Marathi News Update : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे १०० दिवस राहिले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चेंना वेग आला असून काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तर राज ठाकरे यांच्याकडून महायुतीत सामील होण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीनेही जागावाटपाचा निर्णय जवळपास अंतिम केला असून २७ तारखेला निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले आहे. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी विरोधात गेल्याचे दिसत आहे. याही विषयावर मनोज जरांगे पुढे काय भूमिका मांडतात याकडे आपले लक्ष असेल.

Live Updates

Maharashtra News Live 22 February 2024

10:58 (IST) 22 Feb 2024
इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाच्या प्रदर्शनाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात, उर्वरित साक्षीदारांची माहिती देण्याचे नेटफ्लिक्सला आदेश

खटला निकाली निघेपर्यंत माहितीपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी सीबीआयचे वकील श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयाकडे केली.

सविस्तर वाचा…

10:39 (IST) 22 Feb 2024
शेतकरी घरी पाठवणार याची गॅरंटी वाटल्याने मोदींनी उसाची एफआरपी वाढवली; धनाजी चुडमुंगे यांची टीका

कोल्हापूर : देशातील शेतकरीच आपल्याला घराकडे पाठवणार याची मोदींना ग्यारंटी वाटल्यामूळेच पुढच्या हंगामातील उसाची एफआरपी प्रतिटन २५० रुपयाने वाढवली आहे. यात शेतकरी हिताचा विचार नसून हा निवडणूक इफेक्ट आहे, अशी टीका आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी गुरुवारी केली आहे.

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचा वादा देऊन सत्तेत आलेल्या या सरकारने शेतकऱ्यांना चौपट अडचणीत आणले म्हणून शेतकरी या सरकारला सत्तेतून घालवण्याच्या तयारीत आहे. या देशात सत्ता परिवर्तन करायची ताकत फक्त शेतकऱ्यात आहे. याची मोदींनाही ग्यारंटी वाटल्यामुळे कोणतीही आकडेवारी न घेता ही एफआरपी वाढ जाहीर केली आहे असे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.

10:39 (IST) 22 Feb 2024
आरोग्य कर्मचारी होणार अपडेट! कीटकजन्य आजारांचे आता आधुनिक पद्धतीने सर्वेक्षण

पुणे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कीटकजन्य आजारांच्या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

सविस्तर वाचा…

10:38 (IST) 22 Feb 2024
रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची बदली, सत्ताधारी पुढाऱ्यांची नाराजी भोवल्याची चर्चा

रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, कोकण विभागाचे अप्पर आयुक्त किशन जावळे हे रायगडचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

सविस्तर वाचा…

10:38 (IST) 22 Feb 2024
ठाणे : गोएंका शाळेबाहेर पालकांचे आंदोलन, प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी

बसगाडीमध्ये खाद्य पदार्थाची पाकिटे वाटत असताना, जावेद याने काही मुला-मुलींचा विनयभंग केला होता.

सविस्तर वाचा…

10:36 (IST) 22 Feb 2024
महायुतीत सामील होण्यासाठी मनसेकडून चाचपणी

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीत निवडणूक लढवावी की स्बळावर निवडणूक लढवावी, याबद्दलचे मत जाणून घेतले.

संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेत्यांच्या श्रीमंतीवर टीका. (Photo – Loksatta Graphics)