Marathi News Updates, 08 October 2024: आज एकीकडे जम्मू-काश्मीर व हरियाणा निवडणुकांचे निकाल लागत असताना दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष व शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी त्यांच्या पक्षाचे पहिले उमेदवार जाहीरदेखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असून दुसरीकडे आघाड्यांचं जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 08 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी...

18:58 (IST) 8 Oct 2024
नाटयमय घडामोडीनंतर रितिका मालू पोलीस कोठडीत...सीआयडीने थेट कारागृहात पोहोचून...

नागपूर : रामझुला ‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी रितिका मालू हिला पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी दिली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास तहसील पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. यानंतर वेगाने घटना घडल्या आणि अखेर रितिका हिला अटक करण्यात यश आले.

सविस्तर वाचा

18:49 (IST) 8 Oct 2024

Uddhav Thackeray on CM Post: मुख्यमंत्रीपदाची इच्छा आहे का? उद्धव ठाकरे म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, माझा त्याला पाठिंबा असेल. कारण मुळात मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे. मला महाराष्ट्राचं हित साधायचं आहे. मला अशी कोणतीही वेडीवाकडी स्वप्नं पडत नाहीयेत की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन वगैरे. अरे तेव्हाच यायचं नव्हतं तर मी पुन्हा कशाला येईन? - उद्धव ठाकरे</p>

18:28 (IST) 8 Oct 2024
नवी मुंबई विमानतळावर वायू दलाच्या लढाऊ विमानाची चाचणी लवकरच

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवर वायुदलाच्या लढाऊ विमान उड्डाण चाचणीसाठी जोरदार तयारी विमानतळावर सूरू आहे. ११ आॅक्टोबर म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

सविस्तर वाचा

18:26 (IST) 8 Oct 2024
नाशिक: अल्पवयीन मुलास उलटे टांगून मारहाण करणारा पिता अटकेत

नाशिक – आजारी सहा वर्षीय मुलाच्या औषधोपचारावर जास्त खर्च होत असल्याने संतप्त पित्याने संबंधितास घराच्या छताला उलटे टांगून १० ते १५ मिनिटे बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयित पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा

17:09 (IST) 8 Oct 2024
पिंपरी : अखेर तीन महिन्यांनी अजितदादांच्या पक्षाला बालेकिल्ल्यात मिळाला शहराध्यक्ष; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादीला (अजित पवार) पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळणार आहे. विधानपरिषदेची आमदारकी मिळावी यासाठी इच्छुक असलेले माजी महापौर, माजी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडेच पुन्हा शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचे निश्चित झाले आहे. सविस्तर वाचा…

17:08 (IST) 8 Oct 2024
पुणे : भीक मागण्याचा बहाण्याने चोरी करणारी तरुणी गजाआड, ३५ लाखांचे दागिने जप्त; चंदननगर पोलिसांची कारवाई

भीक मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरणाऱ्या तरुणीला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेबरोबर चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

17:08 (IST) 8 Oct 2024
"मी त्यांना दुखवून कुठलाही निर्णय घेणार नाही", उमेदवार निवडीवरून काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे घेत आहेत. सविस्तर वाचा…

16:33 (IST) 8 Oct 2024
Devendra Fadnavis: जे हरियाणात घडलं, तेच महाराष्ट्रात घडेल - फडणवीस

हरियाणात जे घडलं, तेच महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे. हरियाणात गेल्या निवडणुकीत भाजपाला ४० जागा मिळाल्या. लोकसभेत १० पैकी ५ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला थेट ५० जागा मिळत आहेत. जवळपास ६० वर्षांनंतर पहिल्यांदा एक पक्ष सतत तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे - देवेंद्र फडणवीस</p>

16:32 (IST) 8 Oct 2024
Devendra Fadnavis on Haryana Election Results: आम्हाला हरवण्याची ताकद कोणत्याही विरोधी पक्षात नव्हती - देवेंद्र फडणवीस

लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी म्हणालो होतो की आम्ही विरोधी पक्षाकडून हरलो नाही. आम्हाला हरवण्याची ताकद कुठल्याच विरोधी पक्षात नव्हती. आम्हाला अपप्रचार या चौथ्या पक्षानं हरवलं. लोकसभेत भाजपाच्या काही जागा या अपप्रचारामुळे कमी झाल्या - देवेंद्र फडणवीस</p>

16:18 (IST) 8 Oct 2024
नागवडे कारखाना येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ११-७२ कोटी जमा करणार.; शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना सन 2023- 24 या गळीत हंगामात गाळप केलेल्या ५ लाख ८५ हजार ४७० मे. टनाकरिता प्रती मे.टन २०० रुपये प्रमाणे ऊस प्रोत्साहन अनुदान म्हणून सुमारे ११ कोटी ७२ लाख रुपये येत्या 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली . नागवडे कारखान्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

श्री नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2023 -24 या गळीत हंगामात पाच लाख 85 हजार 470.576 मे टन उसाचे गाळप केले असून सदर उसाच्या संपूर्ण एफ.आर.पी.सह प्रति मे.टन रुपये 2700 याप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा केलेला आहे. गळीत हंगाम सुरू करताना व कारखान्याच्या वार्षिक सभेत जाहीर केल्याप्रमाणे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता गळीतास आलेल्या उसाचे द्वितीय पेमेंट दोनशे रुपये प्र. मे. टन याप्रमाणे 11 कोटी 72 लाख रुपये 20 ऑक्टोबर चे दरम्यान सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. असे सांगून नागवडे म्हणाले की, मागील गळीत हंगामात कारखान्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषत: ऊसतोड मजूर कमी आल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु यावर्षी अशी अडचण येणार नाही याची दक्षता घेत आहोत.

16:01 (IST) 8 Oct 2024
गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू

मुंबई : गोवंडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या एका नऊ वर्षांच्या मुलाला मंगळवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या कचरावाहू ट्रकने धडक दिली. या अपघातात सदर मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कचरावाहू ट्रकची तोडफोड केली. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली.

सविस्तर वाचा

15:46 (IST) 8 Oct 2024
Ajit Pawar Slams Opposition: अजित पवारांची लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका

इतके दिवस विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. आता त्यांचे काही बगलबच्चे सांगतायत की आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारच होणार नाहीत. आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. ए शहाण्या सांगणाऱ्या.. तू अर्थमंत्री आहेस का मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे की माझ्या हातात आहे? का उगीच खोटं बोलतो? आज लोकांसमोर जायला यांना तोंड नाही, चेहरा नाही. म्हणून लोकांना हे असलं काहीतरी सांगतात. लोकसभेला जसं तुमची दिशाभूल केली, तसंच आताही केलं जात आहे - अजित पवार</p>

15:40 (IST) 8 Oct 2024
निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

नाशिक - आगामी विधानसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्यातील २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांच्यासह पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत विशेष प्रशिक्षण दिले.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 8 Oct 2024
स्थानिकांना काम द्या या मागणीसाठी उरणच्या खाजगी बंदरातील कोळसा वाहतूक बंद; स्थानिक लॉरी मालक संघटनेचे आंदोलन सुरू

उरण येथील खाजगी बंदरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीचे काम स्थानिक वाहन मालकांना मिळावे या मागणीसाठी मंगळवारी कोळसा वाहतूक बंद करीत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जो पर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार  असल्याचे मत पनवेल उरण लॉरी मालक संघाचे अध्यक्ष संतोष घरत यांनी व्यक्त केले आहे.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 8 Oct 2024
नाशिक: कांदा भरलेल्या ट्रॅक्टरची चोरी

नाशिक - सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांद्याची चोरी होऊ लागली असून देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडीतून कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली चोरीस गेली आहे. याविषयी देवळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

15:03 (IST) 8 Oct 2024
नागपुरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

नागपूर : विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच उपराजधानीत मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

सविस्तर वाचा....

14:37 (IST) 8 Oct 2024
त्रिंबकमध्ये केरळच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांविरुद्ध स्थानिकांचा रोष

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी परिसरात फिरणाऱ्या केरळमधील काही अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. स्थानिकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

वाचा सविस्तर...

14:34 (IST) 8 Oct 2024
नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी शहरातील वास्तूविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्याचे रेल्वे विभागाने निश्चित केले आहे.

वाचा सविस्तर...

14:34 (IST) 8 Oct 2024
कल्याण-डोंबिवलीत भरधाव वाहनाच्या धडकेत विद्यार्थीनीसह तरूण गंभीर जखमी

कल्याण : कल्याण, डोंबिवलीत दोन वेगळ्या घटनांमध्ये मोटारींनी दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणमधील अपघातात एक शाळकरी विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली.

वाचा सविस्तर...

14:13 (IST) 8 Oct 2024
आमची दैना पोलिसांची व्यथा; अनिश्चित कर्तव्याच्या कालावधीचा मुद्दा ऐरणीवर...

सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर पहारा देणाऱ्या पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या. पण त्या कागदावरच राहिल्या आहेत. राज्यातील सुमारे दोन लाख पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य, घराचे प्रश्न याबाबत योग्य नियोजन आवश्यक आहे. सविस्तर वाचा…

13:42 (IST) 8 Oct 2024

Rohit Pawar Targets DCM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना रोहित पवारांचा इशारा!

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब , वैद्यकीय शिक्षण खात्याने ६८३० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिली असून स्मार्ट सर्व्हिसेस, क्रिस्टल, BVG या तीन कंपन्यांना काम देण्यात आले आहे. यापैकी स्मार्ट सर्व्हिसेस ही हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित तर क्रिस्टल ही आपले लाडके आमदार प्रसाद लाड यांची कंपनी आहे. आपल्या कृपेने या कंपन्यांना २०% सर्व्हिस चार्ज म्हणून वर्षाला ४० कोटी रुपये सरकार देणार आहे. गेल्या वर्षी आपण पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरती रद्द करत असल्याची घोषणा केली होती आणि आता मात्र आपण आपल्या ‘लाडक्या’ सहकाऱ्यांना दलालीचा प्रसाद मिळावा म्हणून कंत्राटी भरती करत आहात, हे आपल्याला शोभत नाही. भरतीच्या आशेने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी करणारा कंत्राटी भरतीचा हा जीआर रद्द करावा अन्यथा काही दिवसांसाठी असलेल्या आपल्या सागर बंगल्यासमोर युवांचा जनसागर उसळेल हे लक्षात असू द्यावे - रोहित पवार

13:40 (IST) 8 Oct 2024
‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर वरदहस्त कोणाचा? आयुक्तांनी नेमली चौकशी समिती

औंध येथील परिहार चौकाजवळ बेकायदा ३० गाळे कसे उभे राहिले, याची चौकशी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली आहे. सविस्तर वाचा

13:39 (IST) 8 Oct 2024
आंबा बर्फी, सुकामेव्यानंतर आता मद्याच्या बाटल्या लंपास – कोंढवा परिसरातील मद्यालयात चोरी

चोरट्यांनी दुकानांचे कुलूप उचकटून आंबा बर्फी, सुकामेव्याची पाकिटे चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. कोंढवा भागातील एका मद्यालयातून चोरट्यांनी रोकड आणि मद्याच्या बाटल्या असा ४० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली.

सविस्तर वाचा

13:38 (IST) 8 Oct 2024
राज्य सरकारचेच अधिकारी, कर्मचारी हक्काच्या वेतनापासून वंचित… प्रकरण काय?

एकीकडे राज्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा १५०० रुपये दिले जात असताना राज्य शासनाचेच अधिकारी-कर्मचारी तीन महिने हक्काच्या वेतनापासून वंचित असल्याचे समोर आले आहेत. सविस्तर वाचा

13:37 (IST) 8 Oct 2024
PLC Sanitation Monitor Project: सरकारने पैसे थकवल्याचा आरोप करत उपोषण… मंत्र्यांचे म्हणणे काय?

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातील ‘पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पा’साठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले नसल्याचा, उपक्रम चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा, राजकीय नेत्यांच्या शाळांना पारितोषिके दिल्याचा आरोप प्रकल्पाचे संचालक रोहित आर्या यांनी पत्रकार परिषदेत केला. सविस्तर वाचा

13:36 (IST) 8 Oct 2024
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; वांद्रे- कुर्ला संकुल, शिवाजी नगरमधील हवा ‘खराब’

मुंबईतील हवेचा निर्देशांक मंगळवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला असून वांद्रे – कुर्ला संकुल, तसेच शिवाजी नगर येथे ‘खराब’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता सोमवारीही मध्यम श्रेणीत होती. ‘समीर’ ॲपनुसार मंगळवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११४ वर पोहोचला होता. सविस्तर वाचा

13:24 (IST) 8 Oct 2024
अहमदनगर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना अटक

नगरः श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सविस्तर वाचा....

13:23 (IST) 8 Oct 2024
पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’

पुणे : संघटनेत जरा डावे-उजवे झाले, की नेत्याला देव मानणारा कार्यकर्ताही पक्षाला ‘रामराम’ करायला मागे-पुढे पाहत नाही. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष सध्या याचाच अनुभव घेत आहे.

सविस्तर वाचा...

13:22 (IST) 8 Oct 2024
Video : माझं जंगल, माझं राज्य… ‘या’ वाघाने थेट रस्त्यालगतच मांडले ठाण; मग दाढी कुरवळत…

नागपूर : पावसाळा जवळजवळ संपल्यातच जमा आहे आणि सगळीकडे हिरवळ पसरली आहे. अशावेळी जंगलातल्या रस्त्यालगतच्या हिरवळीवर वाघाने ठाण मांडले असेल तर ! ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्लीच्या गाभा क्षेत्रात ‘छोटा दडीयल’ने चक्क ठाण मांडले.

सविस्तर वाचा....

13:21 (IST) 8 Oct 2024
Navratri 2024 : दुर्गोत्सव नव्हे लोकोत्सव! यवतमाळचा नवरात्रोत्सव बघण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी

Navratri 2024 : देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा दुर्गोत्सव यवतमाळात उत्साहात सुरू आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी दररोज लाखो भाविक यवतमाळात दाखल होत आहेत.

सविस्तर वाचा....

Maharashtra Breaking News Live Today, 08 October 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा

Story img Loader