Mumbai Maharashtra: लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने चर्चा सुरू झाली असून लोकसभा निवडणूक निकालांचं प्रतिबिंब विधानसभेतही दिसेल, अशी शक्यता विरोधकांकडून वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे निकालांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं असून त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यांच्या मागण्यांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

12:11 (IST) 12 Jun 2024
मुंबई : बनावट व्हिसाद्वारे हंगेरीला जाणाऱ्या प्रवाशाला पकडले

मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बनावट व्हिसाद्वारे हंगेरी येथे जाण्याची योजना आखत असलेल्या नेपाळी वंशाच्या व्यक्तीला पकडण्यात आले. गंभीर बाब म्हणजे दलालाने त्याला सहा लाख रुपयांमध्ये भारतीय पारपत्र व बनावट व्हिसा बनवून दिला होता.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 12 Jun 2024
सातारा : आंतरजातीय व धर्मीय विवाह वधू वर सूचक केंद्र अंनिस सुरू करणार! राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

वाई: जाती निर्मूलनाच्या दिशेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आश्वासक पाऊल टाकले आहे. आंतरजातीय व धर्मीय विवाह वधू वर सूचक केंद्र अंनिस सुरू करणार आहे. ‘अंनिस’च्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती हमीद दाभोलकर यांनी दिली.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 12 Jun 2024
Maharashtra Political News Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्राबाबूंच्या शपथविधीसाठी उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे इतर केंद्रीय नेत्यांसह विजयवाडा येथे चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. चंद्राबाबू यांनी आज तिसऱ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह काही निवडक आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

11:47 (IST) 12 Jun 2024
प्रियकराचा गळा आवळून खून करणाऱ्या प्रेयसीला जन्मठेप… काय आहे प्रकरण?

मुजावर आणि तुलसी चिंचवड परिसरातील एका कपडे विक्री दालनात कामाला होते.

सविस्तर वाचा…

11:44 (IST) 12 Jun 2024
गडचिरोली : भूमाफियांच्या इशाऱ्यावर बनवला विकास आराखडा, अवैध भूखंडातून माफियांची शेकडो कोटींची कमाई

गडचिरोली : ३०० कोटींच्या संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्या सासऱ्याची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या गडचिरोली येथील नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिने नागरिकांच्या हरकती बाजूला ठेऊन भूमाफियांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा विकास आराखडा प्रारुप बनविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सविस्तर वाचा…

11:06 (IST) 12 Jun 2024
मुंबई : ‘एमएमआरडीए’ची वसुलीवर भिस्त; पालिकेकडे चार हजार, तर सरकारकडे साडेतीन हजार कोटींची थकबाकी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कर्ज घेतले आहे. त्यासाठी एमएमआरडीएला आणखी निधीची आवश्यकता आहे. मात्र तिजोरीत खडखडाट असल्याने एमएमआरडीएने मुंबई महापालिकेकडील चार हजार कोटी आणि राज्य सरकारकडील सुमारे तीन हजार ५०० कोटी रुपयांचा थकबाकीचा पाठपुरावा सुरू केला आहे.

सविस्तर वाचा….

10:56 (IST) 12 Jun 2024
मुंबई: १७३ दुकानांचा ई – लिलाव लांबणीवर

दुकानांच्या ई-लिलावासाठी म्हाडाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

10:56 (IST) 12 Jun 2024
लोकसभा निवडणुकीत फटका बसताच एसटी कर्मचाऱ्यांच्या कोविड भत्त्याची आठवण! संघटना म्हणतात…

करोनाच्या कठीण काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता जाहीर झाला होता.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 12 Jun 2024
‘एमएसएमई’ संचालक प्रशांत पार्लेवारला अटक, बहिण अर्चना पुट्टेवारसोबत मिळून हत्याकांडाचा कट

२२ मे रोजी मानेवाडा रोडकडून बालाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर एका भरधाव कारने पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली होती.

सविस्तर वाचा…

10:54 (IST) 12 Jun 2024
कृष्णा खोऱ्यातील महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करू; अलमट्टी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांची ग्वाही

कृष्णा खोऱ्याला बसणारा महापुराचा तडाखा रोखण्यासाठी गेली पाच ते सहा वर्षे कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

10:53 (IST) 12 Jun 2024
कोल्हापूरमध्ये आढळला ‘पांढरा चिकटा’; डॉ. मकरंद ऐतवडे यांचे संशोधन

हा वृक्ष मूळचा ऑस्ट्रेलिया खंडातील असून तो आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक आयलँड्स या भागातही पाहावयास मिळतो.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 12 Jun 2024
शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा लागेल, हसन मुश्रीफ यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा; व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील साधारणत: ४० गावांमधून जातो. या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचे संकट ओढवले आहे.

सविस्तर वाचा…

10:48 (IST) 12 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live: डोंबिवलीतील अभिनव शाळेजवळील कंपनीला भीषण आग

या आगीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील रस्तेवाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी नोकरीच्या ठिकाणी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप होत असून कामावर पोहोचायलाही दिरंगाई होत आहे.

10:47 (IST) 12 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live: डोंबिवलीतील अभिनव शाळेजवळील कंपनीला भीषण आग

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच डोंबिवली एमआयडीसीत आगीची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा आग लागली आहे.

10:46 (IST) 12 Jun 2024
Mumbai Maharashtra News Live: डोंबिवलीतील एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीच्या परिसरात पुन्हा एकदा आग लागली असून स्फोटांचे आवाजही येत आहेत. नेमके स्फोट कशाचे होत आहेत याचा अंदाज अ्याब आलेला नाही. अभिनव शाळेजवळील कंपनीत ही आग लागली आहे.

10:44 (IST) 12 Jun 2024
Manoj Jarange Patil Protest Live : सरकारकडून लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन – जरांगे पाटील

आमदार राजेंद्र राऊत सरकारचा निरोप घेऊन आले होते. विषय लवकर तडीस नेतो असं आश्वासन दिलं आहे – जरांगे पाटील

10:43 (IST) 12 Jun 2024
Manoj Jarange Patil Protest Live : मी मरायला घाबरत नाही – जरांगे

मी मराठा समाजासाठी खंबीर आहे. सरकारकडून आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर मी लावलेली सलाईन काढून टाकेन. मी मरणाला घाबरत नाही – मनोज जरांगे पाटील

10:42 (IST) 12 Jun 2024
Manoj Jarange Patil Protest Live : “देशानं मराठ्यांच्या एकजुटीचा धसका घेतलाय”

मराठा समाजाला एकजूट दाखवायची गरज नाही. २-४ लाख लोक आंतरवली सराटीकडे येत आहेत. तुम्ही इकडे येऊ नका. शेतीची कामं पूर्ण करा. सगळ्या देशानं आपली एकजूट बघितली आहे. मराठ्यांच्या एकजुटीचा देशानं धसका घेतला आहे – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Maharashtra News Live: आंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा आंदोलन!