलकबाजीने लक्ष वेधून घेतले आहे.

सविस्तर वाचा...

12:25 (IST) 14 Feb 2024
चंद्रपूर जिल्ह्याची ‘आर्थिक वाहिनी’ बंद होण्याच्या मार्गावर, जाणून घ्या कारण…

जिल्ह्याची ‘आर्थिक वाहिनी’ अशी ओळख असलेली बल्लारपूर पेपर मिल कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर वाचा...

12:25 (IST) 14 Feb 2024
बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार; ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना

जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण वाढले असतानाच अशाच एका घटनेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 14 Feb 2024
उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

https://twitter.com/ANI/status/1757649269660520778

12:11 (IST) 14 Feb 2024
शिळफाटा उड्डाणपुलावरील पनवेल मार्गिकेचे लोकार्पण, जेएनपीटीसह ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार

ठाणे : ठाणे, पनवेल आणि जेएनपीटी भागातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिळफाटा रस्त्यावर उड्डाणाची उभारणी करण्यात आली असून या पुलावरील पनवेल मार्गिकेचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण झाले. यानंतर ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली झाली आहे.

वाचा सविस्तर...

12:06 (IST) 14 Feb 2024
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात…‘सीबीआय’चा युक्तिवाद संपला

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अंतिम युक्तिवादास सुरुवात करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

12:04 (IST) 14 Feb 2024
पनवेलमधील भारतनगर झोपडपट्टीत राहणा-या बांगलादेशीय नागरिकांना ताब्यात घेतले

पनवेल : पनवेल शहरात बांगलादेशी नागरिक अवैध वास्तव्य करत असल्याची तक्रार पोलिसांकडे लेखी स्वरुपात सकल हिंदू संघटनेने केली होती. पोलिसांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत तातडीने सर्वत्र शोधमोहीम हाती घेतल्यावर चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

12:00 (IST) 14 Feb 2024
गडचिरोली लोकसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या; आमदारांपाठोपाठ माजी मंत्र्याच्या भावाचाही दावा

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने विविध पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मात्र, यंदा उमेदवारीकरिता काँग्रेससह भाजपमध्ये देखील टोकाची स्पर्धा पाहायला मिळत आहे.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 14 Feb 2024
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी

काँग्रेसकडून उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. राजस्थानमधून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंगवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

11:33 (IST) 14 Feb 2024
पिंपरी : महापालिकेची ११०० जाहिरात फलकधारकांना नोटीस; दिला ‘हा’ इशारा

पिंपरी : महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील ११०० जाहिरातफलकधारकांना (होर्डिंग) थकीत शुल्क भरण्यासाठी नोटीस दिली आहे.

सविस्तर वाचा

11:13 (IST) 14 Feb 2024
पिंपरी- चिंचवड : बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत झुकली; नागरिकांची धावपळ!

पिंपरी- चिंचवडमध्ये बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत अचानकपणे झुकल्याने रात्री एकच खळबळ उडाली.

सविस्तर वाचा...

11:12 (IST) 14 Feb 2024
विदर्भातील या आमदारांनी स्पष्टच सांगितले, “होय आम्ही…”

अशोक चव्हाण यांच्या पक्षपवेशाला भाजपचा एकही दिल्लीतील वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता.

सविस्तर वाचा...

Mumbai Maharashtra News Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह

Story img Loader