Maharashtra News Today, 01 November 2023 : राज्यात मराठा आंदोलनाची धग कायम आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारकडून घोषणा होत नाही तोवर आंदोलन आणि उपोषण मागे घेणार नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू आहेत. काल (३१ ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक होऊन न्या. शिंदे समितीचा प्रथम अहवाल मंजूर करण्यात आला. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलने तीव्र केली असून आमदारांची घरे आणि वाहने लक्ष्य केली आहेत. आजही हसन मुश्रीफांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आक्षेप शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतला. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.
Mumbai Maharashtra News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, सर्वपक्षीय बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे वाचा
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं आहे. बैठक संपल्यानंतर त्यांनी X वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, "आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. यावेळी आरक्षणाला पाठिंबा दर्शवत एकमताच्या ठरावावर मी पक्षाच्या वतीने सकारात्मक भूमिका दर्शवली."
सरकारला कशासाठी आणि किती वेळ हवाय हे त्यांनी सांगावं, मराठ्यांना कसं आरक्षण देणार आहेत हे सांगावं, वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का? हे सांगा, त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचंय ते पाहू, असं जरांगे पाटील म्हणाले.
कायम अवर्षणग्रस्त असतानाही जतचा दुष्काळी तालुक्यात समावेश केला नसल्याने जतमध्ये प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांने तहसिलदारांची मोटार बुधवारी सकाळी फोडली.
वसई- सध्या आहारशैलीत व्हिगन शैली स्विकारण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यामुळे व्हिगन पाकिटबंद पदार्थांचे सेवन मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढले आहे. अनेक कंपन्या व्हिगन पदार्थांच्या उत्पादनात गुंतवणूक करत आहेत.
मराठा आरक्षणाबाबतची आपली मागणी मान्य न झाल्याने मनोज जरांगे अद्याप बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. सुरुवातीला अन्न, पाण्याशिवाय उपोषणाला सुरुवात केलेल्या मनोज जरांगे यांनी प्रकृती खालावल्यावर नेते व समर्थकांच्या विनंतीवरून पाणी घेण्यास सुरू केले. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यानंतर प्रशासनाकडून काही ठिकाणी इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे. "अशा गोष्टी करून सरकारने राज्यातील वातावरण दुषित करू नये", असं मत जरांगेंनी व्यक्त केलं. तसेच सरकार आमचं आंदोलन मोडू शकत नाही, असंही नमूद केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कुणबी नोंदी आढळल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा केली. मात्र, मनोज जरांगे सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. अशातच राज्यात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याची माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बैठकीला बोलावल्याचं सांगितलं.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तणावपूर्ण झालं आहे. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आणि हिंसाचार करू नये, असं आवाहन केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आंदोलनाला गालबोट लागेल असं वर्तन करू नये, असं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री शंभुराज देसाई यांनी या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली.
आजच्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. अॅडव्होकेट जनरलही आज होते. या चर्चेमधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका जी सरकारची आहे तीच सर्वांची आहे. त्यावर सर्वांचं एकमत आहे. ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे, ही भावना देखील या ठिकाणी व्यक्त केली. तसा ठरावदेखील करण्यात आला.
इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका घेतली. मराठवाड्यात जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी दाखला देणं आणि सर्वोच्च न्यायालयताली याचिकेवर काम करणं यावर साधकबाधक चर्चा झाली. असा निर्णय सर्वनुमातन घेण्यात आला.
हे होत असताना राज्यात कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झाला आहे. दुर्देवी घटना होत आहेत, जाळपोळीच्या तोडफोडीच्या घटनांवर सगळ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे मराठा समाजाचे शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागलं. हे आंदोलन हिंसात्मक पद्धतीने होऊ लागलं, यावर सर्वांनी नापंसती व्यक्त केली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत. यासाठी प्रामाणिकपणे सरकार दोन पातळ्यांवर काम करत आहे.
तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटी गठीत केली आहे. मागासवर्ग आयोग युद्धपातळीवर काम करत आहे. त्रुटी दूर कणऱ्यासाठी ज्या बाबी आवश्यक आहे त्या बाबींची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे. लवकरच यामधून मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय लागेल. अशाप्रकारची खात्री आहे. यासाठी जो अवधी लागेल तो देण्याची आवश्यकता आहे.
मराठा समाजाने संयम बाळगण्याची आवश्यकता, सरकारला वेळ देण्याची आवश्यकता आहे. सर्वानुमते मनोज जरांगे पाटलांना आवाहन केलं आहे की या प्रक्रियेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगेनी सहकार्य करावं, आपलं उपोषण मागे घ्यावं, अशाप्रकारचा ठराव लोकप्रतिनिधींनी, पक्षाच्या नेत्यांनीआजच्या बैठकीत केला आहे - एकनाथ शिंदे
चेंबूर येथे पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अपहाराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेऊनही तात्काळ काम सुरू न करता पुन्हा मुदतवाढ घेण्याच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सरसकट दहा लाख रुपये शुल्क घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सविस्तर वाचा…
रिक्षाची वाट बघत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तृतीयपंथीयाला डोक्यावर बीअरची बाटली मारून आणि चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याच्या तीन मैत्रिणींनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडे राहण्याचा आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा…
कांदा निर्यातीवर ४० टक्के कर आणि किमान कांदा निर्यातमूल्य प्रति टन ८०० डॉलर केल्यानंतरही कांदा दरातील तेजी कायम आहे. दर्जेदार कांद्याला शेतकऱ्यांना ५५ ते ६० रुपये किलो दर मिळत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने कांद्याच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. सविस्तर वाचा…
कुणबी म्हणून सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती करणार, अशी चर्चा बैठकीत झाली - जयंत पाटील, शेकाप
पुणे/पिंपरी : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हा सामना हाऊसफुल्ल असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला ठिकठिकाणी मिळत असलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला असून, सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
देवेंद्र आमच्या घराबाहेर येऊन म्हणले होते की, सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ. जरांगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी १० दिवस वाढवून दिले. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायला ४० दिवस सरकारला दिले होता. ४० दिवसांची ही मॅजिक फिगर त्यांनी आणली कुठून? त्यामुळे फडणवीस सातत्याने फसवणूक करत आहेत - सुप्रिया सुळे
तळोजा वसाहतीमधील प्रवेशव्दारावर दिवा पनवेल लोहमार्गाखाली भुयारी मार्ग वाहनांंची येजा करण्यासाठी बांधला आहे. मंगळवारी या भुयारी मार्गात पाणी साचल्याने तळोजावासियांनी आश्चर्य व्यक्त केले.
मंत्रालयाच्या आवारात आंदोलन करणारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावण्यात आले होते, हे कुलूपही आता उघडण्यात आले आहे. पोलिसांनी २५ आमदारांना ताब्यात घेतलं असून आमदारांकडून घोषणाबाजी सुरूच आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी(बीएनएचएस) फेब्रुवारी २०२१ पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या सहकार्याने दर महिन्याला पक्षी गणना आयोजित करते. आतापर्यंत २१९ प्रजाती नोंदवण्यात आल्या.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित आमदार जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनिल प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे, आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
‘दहिसर – अंधेरी २ अ’ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्या सोमवारी २.५ लाखापार पोहोचली. त्यामुळे या दोन्ही मार्गिकांनी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. सविस्तर वाचा…
मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा - अशोक चव्हाण
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले दिले पाहिजेत - बच्चू कडू
प्रेमविवाह केल्यानंतर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दुलेश्वरी देवगडे-भोयर (२१) असे मृत पत्नीचे नाव आहे. सविस्तर वाचा…
Mumbai Maharashtra Live News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, सर्वपक्षीय बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे वाचा