Maharashtra News Updates Today, 26 October 2023 : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे काही मराठा समाजातील आक्रमक तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा झाला. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai News Updates in Marathi : राज्यातील राजकारणासह दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

10:37 (IST) 26 Oct 2023
पंतप्रधान आज शिर्डी दौऱ्यावर; निळवंडे धरणासह विविध विकासकामांचे लोकार्पण

उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे, तसेच अन्य विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येत आहेत. या जोडीने मोदींच्या उपस्थितीत येथे एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. हजारोंच्या उपस्थितीत हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे या दौऱ्याचे आयोजक महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण  विखे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

10:23 (IST) 26 Oct 2023
महाराष्ट्रातील भाजपा नेते भ्रष्ट व अकार्यक्षम असल्यामुळे ते मोदींना बोलावत आहेत – संजय राऊत

या राज्यातील नेतृत्व भ्रष्ट आणि अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना वारंवार महाराष्ट्रात बोलावत आहेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते मणिपूर आणि जम्मू काश्मीर सोडून देशात कुठेही जातात. उद्या ते इस्रायललाही जाऊ शकतात. मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. ते पंतप्रधान आहेत, भाजपाचे सन्माननीय नेते आहेत.

– संजय राऊत (खासदार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)

10:18 (IST) 26 Oct 2023
“पंतप्रधान मोदी वारंवार महाराष्ट्र दौरे करत आहेत, कारण…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रात, मुंबईत आणि शिर्डीत इकडे तिकडे फिरत आहेत. कारण त्यांनी महाराष्ट्रात जो जुगाड केलाय तो हरणार आहे हे दिसत आहे. त्यामुळे एका भितीतून, एका निराशेतून हे दौरे सुरू आहेत. असं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येण्याविषयी कोणतीही बंधनं असू शकत नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदींना वारंवार राज्यात बोलावत आहेत कारण त्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

10:14 (IST) 26 Oct 2023
VIDEO: गाड्यांची तोडफोड, संतापलेल्या गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुलगी आणि पत्नीला उचलून…”

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स