Maharashtra News “मला तेव्हाच यायचं नव्हतं तर पुन्हा कशाला येईन?” मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!

Maharashtra Politics Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

harshal pradhan reply to keshav upadhyay article targeting uddhav thackeray
देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे

Marathi News Updates, 08 October 2024: आज एकीकडे जम्मू-काश्मीर व हरियाणा निवडणुकांचे निकाल लागत असताना दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष व शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी त्यांच्या पक्षाचे पहिले उमेदवार जाहीरदेखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असून दुसरीकडे आघाड्यांचं जागावाटपही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 08 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी…

13:21 (IST) 8 Oct 2024
सांगलीतील संघर्ष मुद्द्यांवरून गुद्द्यांवर !

सांगली : विधानसभेचे रणमैदान जाहीर होण्याअगोदर जिल्ह्यात राजकीय वर्चस्व, श्रेयवाद यातून राजकीय नेते हातघाईवर आले असून यामुळे यंदाचा दिवाळी-दसरा सण आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फोडणारा ठरणार आहे.

सविस्तर वाचा….

13:20 (IST) 8 Oct 2024
चंद्रपूरमध्ये डॉक्टरांना आमदारकीचा वेध

चंद्रपूर : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या डॉक्टरांना आता आमदारकीची स्वप्ने पडायला लागली आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील तब्बल १० डॉक्टरांनी रुग्णसेवा सोडून थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा….

13:19 (IST) 8 Oct 2024
बुलढाण्यात यश मिळविण्यासाठी ठाकरे गट सक्रिय

बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत अनुकूल वातावरण असतानाही झालेला पराभव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

सविस्तर वाचा….

13:18 (IST) 8 Oct 2024
बेशिस्तीच्या वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष

शिस्तबद्ध पक्ष अशी प्रतिमा असलेले आणि किमान ३० वर्षांत प्रत्येक विधानसभा आणि महापालिका निवडणुकीमध्ये अधिक यश मिळणारा पुण्यातील एकमेव पक्ष म्हणजे भाजप. पुण्यात आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये पाच खासदार आणि १४ आमदार दिलेल्या या पक्षाच्या शिस्तीला आता बाधा आली आहे.

वाचा सविस्तर…

13:18 (IST) 8 Oct 2024
साधू वासवानी पुलाचे काम कधी पूर्ण होणार, आयुक्तांनी केला मोठा खुलासा

पुणे : पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी पूल पाडण्याचे काम २० टक्के पूर्ण झाले असून, रेल्वे विभाग, वाहतूक पोलीस यांची या कामासाठी परवानगी मिळाली आहे. या पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

वाचा सविस्तर…

12:33 (IST) 8 Oct 2024
बोपदेव देव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची खबऱ्यांवर भिस्त, पोलीस आयुक्तालयात बैठक

पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करण्यात येणार आहे. तांत्रिक तपासातील अडथळे, तसेच मर्यादा विचारात घेऊन आता पोलिसांकडून खबऱ्यांचे जाळे पुन्हा कार्यरत करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर…

12:33 (IST) 8 Oct 2024
चोरीचे आयफोन ग्राहकांना विकणारे उल्हासनगरमधील तीनजण कल्याणमध्ये अटकेत

कल्याण : कल्याणमध्ये एका गोदामातून चोरलेले महागडे आयफोन ग्राहकांना बनावट पावत्या देऊन विक्री करणाऱ्या दोन आयफोन मोबाईल विक्रेत्यांसह एक चोरट्याला येथील बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे उल्हासनगरमधील आहेत.

वाचा सविस्तर…

12:32 (IST) 8 Oct 2024
नृसिंहवाडीत वयस्कर भाविकांसाठी दर्शन सुलभ; पायरीची उंची सोयीस्कर

कोल्हापूर: श्री दत्त प्रभूची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीत येणाऱ्या वयस्कर भाविकांना श्री दत्त दर्शन घेणे आता सुलभ होणार आहे.

वाचा सविस्तर…

12:31 (IST) 8 Oct 2024
पुणे : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, उत्तमनगर परिसरात अपघात

पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

12:30 (IST) 8 Oct 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन

पिंपरी : राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे राज्यघटना (संविधान) भवन आणि विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने १२० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.

वाचा सविस्तर…

12:30 (IST) 8 Oct 2024
महायुती, महाविकास आघाडीतील बंडखोरांना मनसेच्या पायघड्या?

पुणे : आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्कात महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक मातब्बर नेते आहेत. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हे नेते मनसेत येण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

12:29 (IST) 8 Oct 2024
पुणे : पाण्याविना नवीन गृहप्रकल्प कशासाठी?

तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पूर्वी इतकेच मर्यादित आहेत. मागील पाच वर्षांपासून सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा आणखी दोन वर्षे कायम राहणार आहे. शहराच्या अनेक भागांत पाण्याची कायम ओरड सुरू असून, पाणी टंचाईवरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर…

12:28 (IST) 8 Oct 2024
Video : गरबा खेळत असताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू; क्षणात होत्याचं नव्हतं झालं अन्…

पुणे : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. दांडिया, गरबा खेळण्यात तरुण तरुणी मग्न आहेत. गरबा खेळत असताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या चाकणमधून समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

12:27 (IST) 8 Oct 2024
अब्जावधी प्रकाशवर्षे दूरच्या कृष्णविवराबाबत महत्त्वाचा शोध…

पुणे : आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या गटाने ७.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवरातून उत्सर्जित होणाऱ्या अतिप्रचंड झोतांचा वेध घेतला आहे. खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) सहाय्याने हे संशोधन करण्यात आले असून, २३ दशलक्ष प्रकाशवर्षे पसरलेल्या या झोताचे पोर्फिरियन असे नामकरण करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

12:11 (IST) 8 Oct 2024

Swapnil Kusale Father PC: स्वप्नीलच्या नुसत्या काडतुसांचाच दिवसाचा खर्च… – सुरेश कुसाळे

यापूर्वी १ कोटी रुपये जाहीर करण्यात आले होते. पण आम्ही पाच कोटी मिळावेत यासाठी पाठपुरावा करत आहोत. स्वप्नीलचा आगामी काळातला खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे ५ कोटींशिवाय पर्याय नाही. माझ्या अंदाजे २०२८ पर्यंत त्याला लागणारा खर्च ३ कोटींपर्यंत जाईल. आता त्याला साधी बंदूक घेऊन चालणार नाही. त्याला चांगल्या प्रकारची बंदूक घ्यावी लागेल. दिवसाला त्याला २५०-३०० काडतुसं फायर करावी लागतील. त्या एका काडतुसाची किंमत १०० रुपयांपर्यंत असते. त्यामुळे एका दिवसाचा फक्त काडतुसांचा खर्च ३० हजारापर्यंत जाते – सुरेश कुसाळे

12:11 (IST) 8 Oct 2024

Swapnil Kusale Father PC: स्वप्नीलला विधानभवनात बोलवून एक फूलही दिलेलं नाही – सुरेश कुसाळे

वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाचव्या दिवशीच विधानभवनात आमच्या सरकारनं महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंना बोलवून ११ कोटींचं जाहीर केलेलं बक्षीस त्यांना दिलं. पण आता ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकून दोन महिने सहा दिवस झाले आहेत. पण शासनानं अजून त्याला विधानभवनात बोलवून एक फूलही दिलेलं नाही. त्यांना ऑलिम्पिक पदकाची काही किंमत आहे की नाही हा मला प्रश्न आहे – सुरेश कुसाळे

11:58 (IST) 8 Oct 2024

Swapnil Kusale Father PC: स्वप्नीलला ५ कोटी आणि फ्लॅट द्या – सुरेश कुसाळे

स्वप्नीलला पदक मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पण ती तोकडी आहे अशी आमची भूमिका होती. दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळानं ५ कोटी सुवर्णपदकाला, ३ कोटी रौप्य पदकाला, २ कोटी कांस्य पदकाला जाहीर केलं. पण हे सरकारनं ऑलिम्पिक सामने चालू होण्यापूर्वीच जाहीर करायला हवं होतं. आता मला वाटायला लागलं आहे की स्वप्नील एका सामान्य कुटुंबातला, ज्याला राजकीय पाठिंबा नाही म्हणून तुम्ही त्याला एवढं तोकडं बक्षीस दिलं का? हाच मुलगा एखाद्या मंत्र्याचा किंवा आमदाराचा असता, तर तुम्ही काय केलं असतं? माझी मागणी आहे की राज्य सरकारने किमान त्याला ५ कोटी रुपये बक्षीस द्यावं, बालेवाडीपासून जवळ फ्लॅट मिळावा, तिथल्या रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं अशा अनेक मागण्या आहेत. आगामी काळात त्याला सुवर्णपदक जिंकायचं आहे – सुरेश कुसाळे

Maharashtra Breaking News Live Today, 08 October 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा

Web Title: Maharashtra news live maharashtra weather updates october heat rain update assembly election 2024 marathi batmya pmw

First published on: 08-10-2024 at 11:54 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments