Maharashtra News Updates Today, 26 October 2023 : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे काही मराठा समाजातील आक्रमक तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा झाला. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणासह दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai News Updates in Marathi : राज्यातील राजकारणासह दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

18:38 (IST) 26 Oct 2023
मुंबई: विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या स्कुल व्हॅन चालकाला अटक

मुंबई: गाडीत एकटीच असलेल्या विद्यार्थिनीला मोबाइलमध्ये अश्लिल व्हिडीओ दाखवून स्कुल व्हॅन चालकाने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार चेंबूर परिसरात घडला.

सविस्तर वाचा…

18:16 (IST) 26 Oct 2023
पुणे: मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील दोघे पडले… विचारपूस सुरू असताना दोघांनी मोटारच पळवून नेली

पुणे: बाणेर रस्ता येथील संचार भवन परिसरात एका मोटारचालकाच्या मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी खाली पडले. ‘तुम्हाला काही लागले आहे का?’ अशी विचारपूस सुरू असताना या दोघांनी मोटारच पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.

सविस्तर वाचा…

18:15 (IST) 26 Oct 2023
अजित पवार यांना बारामती बंदी? मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका आता सर्वपक्षीय नेत्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कराखान्याच्या मोळी पूजनाला येण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

वाचा सविस्तर…

17:37 (IST) 26 Oct 2023
मोहगावच्या गावकऱ्यांनी निवडणूक टाळली, सरपंचासह सदस्य बिनविरोध

हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिलपी गावातील नागरिकांनी सर्वसहमतीने निर्णय घेत ग्रामपंचायतीसाठी निवडणूक न घेता सर्व सदस्यांची बिनविरोध निवड केली. जिल्ह्यात ग्राम पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

17:21 (IST) 26 Oct 2023
रावण दहन परंपरेचा विरोध! रावणाच्या मंदिरासाठी मिटकरींनी दिला २० लाखांचा निधी

अकोला: भारतात श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे, ही सर्वसामन्य बाब. मात्र, अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते.

सविस्तर वाचा…

17:15 (IST) 26 Oct 2023
“ललित पाटील प्रकरणात चौकशीला सहकार्य करु”, विनायक पांडे यांचे आश्वासन

दादा भुसे त्यावेळी राज्यमंत्री होते. पक्ष प्रवेश सोहळ्यास तेही उपस्थित होते, असे पांडे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

16:51 (IST) 26 Oct 2023
‘अग्निवीर’ ही सेनेत फूट पाडणारी योजना; कर्नल (नि.) रोहित चौधरी म्हणाले, ‘देशाची सुरक्षा धोक्यात…’

ही योजना भारतीय सेनेत उभी फूट पाडणारी असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा घणाघाती आरोप चौधरी यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…

16:45 (IST) 26 Oct 2023
“मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो…”; अजित पवारांनी सांगितला तो संवाद

मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो पाणी महत्त्वाचं आहे. ठिबकचा वापर करा. पाण्याची जितकी बचत करता येईल तितकी बचत करा. तरच आपल्या सर्व शेतकऱ्यांना ते पाणी मिळेल. खूप लोकांची जमीन जुमला, घरं दारं त्या निळवंडे धरणात गेली आहेत. त्यानंतर ते पाणी इतरांना मिळणार आहे. जवळपास १८२ गावांना हे पाणी देण्याचं काम होत आहे.

– अजित पवार (उपमुख्यमंत्री)

16:42 (IST) 26 Oct 2023
“माझं आजोळ नगर जिल्हा, मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा…”; अजित पवारांचा जुन्या राज्यकर्त्यांवर हल्लाबोल

माझं आजोळ नगर जिल्हा आहे. मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं. निवडणुका आल्या की, नारळ फोडायचा आणि आम्ही आता निळवंडे करणार असं सांगितलं गेलं. बघता बघता तीन पिढ्या यात गेल्या. हे साडेआठ टीएमसीचं धरण आहे. पावणेदोन लाख एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल.

– अजित पवार (उपमुख्यमंत्री)

16:17 (IST) 26 Oct 2023
…म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – अजित पवार

गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे. महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती. त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

– अजित पवार

16:07 (IST) 26 Oct 2023
रायगड पोलिसांतर्फे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान; बचत गटाच्या प्रमुखांना मोबाईल फोन देणार, पालकमंत्री सामंत यांची घोषणा

रायगड पोलीस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १८ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.

सविस्तर वाचा…

16:06 (IST) 26 Oct 2023
पूर्व विदर्भाची रुग्णसेवा सलाईनवर, स्थायीच्या मागणीसाठी सामुदायीक आरोग्य अधिकारीही संपात

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी- अधिकारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी २५ ऑक्टोबरला सुरू झालेल्या संपात गुरूवारी (२६ ऑक्टोबर) सामुदायीक आरोग्य अधिकाऱ्यांनी उडी घेतली.

सविस्तर वाचा…

15:55 (IST) 26 Oct 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राधाकृष्ण विखेंकडून महाराष्ट्रातील दुष्काळावर भाष्य, म्हणाले, “आज…”

महाराष्ट्रात आज दुष्काळी परिस्थिती आहे. मी देवेंद्र फडणवीसांना याबाबत सांगितलं आहे. माझ्या वडिलांनी आणि गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना केली होती. यामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्हा, नाशिक, मराठवाडा या भागाला पाणी देण्याविषयी त्यांनी मांडणी केली होती. त्याविषयी फडणवीस बोलतील.

– राधाकृष्ण विखे पाटील

15:50 (IST) 26 Oct 2023
वाशी उड्डाणपुलावर चार चाकी जळाल्यामुळे मानखुर्द वाशी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबईच्या दिशेने वाशीकडे येताना वाशी उड्डाणपुलावर एक चार चाकी जळून खाक झाली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत असून वाशी उड्डाण पुलापासून मानखुर्द उड्डाणपुलाच्या पाठीमागे पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे वाशी वरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मात्र सुरळीत असल्याचे चित्र आहे.

15:32 (IST) 26 Oct 2023
शिवाजी महाराजांना अभिवानद करत शिर्डीतील नमो शेतकरी महासन्मान मेळाव्याला सुरुवात

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवान करून शिर्डीतील काकडी येथे नमो शेतकरी महासन्मान मेळाव्याला सुरुवात, राधाकृष्ण विखे पाटलांकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान

15:24 (IST) 26 Oct 2023
“माळ घालाल तर घरी येतो…” सातारकर महाराजांच्या नागपुरातील या आहेत आठवणी….

नागपूर: प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांचा निधनाचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. त्याचे आणि विदर्भाचे वेगळेच नाते होते. प्राचार्य राम शेवाळकर आणि बाबा महाराज सातारकर यांच्यात स्नेह होता.

सविस्तर वाचा…

15:16 (IST) 26 Oct 2023
चाकणमधील वाहतूक कोंडी सुटणार, प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

पिंपरी: चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत. तळेगाव, आंबेठाण चौकातील महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसचे थांबे शंभर मीटर पुढे नेले जाणार आहेत. मजूर अड्डा दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

15:07 (IST) 26 Oct 2023
नीरा ते लोणंद आता रेल्वे सुसाट! रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण

नीरा ते लोणंद स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर रेल्वे गाडीची प्रति तास ११७ किलोमीटर वेगाची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली.

सविस्तर वाचा…

14:48 (IST) 26 Oct 2023
रिक्षा, कॅबचालकांनी बंद करताच आरटीओ ॲक्शन मोडवर! ओला, उबरची बैठक घेणार

पुणे: ओला, उबर कंपन्यांच्या विरोधात रिक्षा आणि कॅब संघटनांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. या कंपन्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

14:16 (IST) 26 Oct 2023
२८ ऑक्टोबरला दिसणार वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण

चंद्रपूर: २८ ऑक्टोबर २०२३ ला मध्यरात्री या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. हे ग्रहण भारता सहित आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,आष्ट्रेलिया खंडातून दिसेल.

सविस्तर वाचा…

13:51 (IST) 26 Oct 2023
पिंपरी-चिंचवडकरांची पसंती दुचाकीला

पिंपरी: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडवासीयांनी दुचाकीखरेदीला पसंती दिली. चार हजार ७२ दुचाकी आणि दोन हजार ४५१ मोटार खरेदी केल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:46 (IST) 26 Oct 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीतून निळवंडे धरणाकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून साई बाबांचं दर्शन, शिर्डी संस्थानच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर मोदी निळवंडे धरणाकडे रवाना, थोड्याच वेळात निळवंडे कालव्यांचं लोकार्पण करणार

13:36 (IST) 26 Oct 2023
नाशिक लोकसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी; कार्यपुस्तकाद्वारे मतदार संघात प्रचार

महायुतीत नाशिक लोकसभेची जागा कुणाकडे जाईल, हे अद्याप निश्चित नाही.

सविस्तर वाचा…

13:27 (IST) 26 Oct 2023
पाच टन निर्माल्य संकलनातून खत आणि धुपबत्ती निर्मिती; अकोल्यात अनोखा प्रयोग…

अकोला: गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवात निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्यावतीने रथ कार्यान्वित करून निर्माल्य संकलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 26 Oct 2023
मराठा आरक्षणाची धग वाशिमपर्यंत, ‘या’ गावात नेत्यांना प्रवेश बंदी; आधी कॅन्डल मार्च आता साखळी उपोषण

वाशिम: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात लढा तीव्र केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगांव येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण करून नेत्यांना गाव बंदी घातली आहे.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 26 Oct 2023
नाशिक : कांदा दरात उसळी; एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ

एकाच दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर प्रति क्विंटलला ५०० ते ६०० रुपयांनी वधारले. देशांतर्गत मागणी कायम असताना आवक कमी होत आहे.

सविस्तर वाचा…

12:58 (IST) 26 Oct 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल, स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे हजर

५ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा शिर्डीत, स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर, शिर्डीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था, महाराष्ट्र दौऱ्यात हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण करणार

12:56 (IST) 26 Oct 2023
“हामुन” चक्रीवादळ बनले धोकादायक! “या” पाच राज्यांवर आज होणार परिणाम

नागपूर: देशात पहिल्यांदाच एकाच वेळी अरबी समुद्रात “तेज” आणि बंगालच्या उपसागरात “हामुन” अशा दोन चक्रीवादळाची निर्मिती झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ ‘हामून’ धोकादायक बनले आहे.

सविस्तर वाचा…

12:51 (IST) 26 Oct 2023
…तर शेतकऱ्यांना २०० किलोमीटर चकरा माराव्या लागणार; ‘तो’ शासन निर्णय वाशिमकरांसाठी त्रासदायक!

वाशिम: शासन दप्तरी अकांशित आणि मागास जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची नोंद आहे. सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 26 Oct 2023
भूसंपादन रखडण्याचा महापालिकेला आर्थिक फटका; ‘या’ रस्त्यासाठी होणार ९१६ कोटी खर्च

पंधरा जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला हा खर्च करावा लागणार असून, भूसंपादन रखडल्यामुळे भूसंपादनाच्या खर्चात २९४ कोटींनी वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स