Maharashtra News Today, 30 October 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (३० ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं होतं. तसेच आमदार अपात्रतेबद्दलच्या सुनावणीचं सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयात सुधारित वेळापत्रक सादर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह राज्यातील विविध बातम्यांचा एकत्रित आढावा…
Today’s News in Marathi : राजकारणासह, सामाजिक, गुन्हे आणि अर्थ विषयक घडामोडी वाचा एका क्लिकवर…
गोंदिया: बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून, या विमानतळावरील खंडित झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा लवकरच पूर्ववत होणार आहे. येथून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास इंडिगो एअरलाइन्सने अनुकूलता दर्शविल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी पुढे आली होती.
बुलढाणा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी सत्याग्रह करणाऱ्या सदस्यांसोबत तब्बल तीन तास चर्चा केली.
डोंबिवली – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फडके रस्ता भागात कार्यक्रमासाठी येणार म्हणून शनिवारी संध्याकाळ ते रविवारी पहाटेपर्यंत फेरीवाला मुक्त केलेला फडके रस्ता भाजपा नेत्यांची पाठ फिरताच पुन्हा फेरीवाल्यांनी व्यापला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा रस्ता, पदपथ अडवून कायमस्वरुपी ठेले बांधण्यात आले आहेत.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अखेर काही महिन्यांनंतर पुन्हा स्वस्तात पाणी मिळू लागले आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर वॉटर व्हेंडिंग यंत्रे बसविली आहेत. त्यातून प्रवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी पाच रुपये लीटर दराने मिळत आहे.
डोंबिवली – कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनात असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल. उमेदवारीवरून कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, असा कोणताही निर्णय भाजपा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार नाही, असे आश्वासन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथील ब्राह्मण सभेत भाजपा कार्यकर्त्यांना दिला.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधकांमधील टीका शिगेला पोहोचली होती. निवडणूक स्थगितीचा मुद्दा न्यायालयातही जाऊन पोहोचला. अखेर विद्यापीठाने बहुप्रतीक्षित नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
पुणे : सासू-सुनेत नकटी बोलल्याने वाद झाल्याने सुनेने थेट स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर वार केल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री एका सदनिकेत शिरून परप्रांतीय कामगारावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला. पसार झालेल्या हल्लेखाेराचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत समाज शांत बसणार नाही, असे समाजबांधवांनी सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पुणे: भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाला कोरेगाव पार्क भागात लुटून पसार झालेल्या जळगावमधील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.
२४ तासांमध्ये पाचशेहून अधिक मराठा व इतर जाती धर्माच्या रहिवाशांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (३० ऑक्टोबर) सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आपण पाणी, उपचार काहीही घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधून एक महिला आंदोलक आपल्या आजारी मुलासह अंतरवाली सराटी येथे आल्या आणि जरांगेंची प्रकृती पाहून हंबरडा फोडला. यावेळी त्यांनी जरांगेंना काही झाल्यास मी विष पिऊन जीव देऊन, असा इशाराही दिला.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिकांवरून जोरदार शाब्दिक हल्ला केला. “देवेंद्र फडणवीस त्यांचा आणि गुणरत्न सदावर्तेंचा संबंध नाही म्हणतात, पण सदावर्ते ‘आय लव्ह यू फडणवीसजी'”, असं म्हणत असल्याची टीका केली.
बुलढाणा: महाराष्ट्रात बेरोजगारीचा भस्मासूर वेगाने फोफावत आहे. राज्यकर्त्यांच्या दुर्लक्ष व शोषणाचा बळी ठरलेल्या विदर्भातच रोजगारहीनांची संख्या तब्बल ६६ लाखांपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे प्रमुख नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू आहे. यावेळी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे , मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ , मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित.
ललित पाटील याने पलायन करण्याच्या काही दिवस आधी २७ सप्टेंबरला कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. धिवारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
चंद्रपूर: समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुपच्यावतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना व नव्या पिढीतील आश्वासक सामाजिक योगदानासाठी दिला जाणारा सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील देशपातळीवर कार्यरत ‘डोनेटकार्ट’चे संस्थापक सारंग बोबडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
अमरावती: पश्चिम विदर्भातील बाजारात सोयाबीनची आवक मागील काही दिवसांपासून वाढत आहे. पण दुसरीकडे सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत.
यवतमाळ: येथे आज सोमवारी होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे तीव्र सावट दिसत आहे. शहर या अभियानासाठी ‘फलकमय’ झाले असताना शहरातील आर्णी मार्गावर अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फलकांवर डांबर फासण्याची घटना उजेडात आली.
या गाड्या स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवारी), खडकी आणि पिंपरी-चिंचवड आगारातून सोडण्याचे नियोजन आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
भविष्यात मोठा लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा कामगार नेते नरेश पुगलिया यांनी केले.
१९ लाख ५८ हजार ५४० रुपये संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जिल्ह्यात ५५० हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.
जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरीही ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, त्यांना विधान परिषदेतून निवडून आणलं जाईल, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे.