Marathi News Update : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे १०० दिवस राहिले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चेंना वेग आला असून काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तर राज ठाकरे यांच्याकडून महायुतीत सामील होण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीनेही जागावाटपाचा निर्णय जवळपास अंतिम केला असून २७ तारखेला निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले आहे. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी विरोधात गेल्याचे दिसत आहे. याही विषयावर मनोज जरांगे पुढे काय भूमिका मांडतात याकडे आपले लक्ष असेल.
Maharashtra News Live 22 February 2024
फेब्रुवारीमध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत साधारण २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, वाढते प्रदूषण त्यास कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : द बरिड ट्रुथ’ या माहितीपटाला स्थगिती देण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आतापर्यंत साथ देणाऱ्या संगीता वानखेडे यांनी आता थेट जरांगे पाटील यांच्यावरच पलटवार केला आहे. अजय बारसकर यांच्याप्रमाणेच संगीता वानखेडे यांनीही जरांगे यांच्यावर आरोप केले आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार यांची साथ होती, हे पुढील काही दिवसांत समोर येईल. आमच्या बैठका होत असताना जरांगे पाटील यांना कुणाचातरी फोन आयचा, हा फोन शरद पवारांचा होता, असा दावाही संगीता वानखेडे यांनी केला आहे.
वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत.
गडचिरोली : विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शत्रूसारखी वागणूक देणाऱ्या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन करणारे पत्रक काढून नक्षलवाद्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता विकल्पने हे पत्रक जारी केले आहे.
नागपूर : राज्यातील नागपूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील माता मृत्यू व उपजत मृत्यूची (गर्भातच बाळाचा मृत्यू) तुलना केल्यास नागपूरपेक्षा पुणे येथे उपजत मृत्यू अधिक आहेत, तर माता मृत्यूमध्ये नागपूर समोर असल्याची धक्कादायक माहिती आहे.
इचलकरंजी शहराला सुळकुड नळ पाणी योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाणी आमच्या हक्काचं अशा घोषणा देत स्त्री-पुरुष आंदोलन आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उतरले होते. योजनेकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
अक्षयवर दहशत माजविणे, चाकूचा धाक दाखवून लुटणे, जीवे ठार मारणे अशा प्रकारचे एकूण १० गंभीर गुन्हे डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी अशा तिसऱ्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
प्रसिद्ध कवी-गज़लकार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर (वय ६९) यांचे बुधवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले.
एका मोबाईल विक्रीच्या दुकानात चोरी करून ते चोरीचे मोबाईल विठ्ठलवाडी भागात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली.
मनोज जरांगे पाटील यांनी आपला लढा राजकीय पातळीवर नेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. आतापर्यंत राजकीय नेत्यांनी माझी फसवणूक केली, असा आरोप मनोज जरांगे पाटील करतात, त्यामुळे ते राजकीय भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची फसवणूक होत राहिल, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
अलिबाग- आगामी निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून चकाकते भव्य चषक आणि लाखो रुपयांची बक्षिसे वाटून ही नेतेमंडळी या निवडणुकांच्या तोडांवर जणू मतांची बेगमीच करत असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांपासून वेगळे झाल्याची अनेक कारणं आहेत. मात्र त्यांनी वेगळं होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले असं स्मिता ठाकरेंनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर, त्याठिकाणी फलक नसताना कारवाई कशी केली, यावरून चालक वाद घालतात, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
अमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस पथकावर नशेबाजांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका महिला पोलिसाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली आहे, महिला पोलीस गंभीर जखमी झाली आहे. भाईंदर येथील धारावी परिसरात ही घटना घडली.
आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या पाठीशी राहतील – आमदार रविंद्र धंगेकर
बाधीत क्षेत्रातील एक किलोमीटर परिघातील डुकरांचे कलिंग करुन शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील तिरवंजा मोकासा येथील येरगुडे कुटुंबाने शेतीत राबणाऱ्या आपल्या बैलाचा सांभाळ केला. कुटुंबाचा सदस्यच असल्यासारखा लखनही दिवसभर शेतीतली कामे करत मजेत राहू लागला. मात्र..
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर या पक्षातील आमदार अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. त्यांनी अजित पवार यांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे, तसेच दोन्ही गटातील आमदार पात्र आहेत, असा महत्त्वाचा निर्णय दिला. या निर्णयानंतर शरद पवार गटातील नेत्यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. नार्वेकर यांनी भाजपा-अजित पवार गटाला पुरक असणारा निर्णय दिला, त्यांच्याकडून दुसऱ्या निर्णयाची अपेक्षा नव्हती असा आरोप केला. याच आरोपांवर खुद्द राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते आज (२२ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
चंद्रपूर : बारावीचा इंग्रजीचा पेपर, नवरा कामावर गेलेला अन् सोबतीला दोन महिन्यांचं चिमुकलं बाळ… घरी सांभाळ करणारं कुणीच नाही. दुसरीकडे, पेपरही महत्त्वाचा. अशात ती आई दोन महिन्यांच्या तान्हुल्याला सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचली.
दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असून शुक्रवारी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
उपनगरी रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तिथे स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वर्धा : शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होवू नये म्हणून अनेक शेतकरी त्यांच्या शेताला तारेचे कुंपण घालून त्यात विजेचा प्रवाह सोडतात. मात्र ही बाब धोकादायक असूनही ते हा प्रकार नाईलाज म्हणून करीत असल्याची गाव पातळीवार चर्चा असते. हीच बाब भोवल्याचे हे प्रकरण आहे.
शरद पवार यांनी आयुष्यभर जे घर बांधण्यात घालवलं, त्याच घरातून शेवटी त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी घेतलेला निर्णय कुटुंबातील कुणालाही आवडलेला नाही. मी तरी अजित पवार यांचा लांबचा पुतण्या असेल पण युगेंद्र पवार हा तर तुमचा सख्खा पुतण्या आहे. मग त्याने पवार साहेबांची साथ का दिली? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत गेल्या वर्षभरात ४८ हजारांच्या आसपास बेकायदा फलकांवर कारवाई करण्यात आल्याचा आणि त्यातील २२ प्रकरणांत गुन्हा दाखल केल्याचा दावा महापालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात केला.
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने जानेवारी महिन्यापासून विविध समाज घटकांचे मेळावे घेण्यावर भर दिला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विविध समूह घटकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची दृश्ये अथवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी प्रवासी व्हिस्टाडोम डब्यांना प्राधान्य देत आहेत.
नागपूर : देशभरातच वातावरणाचे चक्र पूर्णपणे बिघडले असून हवामानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला असून राज्यातील आठ जिल्ह्यांना त्याचा फटका बसणार आहे.
चंद्रपूर : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांमध्ये ७२ वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने हिवाळी अधिवेशनात केली. महिनाभरात हे वसतिगृह कार्यान्वित होणार असल्याचेही स्पष्ट केले. ही मुदत उलटून गेल्याने संताप व्यक्त होऊ लागताच ओबीसी कल्याण विभागाने पत्र काढून समाजातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरिता ऑफलाइन अर्ज मागविले आहेत. येत्या ५ मार्चपर्यंत हे अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतिगृहे सुरू करणे आवश्यक होत, मात्र केवळ ५२ वसतिगृहांवर ओबीसी विद्यार्थ्यांची बोळवण केली आहे.