Mumbai News Today : देश आणि राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करावा अशी मागणी घेऊन सध्या शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे कूच करत आहेत. या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हजारो पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे सध्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. यासह अशाच प्रकारच्या सर्व घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर…
Maharashtra News Today 14 February 2024 : महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लीकवर…
जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे पुन्हा एकदा मनसेच्या वाटेवर आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला. ते आता मनसेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सामना या शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्रात याच अशोक चव्हाण आणि भाजपाचा समाचार घेण्यात आलाय. शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटविण्याचे काम फडणवीस-मोदी यांना करावे लागतेय. भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे! शहीद भाजपला माफ करणार नाहीत!, अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरु केलं आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे अशी माहिती समोर आली आहे. कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. सगेसोयऱ्यांसाठीच्या कायद्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा