Maharashtra News Updates, 13 August 2024 : आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. सध्या सर्वच नेते, राज्यव्यापी दौरे करत आहेत. मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यासह हे नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावरही खलबतं चालू आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे देखील राज्यभर दौरे करत आहेत. यासंदर्भात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Today, 13August 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या
नाशिक : आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षक यांच्यावरील अन्यायाविरोधात आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षक कृती समितीच्या वतीने ईदगाह मैदानावर आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कंत्राटी क्रीडा, संगणक आणि कला शिक्षक २०१८ पासून कार्यरत होते. या शिक्षकांची नियुक्ती ही शासकीय भरतीचे सर्व नियम पाळून झाली. परंतु, करोना काळात त्यांना घरी बसवण्यात आले. यानंतर कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांना ठराविक कालावधीनंतर रुजू करण्यात आले. २०२२ मध्ये शासन निर्णयानुसार बाह्यस्त्रोताद्वारे नवीन भरती प्रक्रियेतून शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरी बसविण्यात आले. कर्मचाऱ्यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी शिक्षकांना दिलासा देत शिक्षकांना कामावरून काढू नका, असे आदेश दिल्यानंतरही आदिवासी विकास विभागाकडून संबंधितांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
राज्यात डेंग्यू आणि झिकाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचवेळी देशात डेंग्यू आणि झिकावरील लस विकसित करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. या दोन्ही रोगांवरील लशी विकसित करण्यात आल्या असून, त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
सासरकडील छळामुळे तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा…
एकाच विकासकामांवर दोनदा खर्च झाल्याचा आरोप करत या कामांच्या चौकशीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण करावे, अशी मागणी करत यासंबंधीचे पत्र त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
औद्योगिक नगरी व सिमेंट कारखान्याचे शहर अशी ओळख असलेल्या गडचांदूर पोलीस ठाण्याचे हद्दीतील गडचांदूर-भोयेगाव मार्गावर निमणी-लखमापूर मार्गावरील दूध डेअरी जवळ १२ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंत्रर दोन वाजताचे सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव अर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिली. सविस्तर वाचा
भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला राजगड तालुक्यात नेऊन त्याला विजेच्या मनोऱ्यावरील तार कापून चोरी करण्यास प्रवृत्त केले.
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आपले बंधू युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरविले आहे. सविस्तर वाचा…
नागपूर: मुलाने गाफिल ठेवत अंगठ्याचे ठसे घेवून घर व दुकान स्वत:च्या नावावर करुन घेतले. आता डोक्यावरचे छप्पर गेले, रहायला जागा नाही, कुठे आसरा घेणार, अशी तक्रार जरीपटका भागातील भोजवंताबाई शेंडे (८०) यांनी विभागीय आयुक्तांकडे केली. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेूऊन विभागीय आयुक्तांनी महिलेसोबत एक कर्मचारी देत उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविले.
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी मराठा आरक्षण शांतता फेरीला नाशिक येथील तपोवनातून हजारोंच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी एक मराठा, लाख मराठासह ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
डोंबिवली रेल्वे स्थानकात क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचच्या दरम्यान पूर्व-पश्चिम दिशेने एक पादचारी पूल उभारण्याचे काम रेल्वेकडून प्रस्तावित आहे.
मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यावरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने इरई नदीच्या बाजूस ‘नवीन चंद्रपूर’ वसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ‘म्हाडा’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूकही झाली होती. मात्र तब्बल २५ वर्षे शासन आणि म्हाडाला याचा विसर पडला होता. आता हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्यात येत असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकण्यात येत आहेत.
अकोला : मध्य रेल्वे मार्गावर जलंब – शेगांव विभागात स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणालीचे काम पूर्ण झाले. या स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणालीमुळे रेल्वे गाड्या कमी वेळेत पास होईल. रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार असून वेग वाढणार आहेत. एकाच वेळी एकाच मार्गाने धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांमधील अंतर कमी होणार असल्याने त्या निर्धारित वेळेत धावण्यासाठी मदत होणार आहे.
पनवेल : खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ७ येथील श्री जी संघ सोसायटी या इमारतीमधील एटीएम मशीनमधून चोरट्यांनी अनोख्या पद्धतीने रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीसांत चोरीचा नोंदविण्यात आला आहे. अभ्युदय बॅंकेचे व्यवस्थापक निशिकांत म्हात्रे यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारनूसार ३ ऑगस्ट रात्री आठ वाजता ते ५ ऑगस्ट सकाळी १० वाजेपर्यंत चोरट्यांनी श्री जी संघ सोसायटी इमारतीमधील एटीएम मशीमधील रोकड काढण्याच्या (कॅश डिस्पेन्सर) पत्र्याच्या जागी दूसरा पत्रा लावून रोकड काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे २३ हजार ८०० रुपये चोरले. ही बाब बॅंक व्यवस्थापक म्हात्रे यांच्या ध्यानात बॅक ग्राहकांनी आणून दिल्यावर बॅंकेतर्फे हा गुन्हा पोलीसांत नोंदविण्यात आला. पोलीसांचे पथक एटीएम मशीनमधील सीसीटिव्ही कॅमेराच्या आधारे संबंधित पत्रा बदलण्यासाठी कोणत्या व्यक्तीने हातचलाखी केली याचा शोध घेत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी तपासणीसाठी दोन आठवडे रविवारी विशेष पाणी गुणवत्ता तपासणीत २ हजार पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून नवी मुंबईकरांना स्वच्छ ,शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा केला जात असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
शाळांच्या वेळा बदलण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी नवी मुंबईतील शाळांमध्ये सोमवारपासून होणार होती. मात्र शिक्षक संघटनांच्या तीव्र विरोधामुळे हा वेळबदल कागदावरच राहिला. सविस्तर वाचा
सट्टा बाजाराशी काहीही संबंध नसताना केवळ सट्टा बाजारात गुंतवणूक करा भरघोस परतावा मिळावा अशा जाहिरात करत त्याला बळी पडून फसवणूक होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे . नवी मुंबईतील एका व्यक्तीची अशाच प्रकारे १३ कोटी ५६ लाख ४४९ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा…
पुणे येथून पारपत्र मिळवून सौदी अरेबियाला जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. आरोपी १३ वर्षांपूर्वी बांगलादेशातून बेकायदेशिररित्या भारतात आला होता. सविस्तर वाचा…
संजय राऊत म्हणाले, रवी राणांनी १५०० रुपये परत घेण्याचं वक्तव्य केलं आहे, याचाच अर्थ असा की लाडकी बहीणसारख्या योजना आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी नाहीत. योजना फक्त मतं विकत घेण्यासाठीची आहे. या सरकारच्या भावना किती कलुषित आहेत हे दिसून येतं. यांनी हे पैसे काय त्यांच्या खिशातून दिलेत का? रवी राणांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल.
आरक्षणानुसार २९ गावांचा प्रभावक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून विकास करण्यासाठी पालिकेला ७,३५८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
वाशीतील एपीएमसी धान्य बाजारातील स्टॉलधारकांकडून रस्त्यावरच साहित्य विक्रीसाठी ठेवून रस्त्याची अडवणूक केली जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सूरु करण्यापूर्वी या विमानतळातील धावपट्टीवरील उपकरण यंत्रांवरील वैमानिकांना मिळणारी माहितीची चाचणी सोमवारपासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सूरु केली आहे.
पिंपरी -चिंचवड: आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद पिंपरी- चिंचवडमध्ये उमटले आहेत. रवी राणा यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला पायदळी तुडवले. रवी राणा प्रत्यक्षात आमच्या समोर आल्यास त्यांना चोप देणार अशा प्रकारचा इशारा देत महिला आक्रमक झाल्या. सरकार दीड हजार रुपये देत आहे. मात्र, या दीड हजार रुपयात होतं काय? असा प्रश्न देखील महिलांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या संघटिका सुलभ उबाळे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या. रवी राणा यांनी जाहीर सभेमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल एक वक्तव्य केलं. महिलांनी मतरूपी आम्हाला आशीर्वाद न दिल्यास पंधराशे रुपये आम्ही परत घेऊ, असं विधान केल्याने आमदार रवी राणा यांच्यावर विरोधकांनी टीका केली. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले.
दोन्ही निर्णय पुण्यासाठी घातक ठरणारे आहेत. गेल्या महिन्यात पुणे शहरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
व्यवस्थापकाविना केंद्राचा कारभार सुरू असल्याने तेथील तांत्रिक अडचणी दूर करताना केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून त्याचा नागरी सुविधांवर परिणाम होत आहे.
ठाणे आयुक्तायल क्षेत्रात नागरिककरण वाढल्याने येथे सायबर पोलीस ठाणे व्हावे अशी मागणी केली जात होती. अखेर पोलीस ठाणे बांधून तयार झाले आहे.
नवी मुंबईत गेल्या दीड महिन्यात महिलांवर हल्ला, हत्या, बलात्कार अशा घटना घडल्याने शहराची शांत शहर म्हणून प्रतिमा मलिन होत आहे.
लांजा दाभोळे मार्गावरील तळवडे गावातील रेल्वे पुलाजवळ हा अपघात सोमवारी १२ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू झाल्याने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता नव्हती.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या वाढत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
“पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार, तर मुंबईत…”, मनोज जरांगेंचा इशारा
विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे, मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं सर्व चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबतही खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.
यातच सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. “आम्ही जरी काही जागा निवडून आणू शकलो नाहीत, तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार आणि मुंबईत १९ जागांचा करेक्ट कार्यक्रम करणार”, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.