Maharashtra Politics Updates : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याबरोबरच राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलंच आहे. आज या गुन्ह्यातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात काही महत्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. यादरम्यान या आणि राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तसेच इतर सामाजिक व राजकीय बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर –
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाने गोराई परिसरातील विविध आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती स्थापन केली आहे. मुंबई महापालिकेचा वर्सोवा – दहिसर सागरी किनारा प्रकल्प गोराई परिसरातून जात असून या प्रकल्पात गोराईमधील काही पाड्यांतील जमिनी जाणार आहे.
टक्कल, केसगळतीचे कारण काय? चेन्नई, दिल्लीतील पथक शेगावात
केसगळती व टक्कल आजारावर संशोधन करण्याच्या उद्देशाने आलेल्या या पथकात आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथी या चारही शाखांच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
तळोजातील अपघातामध्ये एक ठार महिला अत्यवस्थ
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता तळोजा ते कळंबोलीकडे जाणा-या मार्गिकेवर झालेल्या अपघातामध्ये एक तरुण ठार झाला तर एक महिला अत्यवस्थ आहे. या भीषण अपघाताची विचलित करणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
दुचाकीने कर्तव्यावर जाणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला नॉयलान मांजा गुंडाळल्या गेला.
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
नायलॉन मांजावर अंकुश लावण्यात प्रशासनाला आलेले अपयश माणसांचाच नाही तर पक्ष्यांचा देखील बळी घेत आहे.
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
गोंदिया वनविभागातील दासगाव बीट/गोंदिया वनपरिक्षेत्रा मधील कोहका – भानपुर परिसरात (कक्ष क्र- १०२० , गट न. ३१२.) वाघाचा मृतदेह आढळला आहे.
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
मुंबई : ओला, उबेर, रॅपिडोसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे सूतोवाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, वाहतूक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.
वाल्मिक कराडवर मकोका लागला असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक – जरांगे पाटील
वाल्मिक कराडवर मकोका लागला असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो, सगळ्या आरोपींवर ३०२ दाखल करा आणि मकोका लागू करा. ही टोळी खूप मोठी या टोळीचा सफाया करा. या टोळीला सांभाळणारा एक जण आहे. सगळ्यांच्या नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच परळीत बस वर दगडफेक करणारी धनंजय मुंडेंची टोळी आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, मुंडेंच्या टोळीला जेरबंद करा असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत.
मुदत ठेवी आणि देणी याविषयी मुंबई महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मागणी
मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार असून आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने मुदत ठेवींसंदर्भात (एफडी) श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.
आयआयटी मुंबईचा ‘ई-मोबिलिटी’अंतर्गत ई-पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू
मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) ई मोबिलिटीमध्ये प्रगत शिक्षणासाठी ई पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा १८ महिन्यांचा उद्योग केंद्रीत अभ्यासक्रम मार्च २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबई आणि एडटेक ग्रेट लर्निंग या कंपनीने ‘ई माेबिलिटीचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम’ तयार केला आहे.
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
नाशिक : प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकी वाहनधारकाच्या जिवावर बेतत असताना दुसरीकडे तो शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित होण्यास कारक ठरला. वाहिन्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा तुटता तुटत नाही. पतंग उडवणाऱ्यांकडून तो खेचला जातो. या स्थितीत वाहिन्या एकमेकांवर घासल्या जाऊन प्रणालीत दोष उद्भवण्याचे प्रकार घडले
नंदुरबारमधील शिक्षकाला मोहजाळात अडकवून १२ लाख रुपयांची मागणी
नाशिक : नंदुरबार येथील एका शिक्षकाला मोहजाळात अडकवून अश्लिल चित्रफित तयार करण्यात आली. नंतर चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत शिक्षकाकडे १२ लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
पुणे : भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. अपघातात मोटारीतील सात जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.विजया बाजीराव पडवळ (वय २९, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीच्या चार घटनांमध्ये ३० लाखाहून अधिकचा ऐवज लंपास झाला. कॅनडा कॉर्नर भागात सुमंगल सोसायटीजवळ झालेल्या घटनेत चोरट्यांनी १५ लाखाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सुमारे २९ लाखांचा ऐवज चोरला.
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
पत्नीच्या छळाच्या, हाणामारी किंवा निर्घृण हत्येच्या घटना सर्वसामान्य बाब आहे. मात्र चक्क पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बुलढाणा शहरात घडली.
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला विमानतळाजवळील पंततारांकीत हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करून सव्वा कोटी रुपये थकवणाऱ्या इंटरटेंमेंट कंपनीच्या मालकाविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हॉटेलला एक कोटी ३८ लाख रुपये न देता फसवणूक केल्याची तक्रार सहार पोलिसांना प्राप्त झाली होती.
सविस्तर वाचा…
विमान प्रवाशाच्या पिशवीतून पावणेदोन लाखांची रोकड चोरीला
पुणे : विमान प्रवाशाच्या पिशवीतून एक लाख ८० हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निगडीतील यमुनानगर भागात राहायला आहेत. ते कामानिमित्त दिल्लीला गेले होते. रविवारी (१२ जानेवारी) सायंकाळी ते दिल्लीहून विमानाने पुण्याकडे निघाले.
दिल्ली मेट्रो स्टेशन परिसरात प्रवाशाने पिशवीची पाहणी केली. पिशवीत ठेवलेली एक लाख ८० हजारांची रोकड व्ववस्थित ठेवल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी रोकड असलेली पिशवी विमानतळावर दिली. विमानातील सामान ठेवण्याच्या कप्प्यात पिशवीत जमा करण्यात आली. लोहगाव विमानतळावर ते रात्री उतरले. विमान उतरल्यानंतर त्यांनी रात्री बाराच्या सुमारास पिशवी ताब्यात घेतली. तेव्हा पिशवीत ठेवलेली रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार एस. एल. जामदार तपास करत आहेत.
खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे; वाल्मिक कराडच्या वकिलांची माहिती
खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या वाल्मिक कराडची आज सुनावणी झाली यासंदर्भात वाल्मिक कराडच्या वकीलांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, या प्रकरणात कराडचा सहभाग कुठेही आला नाही असं आम्ही सांगितले. खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यावर दोन-तीन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे. पोलिसांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती . 15 दिवस तपास झाला पुन्हा कोठडी नको असं म्हणणं आम्ही मांडलं. त्यानंतर कोर्टाने कोठडीच्या मागमीचा पोलिसांचा अर्ज फेटाळला असेही वाल्मिक कराडच्या वकिलाने सांगितले.
पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील रेव्हेन्यू काॅलनीत घरफोडी
पुणे : जंगली महाराज रस्ता परिसरातील रेव्हेन्यू काॅलनीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि कुटुंबीय रेव्हेन्यू काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत.
सविस्तर वाचा
रत्नागिरी : एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या २ नौकांसह २० लाखांची मालमत्ता जप्त
रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका रामभद्र गस्त घालत असताना ११ सागरी मैलाच्या दरम्यान एल.ई.डी. लाईट मासेमारी करणाऱ्या २ नौका अरशद अ. लतीफ पावसकर यांची नौका “साद माज” क्र. आयएनडी -एमएच -४- एमएम ३७३१, आणि लियाकत मस्तान यांची नौका “सुभान सफवान” क्र.आयएनडी -एमएच -४- एमएम ९९८ या दोन नौका एल.ई.डी. साहित्यासह आढळून आल्या. दोन्ही नौकांसह २० लाखांचे मालमत्ता विभागाकडून जप्त करण्यात आली.
रत्नागिरी किनारपट्टीवर परप्रांतीय मासेमारी नौका तसेच एल.ई.डी. मासेमारी नौका कार्यवाही अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक घेऊन पर्ससीन व एल.ई.डी. या दोन्ही प्रकारच्या मासेमारीवर अंकुश आणण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या सूचनांची सक्त अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने विभागाची गस्ती नौका “रामभद्र” क्र.आयएनडी -एमएच -४- एमएम ५८०६ गस्ती कामी सोमवारी रात्रीच रवाना करण्यात आली.
डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
मुंबई : मालाडमधील एका घरात शिरलेल्या बुरखाधारी महिलेने ९१ वर्षीय महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तिला लुटण्याचा प्रयत्न केला. वृद्ध महिलेने धैर्य दाखवून आरडाओरडा केल्यानंतर आरोपी महिलेने तेथून पळ काढला.
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याने पालकांनी या शिक्षकाला यथेच्छ चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
टेम्पोतून जात असताना रस्त्याने एकटीच मुलगी चालली आहे पाहून तिन्ही तरूणांनी मुलीची छेड काढली.
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
खनदाळ (तालुका गडहिंग्लज) येथील कुमार पाटील या शेतकऱ्याने १६ हजार ५०० रुपयांना कोबीची रोपे खरेदी केली होती.
कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकणार हे जबाबदारीने सांगतो, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दहा प्रभाग हद्दीतील सुमारे पाच हजार फलक काढून टाकण्याची कारवाई पालिकेच्या प्रभागातील साहाय्यक आयुक्तांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केली.
नाशिकमध्ये नायलाॅन मांजामुळे युवकाचा मृत्यू
नाशिक : मकरसंक्रांतीच्या दिवशी नाशिक येथे पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकीस्वार युवकाच्या गळ्यात अडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ज्या कारणाने ही दुर्घटना घडली, त्या मांजाच्या वापरकर्त्याला अटक करून कठोर कारवाई करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका कुटंबियांनी घेतल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली.
वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; मकोका अंतर्गत गुन्हा दाखल
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
खंडणी प्रकरणा सुनावलेली १४ दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्याला केजच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
अलिबाग- रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष फूटीच्या उंबरठ्यावर असून, पाटील कुटूुंबातील एक गट भाजपच्या वाटेवर आहे. शेकापचे माजी जिल्हा चिटणीस आणि मिनाक्षी पाटील यांचे चिंरजीव आस्वाद पाटील यांच्यासह अनेक मोठे नेते येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
नागपूर : गोंदिया वनखात्याअंतर्गत कोहका-भानपूर मार्गावर वाघाचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ही माहिती मिळताच वनखात्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.