Maharashtra News Today, 30 October 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (३० ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं होतं. तसेच आमदार अपात्रतेबद्दलच्या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयात सुधारित वेळापत्रक सादर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह राज्यातील विविध बातम्यांचा एकत्रित आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Today’s News in Marathi : राजकारणासह, सामाजिक, गुन्हे आणि अर्थ विषयक घडामोडी वाचा एका क्लिकवर…
सांगली : पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्यावतीने ‘माझी माय कृष्णामाई’ या उपक्रमाअंतर्गत विष्णूघाट ते बंधाऱ्यापर्यंत स्वच्छता करून सोमवारी तब्बल तीन टन कचरा संकलित करण्यात आला. नदी पात्रात सगळीकडे कचरा साठलेला होता आणि त्याची दुर्गंधी पसरलेली होती. तशातच कोयना धरणातून सोडलेले पाणी आज सायंकाळपर्यंत सांगलीजवळ पोहोचणार होते, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आज नदी स्वच्छ करायचीच असा निर्धार करुन पृथ्वीराज फौंडेशनने नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.
जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे आणि निवडणुका न होऊ शकलेल्या मुळे
ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदासाठी प्रत्यक्ष मतदान ५ नोव्हेंबर रोजी होत आहे.
त्या अनुषंगाने उमेदवारांनी गावा गावात प्रचाराला सुरुवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासह थेट सरंपच व पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे ५९ ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच सदस्याच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणुक होत आहे. त्यांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपोषण केले.
धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
वाघधरा येथे तीन मित्रांची निघृण हत्या करणा-या आरोपीला नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सविस्तर वाचा…
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरुपात लिपीक-टंकलेखकाची एकूण १० आणि शिपाई / संदेश वाहकांची २४ पदे भरण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
चंद्रपूर : खासगी व शासकीय वीजनिर्मिती केंद्राच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात ४४२० मे. वॅ. वीजनिर्मिती होते. रात्रीपाळीत शेतकरी कृषिपंपातून शेतीला पाणीपुरवठा करीत असतात. यावेळी हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यावर हल्ला करीत असतात. २ दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात २४ तास थ्री फेज वीजपुरवठा न केल्यास जिल्ह्यातील वीज वितरण कार्यालयाला टाळे बंद आंदोलन करण्याच्या इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ऊर्जामंत्र्यांना दिला आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे यांना कळंब पोलिसांनी ताब्यात घेतले.
देशातील आणि विशेषत: विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर फळगळतीची मोठी समस्या असते. मात्र, आता फळगळती झालेल्या संत्र्यापासून विविध उत्पादने तयार करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
पश्चिम विदर्भातून पुण्यासाठी आणखी एक गाडी धावणार आहे. नियमित अमरावती-पुणे एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. ११०२५ / ११०२६ भुसावल – पुणे एक्सप्रेस (मार्ग नाशिक, पनवेल ) या रेल्वेचा मार्ग बदल व विस्तार करून ११०२५ / ११०२६ अमरावती – पुणे एक्सप्रेस अकोला, भुसावळ, मनमाड, अहमदनगर मार्गे लवकरच सुरू होणार आहे. सविस्तर वाचा
नागपूर: विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केले आहे.
मुंबई – भविष्यात माझा चरित्रपट कुणी तयार केला तर त्यात आलिया भट्ट या अभिनेत्रीने माझी भूमिका साकारावी अशी इच्छा सुधा मूर्ती यांनी टाटा लिटरेचर लाईव्ह फेस्टीव्हलमधील ‘पीपल ऑफ द लॅण्ड’ या चर्चासत्रात व्यक्त केली.
नागपूर: दिवाळी तोंडावर असतांनाच नागपुरात सोमवारी (३० ऑक्टोंबर) सकाळी १०.३० वाजतानंतर दोन तासातच सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम तब्बल ३०० रुपयांची घट नोंदवली गेली. हे दर नागपुरात किती आहे, हे आपण बघूया.
नागपूर: बांग्लादेश सीमेवरून कोलकातामार्गे सोन्याची तस्करी करणाऱ्या नागपुरातील एका व्यापाऱ्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नागपूर रेल्वे स्थानकावर पकडले. त्याच्याकडून पाच कोटी रूपये किंमतीचे ८.५ किलो सोने जप्त करण्यात आले.
आज सह्याद्री अथितीगृह येथे मराठा उपसमितीची बैठ पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सायबर गुन्हेगाराने घरबसल्यास काम आणि गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याचे आमिष एका महिलेला दाखवले. सुरुवातीला तिला दररोज एक हजार रुपये मिळायला लागले. त्यानंतर मात्र, सायबर गुन्हेगारांनी महिलेला जाळ्यात ओढून १६ लाख रुपयांनी फसवणूक केली. सविस्तर वाचा…
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने सहाय्यक संचालक आणि इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. सविस्तर वाचा…
कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात महिला, पुरूष पादचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी असा ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्या आंबिवली, शहाड येथील दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे तालुक्यातील रानमळा या गावाने नेत्यांना गावबंदी केली आहे. गावाच्या वेशीवर फलक लावून नेत्यांना गावबंदी करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. सविस्तर वाचा…
जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये-जा होत आहे.
नागपूर: मध्यरात्रीला प्रेयसीच्या घरी भेटायला आलेल्या प्रियकराने इशारा केला आणि प्रेयसी कुटुंबीयांची नजर चुकवून बाहेर आली. सुरक्षित ठिकाण म्हणून दोघांनीही शौचालयाचा आसरा घेतला. काही वेळाने मुलीची आई लघुशंकेसाठी शौचालयाकडे आली.
नागपूर: मध्य रेल्वे सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान मार्गाचे दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. त्यासाठी काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर : चार दशके सत्तेच्या राजकारणात राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची अलिकडे दहा वर्षांत मोठी पिछेहाट झाल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवणे पसंत केले आहे. त्यांचा राजकीय वारसा त्यांच्याच कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढे चालविताना आगामी सोलापूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरून पित्याच्या सलग दोनवेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा विडा उचलला आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे हे गेले महिनाभर सोलापुरात तळ ठोकून आहेत.
रमेश हा झोपडीच्या बाजूला जमिनीवर झोपला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले होते.
मुंबई : राज्यातील किरकोळ व घाऊक विक्रेते हे मोठ्या प्रमाणात परराज्यातून औषध खरेदी करत असल्याने नागरिकांना बनावट औषधे मिळण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या औषधांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जलालुद्दीनला अटक केली.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑगस्ट २०२३ मधील पंतप्रधान आवास योजनेतील (पीएमएवाय) पहाडी गोरेगाव येथील अत्यल्प गटातील घरांसाठी केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय विजेत्यांसाठी मोठा दिलासा ठरला. मात्र आता या योजनेतील विजेत्यांवर एक टक्के मेट्रो उपकराचा भार पडला आहे.
नागपूर: दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अकोल्यातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय खासदार, आमदार यांच्या घरासमोर तीव्र आत्मक्लेश आंदोलन करण्याचे ठरले असून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे.