Mumbai Maharashtra: लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने चर्चा सुरू झाली असून लोकसभा निवडणूक निकालांचं प्रतिबिंब विधानसभेतही दिसेल, अशी शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे निकालांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं असून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

20:17 (IST) 12 Jun 2024
निवडणूक जवळ येताच अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं-सुनील तटकरे

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता राज्यसभेची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मंत्रिपद न मिळाल्याने काही चर्चा सुरु होत्या. मात्र आम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळेल असं अजित पवारांनी म्हटलं आहे. तसंच राज्यसभेला खासदार म्हणून अजित पवार सुनेत्रा पवारांना पाठवणार की छगन भुजबळांना याचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टीका

अशात सुनील तटकरेंनी याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ असं म्हटलं आहे. तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षावरही जोरदार टीका केली. लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं असा आरोप केला आहे. या निवडणुकीत जे काही अनुभवलं त्याचा विचार आम्ही करणार आहोत. काही लोक आमच्या आमदारांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र तसं काहीही नाही. लवकरच राज्यव्यापी दौरा आम्ही करणार आहोत. अर्थसंकल्प संपल्यानंतर अजित पवारांचाही राज्यव्यापी दौरा होणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

19:41 (IST) 12 Jun 2024
Monsoon Update : मुंबईत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

मुंबई : यंदा मोसमी वारे दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. मोसमी वारे मुंबईत दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वाचा सविस्तर…

18:51 (IST) 12 Jun 2024
महेश लांडगे, आश्विनी लक्ष्मण जगतापांच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा; महायुतीत तिढा?

पिंपरी- चिंचवड : शहरामध्ये महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभेवरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात जुंपली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी चिंचवड विधानसभा आणि भोसरी विधानसभेवर दावा केल्यानंतर या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे. तिथं भाजप चे आमदार आहेत, त्यामुळे या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील असं प्रत्युत्तर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिलं आहे.

वाचा सविस्तर…

18:11 (IST) 12 Jun 2024
शहापूर : तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून पित्याकडून मुलाची हत्या

शहापूर : शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून स्वत:च्या नऊ वर्षीय मुलाच्या तोंडात वहीच्या पानाचा बोळा कोंबून त्याची हत्या करणाऱ्या एकनाथ गायकवाड याला कसारा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुलाच्या हत्येचे सुरुवातीला बनाव रचला होता. पण, तपासाअंती त्याने हत्या केल्याचे उघड झाले. या मुलाची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा सविस्तर…

18:06 (IST) 12 Jun 2024
अभिनेता सलमान खानचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला

मुंबई : वांद्रे येथील घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदवला. गोळीबार झाला त्यावेळी अभिनेता सलमान खान घरीच होता.

सविस्तर वाचा….

17:57 (IST) 12 Jun 2024
देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे घेणार मुंबईत झाडाझडती; पराभूत उमेदवारांना निमंत्रण

वर्धा : महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश नं मिळाल्याची जोरात चर्चा झाली. याचे शल्य नेत्यांना आहेच. पण ब्लेम गेम सूरू झाल्याने पराभवाचे वाटेकरी कोण, हा प्रश्न अग्रभागी आला आहे. राज्यातील भाजप आमदारांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. आता १४ जूनला परत खास बैठक बोलाविण्यात आली आहे. यात आता आमदार राहणार नाहीत.

सविस्तर वाचा…

17:37 (IST) 12 Jun 2024
पुण्यानंतर पिंपरीतही पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू

पिंपरी : पुण्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घराच्या अंगणात खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

वाचा सविस्तर…

17:10 (IST) 12 Jun 2024
सांगली : चार शतकाच्या वटवृक्षाच्या फांद्या ७०० गावात लाऊन स्मृतीजतन

सांगली : चार शतकांचा साक्षीदार असलेल्या भोसेतील वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील ७०० गावात लावून ऐतिहासिक वडाच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. राष्ट्रीय महामार्गाची दिशाही बदलण्यास भाग पडलेल्या या वटवृक्षाचे दोन दिवसांपूर्वी सततच्या पावसाने पतन झाले.

सविस्तर वाचा…

16:12 (IST) 12 Jun 2024
विदर्भात मोसमी पाऊस आणखी दोन पाऊल पुढे; चंद्रपूर, अमरावती येथे आगमन

यंदा मोसमी पाऊस वेळेच्या एक-दोन दिवस आधीच येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर याठिकाणी तो आल्यानंतर विदर्भात तो कधी येणार याचीच उत्सुकता होती.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 12 Jun 2024
कोल्हापुरात आढळला दुर्मिळ स्पॉटेड वूल्फ स्नेक

कोल्हापूर : शहरातील मोरेवाडी येथील अष्टविनायक कॉलनी येथे एका घरात साप आल्याची माहिती छत्रपती वाईल्ड फाउंडेशनचे अमित चितारे आणि रवी चोपडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता तेथे एक बिनविषारी साप आढळून आला.

सविस्तर वाचा…

15:48 (IST) 12 Jun 2024
Maharashtra Political News Live : शरद पवारांचं सत्ताधाऱ्यांबाबत सूचक भाष्य!

देशातील राजकारण बदलतंय. गेली १० वर्षं विशिष्ट राजवट देशात होती. आजही त्यांच्या हाती सत्ता गेली आहे. पण दहा वर्षांची सत्ता आणि यावेळची सत्ता यात फरक आहे – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

15:34 (IST) 12 Jun 2024
देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळला; नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात विदर्भवादी आक्रमक

उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधातील आंदोलन आता आक्रमक होतांना दिसत आहे.

सविस्तर वाचा…

15:23 (IST) 12 Jun 2024
द्रोणागिरी नोडमधील महाकाय फलकाचा सांगाडा कायम, सिडको दुर्घटनेची वाट पाहते काय असा सवाल

उरण : घाटकोपर येथील अनधिकृत फलकाच्या दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली आणि राज्यात सर्वत्र अनधिकृत फलकांवर कारवाई सुरू झाली आहे. मात्र सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील सर्वात मोठ्या फलकाचा सांगाडा कायम आहे.

सविस्तर वाचा…

15:22 (IST) 12 Jun 2024
बुलढाण्यात वादळाचे तांडव; घरावरील टिनपत्रासह पाळणा उडाला, चिमुकलीचा करुण अंत

चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावाने काल मंगळवारी रात्री निसर्गाच्या तांडवाचे रौद्र रूप अनुभवले!

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 12 Jun 2024
ठाणे : डम्परच्या धडकेत क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, अपघातात एका महिलेचाही सामावेश

ठाणे : वर्तकनगर येथील कोरस भागात ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रावते (४४) यांच्या अंगावरून डम्पर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, त्यांच्या सोबत दुचाकी चालविणाऱ्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात येत आहे.

वाचा सविस्तर…

14:23 (IST) 12 Jun 2024
ऐरोलीत तुळई कोसळल्याने वाहतूक कोंडी

नवी मुंबई : अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून त्यात ऐरोली सेक्टर पाच येथील रेल्वे भुयारी रस्त्याचे तुळई कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती. वेळीच विभाग अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथक पोहचले. मात्र याच गर्डरवरून महावितरणची केबल असल्याने केवळ वाहतूक वळवली जात होती. सुमारे अर्धा-पाऊण तासाने महावितरण आणि रेल्वे अधिकारी आल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली गेली.

वाचा सविस्तर…

13:49 (IST) 12 Jun 2024
बेरोजगारांनो सावधान! नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी पुन्हा सक्रिय

बेरोजगार युवकांची धरमपेठ येथे परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

सविस्तर वाचा…

13:42 (IST) 12 Jun 2024
पिंपरी : अखेर पिंपरीतील सशुल्क वाहनतळ धोरण गुंडाळले; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन

महापालिकेने मोठा गाजावाजा करत आणलेले सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) धोरण अखेर गुंडाळण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 12 Jun 2024
राजस्थानात नंदुरबारचे मेजर रमेश वसावे यांना वीरमरण

नंदुरबार – शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील सैन्यदलातील जवान मेजर रमेश सजन वसावे यांना राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात घोडलेपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:25 (IST) 12 Jun 2024
राज्यातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचे शास्त्रज्ञ म्हणतात…

रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 12 Jun 2024
“…तर एका मिनिटात राजीनामा देणार’’, जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेने भाजपमध्ये भूकंप; १४ जूनकडे लक्ष…

माझे कार्य पाहून पक्षाने पद दिल्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून मी घरदार वाऱ्यावर सोडून पक्षकार्य करीत आहे, असे गफाट यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

13:12 (IST) 12 Jun 2024
Maharashtra Political News Live : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र!

ही कुणाची जबाबदारी आहे? आता अब की बारवाले कुठे गेले? आताही पंतप्रधान, गृहमंत्री तिथे जाणार नाही का? काश्मीरमध्ये काय फरक पडला? लोकांचे जीव तर अजूनही जात आहेतच. तीन दिवसांत तीन हल्ले झाले काश्मीरमध्ये. याला जबाबदार कोण? – उद्धव ठाकरे</p>

13:10 (IST) 12 Jun 2024
Maharashtra Political News Live : “वर्षभरानंतर मोहन भागवत बोलले, हे काही कमी नाही”

मणिपूरमधील घटनेनंतर महिन्याभरानंतर मोहन भागवत बोलले हेही काही कमी नाही. वर्षभरापासून मणिपूर जळतंय, त्याच्या बातम्या त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या. त्यांची संदेशवहन यंत्रणा माहिती पोहोचवायला एक-एक वर्ष लावते. ती यंत्रणा त्यांनी सुधरायला हवी – उद्धव ठाकरे</p>

13:00 (IST) 12 Jun 2024
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, काहींनी जाहीरपणे नाही पण मैत्री निभावली; समाजमध्यमांवरील संदेशामुळे खळबळ

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

12:49 (IST) 12 Jun 2024
पिंपरी : महामेट्रोवर कृपादृष्टी, महापालिकेच्या जागेवर वक्रदृष्टी!

महापालिकेकडून भाडेपट्ट्याने घेतलेल्या जागांचा वाणिज्यिक वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी या जागा देण्याबाबत शासनाकडे परवानगी मागितली होती.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 12 Jun 2024
Maharashtra Political News Live : अमोल किर्तीकर निकालाविरोधात कोर्टात जाणार!

वायव्य मुंबईतून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांचा शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी पराभव केला. मतमोजणीचया २६व्या फेरीत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर रवींद्र वायकरांना अवघ्या ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. या निकालाविरोधात आता अमोल किर्तीकर न्यायालयाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

12:38 (IST) 12 Jun 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले काॅलराचे दोन रूग्ण

दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 12 Jun 2024
बाबो! पतीची ऑनलाईन हेरगिरी करण्यात भारतीय महिला तिसऱ्या स्थानी; जाणून घ्या सविस्तर…

लग्नानंतर पतीचे कुठे अन्य महिलेशी अनैतिक संबंध आहेत का? याबाबत हेरगिरी करण्यात काही महिलांना उत्सूकता असते.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 12 Jun 2024
डोंबिवली पश्चिमेचा वीज पुरवठा दहा तास बंद

डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर दहा तासाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 12 Jun 2024
Maharashtra Political News Live : ४०० पार घोषणेमुळे नुकसान झालं? मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे चर्चेला उधाण!

महायुतीला भाजपाच्या ४०० पार घोषणेचा फटका बसल्याची चर्चा सध्या चालू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळे या चर्चेला उधाण आलं असून या निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीतही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनोज जरांगे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Maharashtra News Live: आंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा आंदोलन!