Maharashtra Politics Updates : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. याबरोबरच राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेलंच आहे. आज या गुन्ह्यातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठीच्या विशेष तपास पथकात काही महत्वाचे बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे. यादरम्यान या आणि राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तसेच इतर सामाजिक व राजकीय बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर –

11:06 (IST) 14 Jan 2025

टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण

नवी मुंबई : एकीकडे अटल सेतूमुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाशी खाडी पुलावरील वाहतुकीचा ताण काहीसा कमी झाला होता, परंतु टोलमुक्तीनंतरही वाहनचालकांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाचा सविस्तर…

10:45 (IST) 14 Jan 2025
Sanjay Raut Live : इंडिया आघाडी जगेल का?, संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले…

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबद्दल भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, “इंडिया आघाडी नक्कीच जगेल, का नाही जगणार? इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही तर विरोधक जिवंत राहणार नाहीत. हे मारून टाकतील. आमच्यासमोर धोकादायक लोकं आहेत. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठीच तयार करण्यात आले होते हे खरे आहे, पण ते टिकवून ठेवणे देशाची आणि लोकशाहीची गरज आहे. विधानसभा निवडणूक दिल्लीची आहे. येथे काँग्रेस आणि आप या दोघांना वाटते की इथे आपली ताकद आहे. दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते पण एकही जागा जिंकू शकले नाहीत. त्यांच्यात तोडगा निघाला असता तर आम्हाला आनंद झाला असता”, असे संजय राऊत म्हणाले.

लोकल बॉडीजच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. येथे युती करणे कठीण असते. लोकसभा आणि विधानसभेत आमची आघडी असेल याबद्दल काही शंका नाही इंडिया आघाडी तुटली असं बोललं जात आहे, तसं काही नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र लाईव्ह अपडेट