Maratha Reservation Morcha Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा शुक्रवारी मुंबईत धडकणार आहे. ही यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या हाचलाची सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत. तर, आज ( २५ जानेवारी ) महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रीत करण्यात आलं आहे. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…

Live Updates

Maharashtra News Today 25 January 2024 : महाराष्ट्रातील विविध घडामोडी फक्त क्लिकवर...

19:42 (IST) 25 Jan 2024
पालघर: प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य संकुलांना रोषणाई

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पालघरमधील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद कार्यालय येथे आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे सायंकाळच्या काळोखात मुख्य संकुलाचे हे तिरंग्यातील रूप नागरिकांना सुखावत आहे.

18:30 (IST) 25 Jan 2024
Maratha Aarakshan Morcha : मराठा मोर्चेकरी हळूहळू नवी मुंबईत दाखल, ५०० पेक्षा अधिक लोकांनी केले जेवण

मराठा आरक्षण मागणी साठी निघालेल्या मोर्चाने लोणावळ्यातून पनवेल कडे कूच केली आहे. अशात अनेक आंदोलकांनी थेट नवी मुंबई गाठली. आता आमचा मुक्काम येथेच असून आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

वाचा सविस्तर...

18:10 (IST) 25 Jan 2024
अमली पदार्थ तस्कर अली असगर शिराजी प्रकरण : देशभरात १३ ठिकाणी ईडीचे छापे

मुंबई: आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्कर कैलास राजपूतचा साथीदार अली असगर शिराजीप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबई, लखनऊ, दिल्ली व अहमदाबाद येथील ठिकाणांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

18:09 (IST) 25 Jan 2024
गडचिरोली : नक्षल्यांशी मुकाबला करणाऱ्या १९ जवानांना पोलीस ‘शौर्य’ पदक, सोमय मुंडेंना राष्ट्रपती पदक

गडचिरोली : नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश ठेवत धाडसाने चोख प्रत्युत्तर देणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील १८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य तर एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील १९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवल्याने ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

सविस्तर वाचा...

17:52 (IST) 25 Jan 2024
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोघांना अटक

वाळवा तालुययात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गोटखिंडी येथे अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी गुरूवारी दिली. सविस्तर वाचा…

17:51 (IST) 25 Jan 2024
Raisins In Sangli : नवीन बेदाण्यासाठी किलोला १६१ रुपयांचा दर

सांगली बाजार समितीमध्ये नवीण बेदाण्याला मुहुर्ताच्या सौद्यामध्ये हिरव्या बेदाण्याला  १६१ तर पिवळ्या बेदाण्याला १५१ रूपये प्रतिकिलो दर मिळाला. सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते यंदाच्या हंगामातील बेदाणा सौद्यांना प्रारंभ करण्यात आला. सविस्तर वाचा…

16:59 (IST) 25 Jan 2024
ऊर्जामंत्र्यांच्या शहरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण…

कर्मचाऱ्याने वीज देयक थकवणाऱ्याचा पुरवठा खंडित केल्यावर ही मारहाण झाली. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांचे या ग्राहकाशी साटेलोटे होते काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 25 Jan 2024
Maratha Aarakshan Morcha : मराठा मोर्चा लोणावळ्याहून निघाला, रात्री बारा वाजता नवी मुंबईत मोर्चा पोहोचणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत असून लोणावळ्याहून मराठा मोर्चा निघाला आहे, मराठा मोर्चा नवी मुंबई कधी पोहोचणार याची उत्सुकता असून हा मोर्चा उलवे मार्गे नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथून पांभीज मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे येणार आहे.

वाचा सविस्तर...

16:44 (IST) 25 Jan 2024
सूरज चव्हाणांना न्यायालयीन कोठडी, जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा

करोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ईडी कोठडीत असलेल्या सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांना मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर न्यायमूर्ती एम.जी देशपांडे यांनी चव्हाणांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाीनं कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

16:39 (IST) 25 Jan 2024
भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती; अनेक भागांमधील पाणीपुरवठा खंडित

भांडुप पश्चिम येथील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्यानजीक गुरुवारी सकाळी १८०० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीतून अचानक गळती सुरू झाली. ही बाब निदर्शनास येताच महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. सविस्तर वाचा…

16:38 (IST) 25 Jan 2024
कामाठीपुरा पुनर्विकास : सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी तीन कंपन्या उत्सुक

दक्षिण मुंबईतील कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. सविस्तर वाचा…

16:20 (IST) 25 Jan 2024
हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका

पनवेल : लोणावळा येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा संपताच गुरुवारी दुपारी मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविणारे राज्यातील कानाकोप-यातून मराठा समर्थक मुंबईकडे शहरीवस्तींमध्ये ठिकठिकाणी थांबून आपला जल्लोष व्यक्त करत आहेत. यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरुन मराठा समर्थकांची फेरी येणार नसली तरी पनवेल ते शीव महामार्गावर गुरुवारी दुपारी मराठा समर्थकांनी भरलेली वाहने येऊ लागली होती. कामोठे वसाहतीच्या उड्डाणपुलाखाली या समर्थकांनी हलगी, ढोलताशांच्या वाद्यांवर ठेका धरत प्रवासी व नागरिकांचे लक्ष वेधले.

16:15 (IST) 25 Jan 2024
सामान्य माथाडी कामगारांकडून मराठा समर्थकांना करंजाडेत पाच हजार शहाळे

पनवेल : माथाडी कामगारांची टोळी क्रमांक २२४३ आणि ४६३ मधील कामगारांनी लोकवर्गणीतून लोणावळा येथून मुंबईकडे जाणा-या मराठा समर्थकांसाठी पाच हजार शहाळे वाटपाची गुरुवारी सोय केली. या माथाडी कामगारांचे मुकादम किरण दिडवळ यांनी दिलेल्या माहितीनूसार आपलाही हातभार या आंदोलनात असावा यासाठी माथाडी कामगारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अ‍ॅग्रोनिक्स कोकोपाणी या कंपनीकडून ही शहाळे खरेदी केल्याची माहिती दिली.

शहाळ्यांसोबत जेवणाची पाकीटे करंजाडे येथे मराठा समर्थकांना दिली जात होती. मराठा समर्थकांसोबत बंदोबस्ताला असलेल्या पोलीसांचा यानिमित्ताने न्याहारीचा प्रश्न सुटला. पळस्पे ते गव्हाण फाटा या मार्गावर करंजाडे येथे वाटपाची सोय करण्यात आली होती. हात दाखवून या मार्गावरुन नवी मुंबईच्या दिशेने जाणा-या आंदोलकांना थांबवून त्यांना जेवणाचे पाकीटे दिले जात होते. पनवेल महापालिकेने या ठिकाणी २८ शौचालये आणि १५ पिंप पाण्याने भरलेले सोय केल्याचे दिसले.

16:10 (IST) 25 Jan 2024
खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…

नागपूरसह राज्यात सोन्याच्या दरांमध्ये सतत चढ- उतार होण्याचा क्रम थांबण्याचे नाव घेत नाही. २४ जानेवारीच्या रात्री २४ कॅरेट सोन्याचे दर ६३ हजार रुपये प्रति दहा ग्रामवर गेले होते.

सविस्तर वाचा...

15:33 (IST) 25 Jan 2024
जरांगे पाटीलांचे समर्थक पनवेलमधून जेवणाची शिदोरी घेऊन वाशीकडे मार्गस्थ

पनवेल मराठा समाजाचे असंख्य समर्थक पुणे लोनावळा येथून निघून काही तासांत जुन्या पुणे मुंबई मार्गावरुन पनवेलमध्ये दाखल होणार आहेत. हजारो मोटारी त्यांमध्ये लाखो मराठा समाजाचे समर्थक यांच्यासाठी पाच लाखजण जेवतील तसेच आठ ते १० लाख बाटलीबंद पाण्याचे वाटपासाठी रायगड आणि पनवेलच्या समर्थकांनी ही सोय केली आहे.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 25 Jan 2024
मुंबई : व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

मुंबई : व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर खोटा संदेश पाठवणाऱ्याविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शस्त्रधारी व्यक्तींना अणुशक्ती नगर परिसरात पकडण्यात आल्याचा खोटा संदेश आरोपीने समाजमाध्यमांवर पसरवला होता. त्यामुळे ट्रॉम्बे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत निष्पन्न झाले. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी स्वतः गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 25 Jan 2024
कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण

कल्याण – शिधावाटप कार्यालयात अधिकारी आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका शिधावाटप मध्यस्थाला चार जणांनी लाथाबुक्की आणि लोखंडी सळईने बेदम बुधवारी मारहाण केली आहे. या मारहाणीत मध्यस्थाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

सवस्तर वाचा...

15:22 (IST) 25 Jan 2024
मुंबईत गारठा कायम

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी अधिक असून गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात चांगलाच गारठा जाणवत आहे.

सविस्तर वाचा...

15:22 (IST) 25 Jan 2024
अधिवेशनाचा नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला राजकीय फायदा किती ?

नाशिक : १९९४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकमधूनच राज्यातील सत्तेसाठी ‘दार उघड बये दा’ अशी साद घातली होती. तशीच साद उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नाशिकमधील अधिवेशनात घातली आहे. पक्षात पडझड झाल्यानंतर या अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला असला तरी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला कितपत यश मिळते यावर सारे चित्र अवलंबून असेल.

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 25 Jan 2024
महालक्ष्मी रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय थीम पार्कचा अद्याप निर्णय नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

महालक्ष्मी रेसकोर्सच्या सुमारे १२० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय थीम पार्क विकसित करण्याविरोधात याचिका करण्यात आल्या असल्या, तरी या थीम पार्कबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला. सविस्तर वाचा…

14:59 (IST) 25 Jan 2024
महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठक, वंचितला दोन तासाआधी निमंत्रण

महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण देण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एक्स' अकाउंटवरून माहिती दिली आहे.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1750429697874288850

14:52 (IST) 25 Jan 2024
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द

बेदरकारपणे वाहन चालवून भटक्या श्वानाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याच्या आरोपाप्रकरणी २० वर्षांच्या विद्यार्थ्यांवरील फौजदारी कारवाई सुरू राहिल्यास त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीसह भवितव्यावर परिणाम होईल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, त्याच्यावरील गुन्हा रद्द केला. सविस्तर वाचा…

14:51 (IST) 25 Jan 2024
गुप्तचर विभागाकडील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!, राज्यातील एटीएस आता आत्मनिर्भर

राज्यातील दहशतवादविरोधी पथकाकडून आतापर्यंत प्रामुख्याने गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जोरदार कारवाई केली जात होती. सविस्तर वाचा…

13:56 (IST) 25 Jan 2024
"महाविकास आघाडीतील दोन बडे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार", 'या' नेत्याचं मोठं विधान

"महाविकास आघाडीतील दोन बडे नेते लवकरच भाजपात प्रवेश करतील. काही दिवस वाट पाहा, मुहूर्त शोधला गेला आहे. विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात येण्यासाठी हे इच्छूक आहेत," असं भाजपा नेते, आशिष देशमुखांनी सांगितलं.

13:17 (IST) 25 Jan 2024
यवतमाळ : शेतकऱ्यांना परदेशात ‘अभ्यास दौर्‍या’ची संधी; लाभार्थी नेमके कोण राहणार?

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 25 Jan 2024
मीरा रोड दंगल प्रकरणात १० गुन्हे, १९ जणांना अटक; दंगलीमागे पूर्वनियोजित कट नसल्याचे स्पष्ट

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मीरा रोडमध्ये आयोजित मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर नया नगर परिसरात दंगल उसळली होती.

सविस्तर वाचा...

12:32 (IST) 25 Jan 2024
"मुंबईत जाणारच, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," जरांगे-पाटील ठाम

"आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी, मग मुंबईत जाणारच... आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मी समाजाचा शब्द मोडत नाही. आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता काम नये," असं मनोज जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.

11:54 (IST) 25 Jan 2024
‘भाजी खाया’, ‘अंडी खाया’… शालेय विद्यार्थ्यांची नवी ओळख संताप निर्माण करणारी

लहान सहान बाबींवरून मुले एकमेकांना चिडवत असतात. असे जर ओळखपत्रावर ठिपके दिसले तर ते एकमेकांना नक्कीच चिडवतील, असे गावंडे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

11:32 (IST) 25 Jan 2024
मुख्यमंत्री शिंदे जरांगे-पाटलांशी संवाद साधण्याची शक्यता, सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनधारणीचे प्रयत्न सुरू

मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात पोहोचली आहे. मुंबईत पोहोचण्याआधी सरकारकडून जरांगे-पाटील यांची सरकारकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जरांगे-पाटलांशी चर्चा करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून जरांगे-पाटलांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

11:31 (IST) 25 Jan 2024
Money Mantra : पोस्ट ऑफिसची सर्वाधिक व्याज देणारी जबरदस्त योजना, तुम्हाला दरमहा २००५० रुपये कमवता येणार

पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळवू शकतात.

सविस्तर वृत्त

Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे विचार सोडणाऱ्या, सत्तेसाठी काँग्रेसचे तळवे चाटणाऱ्या उद्धव ठाकरेंना मिंधेपणा बद्दल बोलण्याचा अधिकार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे (ता महाबळेश्वर) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत.

Story img Loader