Maratha Reservation Morcha Today : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा शुक्रवारी मुंबईत धडकणार आहे. ही यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या हाचलाची सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत. तर, आज ( २५ जानेवारी ) महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला निमंत्रीत करण्यात आलं आहे. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today 25 January 2024 : महाराष्ट्रातील विविध घडामोडी फक्त क्लिकवर…

11:29 (IST) 25 Jan 2024
Money Mantra : सामान्य करदात्याला बजेटकडून किती अपेक्षा? अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून काय निघणार?

Union Budget 2024 : सामान्य वैयक्तिक करदात्यांना(Income Tax) या केंद्रीय अर्थसंकल्पा (Union Budget 2024) कडून प्राप्तिकराच्या बाबतीत दिलासा मिळू शकतो..

सविस्तर वृत्त

11:23 (IST) 25 Jan 2024
नागपूर : चार लाखांत उपसरपंचाच्या हत्येची सुपारी; गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक

गावातील निवडणुकीत हार पत्करावी लागल्यामुळे चिडलेल्या पराभूत उमेदवाराने उपसरपंचाचा खून करण्याची चार लाखांत सुपारी दिली होती.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 25 Jan 2024
ताडोबात वाघाच्या हल्ल्यात गाईडचे वडील ठार

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निमढेला गेटजवळ गाईड रणजित हनवते याचे वडील रामभाऊ रामचंद्र हनवते (५४) यांच्यावर वाघाने हल्ला करून घटनास्थळीच ठार केले. ही घटना गुरुवार, २५ जानेवारीच्या सकाळी घडली. रामभाऊ हनवते सकाळच्या सुमारास शेतावर जाण्यासाठी घरून बाहेर पडले. शेतात जात असताना रस्त्यात जंगलामध्ये वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात रामभाऊ हनवते यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. पंचनामा सुरू आहे.

10:58 (IST) 25 Jan 2024
बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम

अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यच असल्यामुळे महिला तक्रारच देत नाहीत.

सविस्तर वाचा…

10:05 (IST) 25 Jan 2024
पुणे गारठले; महिनाअखेर थंडी काम, ‘एनडीए’त नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

शहर आणि परिसरात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. शिवाजीनगरमध्ये ९.७ तर एनडीएत ८.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. शहर आणि परिसरात हवेतील गारठा महिनाअखेर कायम राहण्याचा अंदाज आहे.

वाचा सविस्तर…

10:00 (IST) 25 Jan 2024
“शर्यत शेवटच्या टप्प्यात, आरक्षणाची ही शर्यत…”, पहाटे चार वाजता मनोज जरांगे पाटील यांचं भाषण

सर्व मराठयांनी २६ जानेवारी रोजी मुंबईला यावं असं आवाहन करत गेली दोन दिवस झाले सतत बोलत असल्याने माझा आवाज कमी झाला आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

सविस्तर वाचा…

09:59 (IST) 25 Jan 2024
“…तर ओबीसी आरक्षण टिकणार नाही”, प्रकाश आंबेडकरांचा सूचक इशारा

“दोन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत १२ ते १३ खासदार ओबीसींचे निवडून गेले नाही तर आरक्षण टिकवणं कठीण राहिल,” असा सूचक इशारा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे विचार सोडणाऱ्या, सत्तेसाठी काँग्रेसचे तळवे चाटणाऱ्या उद्धव ठाकरेंना मिंधेपणा बद्दल बोलण्याचा अधिकार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे (ता महाबळेश्वर) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत.