Maharashtra News Updates Today, 26 October 2023 : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे काही मराठा समाजातील आक्रमक तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा झाला. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
Mumbai News Updates in Marathi : राज्यातील राजकारणासह दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…
अमरावती: पर्यटन कंपनीच्या संकेतस्थळावर रेटींग दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३२ लाख ८५ हजार ३७४ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
पीएमपीचे अध्यक्ष सचिन्द्र प्रताप सिंह यांची तीन महिन्यांच्या कालावधीत बदली करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षांत २० अध्यक्ष पीएमपीला लाभले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात शिर्डीत दाखल होणार, ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा साई बाबांच्या नगरीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागतासाठी शिर्डीत दाखल, निळवंडे धरण, शिर्डी संस्थानाच्या नव्या इमारतीसह ७ हजार ५०० कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण करणार, शिर्डीत चोख पोलीस बंदोबस्त
अभ्यासादरम्यान सूर्योदयाच्या वेळी आयनावरणातील रेडिओ लहरींचा विस्कळीत होणारा गुणधर्म अनपेक्षितपणे बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
ठाणे- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीव्र कुपोषित मुलांमध्ये सुधारणा व्हावी आणि जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण घटावे यासाठी जिल्हा परिषदेने दत्तक पालक यो़जना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी तीव्र कुपोषित मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या आहारावर विशेष लक्ष ठेवणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकापासून मुळशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा पडल्याचा आरोप समाजमाध्यमातून केला आहे.
अकोला: २८ ऑक्टोबरच्या रात्री होणारे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून बघता येणार आहे. सुमारे सव्वा तास नुसत्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहता येईल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
महाविकास आघाडीचे सरकार असताना हा प्रस्ताव रखडला होता.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याची ट्रायल रन अर्थात चाचण्या नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहेत.
यवतमाळ: पूर्ववैमनस्यातून गळा आवळून तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर दोन्ही हातपाय बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. ही घटना पुसद येथील तवक्कल शहाबाबा दरग्याजवळ उघडकीस आली.
नागपूर: अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमात डेटा सायन्सचा समावेश करण्यात येत आहे. तसेच, डेटाशी संबंधित नव्या उद्योगांमध्ये तरुणांच्या हातांना काम मिळत आहे.
पुण्यातील त्यांच्या कार्यक्रमाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
नागपूर: दोन महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर युवकाने पत्नीसह संसार सुरु केला. मात्र, युवकाच्या प्रेयसीने लग्नाची गळ घातली. संभ्रमात सापडलेल्या युवकाने प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा खून केला.
नागपूर: पत्नीशी वाद झाल्यानंतर सासूने भांडणात उडी घेतली. चिडलेल्या जावायाने सासूला मारण्याची धमकी देऊन भांडण केले.
अकोला: सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात एलटीटी-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
महापालिकेने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी निवासस्थाने आणि महापौर बंगल्यातच जलमापक बसविला नसल्याची बाब पुढे आली आहे.
नागपूर: २४ तारखेला विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात होणाऱ्या गर्दीचा फायदा महामेट्रोला झाला. मंगळवारी एकाच दिवशी मेट्रोतून सुमारे १.१३ लाख प्रवाशांनी प्रवास केला.
महाराष्ट्रात अशा घटनांची मालिका सुरू आहे. पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झालेली ही मालिका आज माझ्या घरावरील हल्ल्यापर्यंत येऊन ठेपली आहे. बस झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले, अशा मनोज जरांगेंना क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट, सेक्शन ७ नुसार तातडीने अटक करा. त्यांच्या मुसक्या बांधा, कारवाई करा.
– गुणरत्न सदावर्ते
गडचिरोली: आदिवासीबहुल भागाचा जलद विकास व्हावा यासाठी पेसा कायदा लागू केलेला आहे. मात्र, चुकीच्या नोंदिमुळे जिल्ह्यातील ओबीसीबहुल गावांचा समावेश देखील अनुसूचित क्षेत्रात करण्यात आला होता.
चंद्रपूर: राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीपुर्वी या निवडणूकीत आपल्याला सत्ता मिळावी, या लालसेपोटी संस्थेतील एका संचालकाने आपल्या नातलग व्यक्तींना सामिल करीत अन्य संचालकांच्या घरी जाऊन सोफ्यात काळा धागा बांधून हळद, कुंकू लावून काही अवांछनीय वस्तू ठेवल्या.
यवतमाळ: रात्रगस्तीवर असलेले कळंब पोलीस ठाण्याचे वाहन करळगाव घाटातील दरीत कोसळले. रानडुक्कर आडवे आल्याने चालकाचा वाहनवरील ताबा सुटून ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
नागपूर: उपराजधानीत पुन्हा एकदा खूनसत्र सुरु झाले असून गेल्या चोवीस तासांत दोन हत्याकांडांनी शहर हादरले आहे. सध्या सण-उत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाच हत्याकांड घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे : घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा आणि पातलीपाडा या तीन पुलांच्या नुतनीकरणाचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत पहिल्या टप्प्यात कापूरबावडी पूलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे दीड ते दोन महिने ही कामे सुरू राहतील. आधीच मेट्रोची कामांमुळे कोंडी होत असताना आता पुलांच्या नुतनीकरण कामामुळे कोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.
ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून वाहतुक बदल लागू करण्यात आले असून यानुसार या रस्त्यावरील पर्यायी मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरपर्यंत हे वाहतुक बदल लागू असणार आहे, असे वाहतुक पोलिसांनी स्पष्ट केले.
उल्हासनगर: दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांवर येणारा भार लक्षात घेऊन डोंबिवलीजवळील काटई नाका ते अंबरनाथ हा रस्ता काँक्रीटचा करण्याचे ठरवले. त्याचे कामही बहुतांशी पूर्ण झाले. परंतु या रस्त्याच्या दोन काँक्रिट तुकड्यांना जोडण्याचे काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याचे काँक्रीटीकरण करूनही रस्त्यावर खड्ड्यांचा अनुभव येतो आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाबाहेर चक्क ‘मी माझ्या पगारावर समाधानी आहे’ अशा आशयाचा फलक लावत गैरमार्गाने काम करू इच्छिणाऱ्यांना एकप्रकारे चाप लावला आहे.
गुरुवारी पहाटे दोन अपघातांच्या वृत्ताने जिल्हा हादरला आहे.
जयेशने जखमी आईला मोकळ्या जागेत नेले. तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला पेटवून दिले.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज एकदाच दिल्ली, आग्र्याला गेले आणि सगळ्या खानांना, दिल्लीश्वरांना धडा शिकवून आले. एकनाथ शिंदेंना चहा घेऊ का, पाणी पिऊ का, जेवण करू का, झोपू का हे सर्व विचारायला दिल्लीत जावं लागतं. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
– संजय राऊत (खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)
महाराष्ट्रातील नेते वारंवार दिल्लीत जात आहेत. यापर्वी असं होत नव्हतं. एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत असा दावा करतात. मी बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असाही ते दावा करतात. मात्र, दिल्लीने एकनाथ शिंदेंचं दारातील पायपुसणं केलं आहे. त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागत आहे.