Maharashtra News Today, 01 November 2023 : राज्यात मराठा आंदोलनाची धग कायम आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारकडून घोषणा होत नाही तोवर आंदोलन आणि उपोषण मागे घेणार नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू आहेत. काल (३१ ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक होऊन न्या. शिंदे समितीचा प्रथम अहवाल मंजूर करण्यात आला. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलने तीव्र केली असून आमदारांची घरे आणि वाहने लक्ष्य केली आहेत. आजही हसन मुश्रीफांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याचा आक्षेप शिवसेनेच्या ठाकरे गटाने घेतला. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, सर्वपक्षीय बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे वाचा
काल (३१ ऑक्टोबर) इथं १० आमदार होते. आज २५ आमदार आहेत. उद्या येथे १०० आमदार येतील आणि जे या आंदोलनात सहभागी होणार नाहीत ते मराठ्यांचा दोषी समजला जाणार – आमदार बाबासाहेब आजबे
प्रेमप्रकरणातून छत्तीसगडमधून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हवालदाराच्या साथीदारास पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर वाचा…
मराठा आरक्षणासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
मराठा आरक्षणासाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे.मात्र अद्याप ही राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घेताना दिसत आहे.त्यामुळे राज्यातील अनेक भागात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. सविस्तर वाचा…
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलने तीव्र झाली असून काही ठिकाणी रास्ता रोको आणि जाळपोळीचे प्रकार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्तक झालेल्या ठाणे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील निवासस्थान परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. सविस्तर वाचा…
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा सारथी तुषार राजे (४८) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. तुषार राजे अनेक वर्ष आनंद दिघे यांचे अर्माडा हे वाहन चालवीत होते. अपघात झाला त्यावेळीही राजे त्यांच्या सोबत होते. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्राची तातडीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या कामासाठी ठाण्यातील काही भागात उद्या, गुरुवारी २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. सविस्तर वाचा…
मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून विसर्गाऐवजी जायकवाडीच्या मृत साठ्यातील पाच टीएमसी पाणी वापरावे, अशी भूमिका मांडत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे.
मराठा आरक्षणाच्या चर्चेकरता सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, सरकारने तातडीने मराठ्यांना सरसकट जातप्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयासमोर आंदोलन पुकारले आहे. ज्या प्रवेशद्वारातून आमदार मंत्रालयात जातात, त्या प्रवेशद्वारालाही कुलूप लावण्यात आले आहे.
जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र वाटपास सुरुवात. धाराशिवमध्ये पहिलं जातप्रमाणपत्र देण्यात आलं.
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde arrives at Mumbai's Shayadri Guest House for the all-party meeting on Maratha reservation pic.twitter.com/SCW2TQEead
— ANI (@ANI) November 1, 2023
Mumbai Maharashtra Live News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, सर्वपक्षीय बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे वाचा