Maharashtra Politics Updates : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याबरोबरच राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलंच आहे. आज या गुन्ह्यातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात काही महत्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. यादरम्यान या आणि राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तसेच इतर सामाजिक व राजकीय बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर –
एसटी बँक लाच प्रकरणात महत्वाची अपडेट… तर घबाड बाहेर येईल
नागपूर: एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या स्टेट ट्रान्पोर्ट को -ऑफ बँकेतील (एसटी बँक) पंढरपूर शाखेतील एका कर्मचाऱ्याला १.१० लाख रुपये लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणात महत्वाची अपडेट पुढे येत आहे.
औषध आणीबाणी टळली, औषध वितरकांची दोन आठवड्यात देयके मंजूर होणार
मुंबई : औषध वितरकांची ५० टक्के देयके पुढील दोन आठवड्यांमध्ये, तर उर्वरित देयके १५ फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्यात येतील, असे लेखी आश्वासन मुंबई महानगरपालिकेने औषध वितरकांना दिले. त्यामुळे सोमवारपासून बंद केलेला औषध पुरवठा मंगळवारपासून पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स हाेल्डर फाऊंडेशनने जाहीर केला.
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
पुणे : शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख १७ हजार रुुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पंडितराव आगाशे शाळेतील एका शिक्षिकेेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३०५ विजेत्यांची आठ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात, पत्राचाळ योजनेतील घरांना निवासी दाखला
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०१६ च्या सोडतीतील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ योजनेतील ३०५ विजेत्यांची हक्काच्या घरांची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. पत्राचाळीतील सोडतीतील घरांचा समावेश असलेल्या इमारतीला अखेर म्हाडाकडून निवासी दाखला (ओसी) मिळाला आहे.
दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
यवतमाळ : समाजातील वाचनसंस्कृती नष्ट होत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. एकूणच पुस्तके, वाचन याकडे ओढा कमी होत असताना यवतमाळ येथील भूमिका सूजीत राय या आठव्या इयत्तेतील दृष्टिहीन विद्यार्थिनीने सलग १२ तास वाचन करून, वाचनाप्रति डोळस संदेश समाजाला दिला.
नंदुरबार जिल्ह्यातील परिचारिकेच्या हत्येची उकल
नाशिक – नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील बुधावल येथे परिचारिकेच्या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून पैसे देण्याचे नाकारल्याचा राग आल्याने पतीनेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
तीन दिवसीय संमेलनाच्या विविध सत्रात तब्बल १५ वर मोठ्या नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते असलेले महेश कोठे हे महाकुंभमेळ्यासाठी आपल्या काही मित्रांसह प्रयागराजला गेले होते.
म्हाडा बृहतसूचीसाठी मागविणार अर्ज; १५ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज प्रक्रिया; सोडतीद्वारे मूळ भाडेकरूंना घरांचे वितरण
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात वर्षानुवर्षे राहणार्या मूळ भाडेकरूंना हक्काची कायमस्वरूपी घरे देण्यासाठी बृहतसूचीअंतर्गत अर्ज प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार बुधवार, १५ जानेवारी रोजी जाहिरात प्रसिद्ध करून याच दिवसापासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई हद्दीत मोटार सायकलच्या चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली आहे.
उरण : खोपटे पुल दुरुस्तीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबूतीकरण
सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या खोपटे पुलाच्या मजबुतीकरणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असून या पुलाच्या दुरुस्तीला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
‘एमपीएससी’: अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्याच्या वर्षभरानंतर १७ प्राचार्य पदांचे आरक्षण वगळले! शुद्धिपत्रावर आक्षेप
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) शासकीय महाविद्यालयांमधील प्राचार्यांच्या १७ पदांसाठी २०२३ मध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. परंतु, आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राचार्य हे एकाकी (सॉलिटरी) पद असल्याने त्यास आरक्षण लागू होणार नाही, असे सुधारित पत्र ‘एमपीएससी’ला दिल्याने प्राचार्यांच्या १७ पदांचे आरक्षण वगळून ती खुल्या वर्गात वळवण्यात आली आहेत.
सविस्तर वाचा…
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
चंद्रपूर: बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका वाहतूकदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
माझ्या मुलावर अन्याय करु नका, त्याला सोडा; वाल्मिक कराडच्या आईची मागणी
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या वयोवृद्ध आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पारुबाई बाबुराव कराड असे त्यांचे नाव असून सकाळपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. एकीकडे आज वाल्मिक करडाची सीआयडी कोठडी संपणार असून त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. अशातच कराडच्या आईने हे आंदोलन सुरू केले आहे. माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्याला सोडलं जात नाही तोपर्यंत इथेच ठिय्या आंदोलन करणार असल्याची प्रतिक्रिया वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी दिली आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
खारघर उपनगरामधील ९ एकर जागेवर इस्कॉन मंदिराची उभारणी झाल्याने उपनगराची खऱ्या अर्थाने अध्यात्मिक ओळख देशपातळीवर होणार आहे.
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
कल्याण पश्चिमेतील एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप भाजपचे तत्कालीन माजी नगरसेवकासह इतर पाच जणांवर झाला होता.
नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण
आवक वाढत असल्याने बाजारात मागील महिन्याच्या तुलनेत दर आवाक्यात आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
मुंबईः टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल केला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या आधारावर ईडीही याप्रकरणात तपास करीत आहे.
नागरिकांच्या विरोधानंतर सागरी किनारा प्रकल्पालगतचे वाहनतळ गुंडाळले ; चार वाहनतळांपैकी अमरसन्सचा प्रकल्प रद्द
मुंबई : सागरी किनारा मार्गालगत अमरसन्स उद्यानाजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने अखेर रद्द केला. ब्रीच कॅण्डी येथील रहिवासी संघटनेने येथे वाहनतळ करण्यास प्रचंड विरोध केला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अखेर माघार घेतली.
मुंबईतून ८१ बांगलादेशी नागरिकांना अटक; नववर्षातील पहिल्याच १० दिवसांतील पोलिसांची कारवाई
मुंबई : बांगलादेशातील राजकीय अस्थिरता व तेथील हिंदूवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भारतातील राजकीय वातावरणही संवेदनशील होवू लागले आहे. या काळात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करीत असून मुंबई पोलिसांनाही बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवत आहेत.
पक्ष्यांवर ‘संक्रांत’… जखमी पक्ष्यांसाठी मदत क्रमांक सुरू
पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामध्ये अडकून जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या मदतीसाठी ‘रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वेल्फेअर’ (रॉ) संस्थेतर्फे स्वतंत्र मदत क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक) सुरू केली आहे.
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
पुणे : कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना बाणेर भागात घडली. या घटनेत महिलेसह तिचा पती गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
बेलापूर येथील सिडको भवनाच्या इमारतीसमोरील मोकळी जागा टाटा पावर कंपनीची असून टाटा कंपनीच्या उच्च दाबाच्या तारांखाली सिडको मंडळ धोकादायक वाहनतळ चालवित आहे.
शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
Vasai Palghar Forest Area Declined : वसईला आलात तर मोकळी, हिरवीगार गर्द झाडी असलेली जागा एकदा मनभरून बघून घ्या… कदाचित पुढच्या वेळी आलात तर ती मोकळी जागा दिसणार नाही, तो हिरवा पट्टा, वनराई दिसणार नाही…
कात्रजमध्ये पेट्रोल पंपावरील कामगाराला मारहाण करुन रोकड लूटीचा प्रयत्न; शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कामगार जखमी झाला.याबाबत सलीम सिकंदर शेख (वय ३१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या परीक्षेला (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) मंगळवार, १४ जानेवारी २०२५ पासून सुरुवात होत आहे. मात्र पदव्युत्तर स्तरावरील एम.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या काही विद्यार्थ्यांच्या हातात प्रवेशपत्रच (हॉल तिकीट) आलेले नाही, तर काही विद्यार्थ्यांना सोमवारी रात्री उशिरा प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची सीआयडी कोठडी आज संपली असून केज न्यायालयात त्याला हजर केले जात आहे. बीड शहर पोलीस ठाण्यातून सीआयडीने कराडला केज न्यायालयाकडे नेले आहे. ३१ डिसेंबर रोजी केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपली असून पुन्हा न्यायालयात हजर केले जात आहे.

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कामगार जखमी झाला.
पादचारी भुयारी मार्ग असुरक्षित; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी
नागरी समस्या अलीकडच्या काळात उग्र रूप धारण करत आहेत. अनेकदा तक्रारी होतात, पण समस्या ‘जैसे थे’ राहते. नागरिकांच्या या समस्यांना प्रातिनिधिक व्यासपीठ देऊन त्यांचे गाऱ्हाणे या व्यासपीठावर मांडणारा ‘लोकसत्ता’चा हा पुढाकार…
सविस्तर वाचा
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून महायुती विरोधात लढलेल्या भाजपच्या बंडखोरांना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुन्हा पक्षात सहजासहजी प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी तसे संकेत दिले.