Maharashtra News Updates, 13 August 2024 : आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला आहे. सध्या सर्वच नेते, राज्यव्यापी दौरे करत आहेत. मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. यासह हे नेते पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? यावरही खलबतं चालू आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे देखील राज्यभर दौरे करत आहेत. यासंदर्भात घडणाऱ्या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच इतर राजकीय व सामाजिक बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Today, 13August 2024 : राज्यासह देशभरातील बातम्या
कराड: भांडवली बाजारातून (शेअर मार्केट) बक्कळ परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिसांनी राजेंद्र शंकर डोंगरे, रोहित राजेंद्र डोंगरे (दोघेही रा. नवा रस्ता, ता. पाटण) यांना अटक केली आहे. पाटण न्यायालयात हजर केले असता दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर, सुरज डोंगरे हा पसार झाला आहे.
फिर्यादी नितीन सर्जेराव शिर्के (रा. अडूळ, ता. पाटण) यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नवा रस्ता येथील राजेंद्र शंकर डोंगरे, सुरज राजेंद्र डोंगरे व रोहित राजेंद्र डोंगरे यांनी संगनमत करून भांडवली बाजाराविषयी माहिती दिली. आणि बक्कळ परताव्याच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने नऊ लाख रुपये व रोख स्वरूपात तीन लाख रुपये असे १२ लाख रुपये घेतले. त्यापैकी तीन लाख रुपये परतही केले. मात्र, नऊ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून राजेंद्र डोंगरे व रोहित डोंगरे यांना अटक केली. मात्र, सुरज डोंगरे पोलिसांना मिळून आलेला नाही.
कराड : रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नडशी येथील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना रेल्वे पुलाच्या खालून येता-जाताना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी नव्या पुलाच्या मागणीसाठी शिरवडे रेल्वेस्थानकावर नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे, यशवंतनगर ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलन केले. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी महिन्याभरात बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी नव्या पुलाला मान्यतेखेरीज मागे हटणार नसल्याचा इशारा दिल्याने अखेर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राकेश वर्मा आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. आपल्या निवेदनाप्रमाणे अंदाजपत्रक करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठवले आहे. तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर कामास मंजुरी मिळेल, असे त्यांनी सांगितले. परंतु, आंदोलनकर्ते लेखी आश्वासनावर ठाम राहिले. त्याचबरोबर मंजुरी मिळून काम सुरू झाल्याशिवाय आम्ही नडशी, उत्तर कोपर्डे व यशवंतनगर परिसरातील काम करू देणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला.
पुणे : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून रोकड, दुचाकी असा एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई : बोरिवली (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रात आजपर्यंत तब्बल ३७० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण (बीएमटी) करण्यात आले आहे. अतिशय क्लिष्ट असलेले बोनमॅरो प्रत्यारोपण करून या केंद्राने मागील सहा वर्षात अशा अनेक बालकांना सामान्य जीवन जगण्यास मदत केली आहे.
नागपूर : कोलकात्यामध्ये आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुमारे १ हजार डॉक्टर मंगळवारी सकाळी ९ वाजतापासून संपावर गेले आहे.
मुंबई : सोडतील विजेत्यांना घराचा ताबा देताना म्हाडा एका वर्षाचे देखभाल शुल्क आकारते. मात्र एका विजेताला २०२३ मध्ये घराचा ताबा मिळालेला असताना त्याच्याकडून २०१४ पासूनचे चक्क १० वर्षांचे देखभाल शुल्क वसूल करण्याचा घाट म्हाडाने घातला आहे. म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या सुनावणीत ही बाब समोर आली.
मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले. या कारवाईत डी-मॅट खाते, बँक खाते यांच्यासह संशयित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे असे एकूण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
मनसैनिकांनी ठाणे येथे उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या आधी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर नारळ फेक करून आंदोलन केले.
संसद हे असे प्रश्न मांडण्यासाठीचं महत्त्वाचं आणि योग्य व्यासपीठ आहे आणि मी त्या व्यासपीठाचा वापर करते. आम्ही दडपशाही वाले लोक नाही. कोणीतरी विरोधात बोललं म्हणून आम्ही त्यांना आयकर विभागाची नोटीस पाठवत नाही. गुन्हे अन्वेषण विभागाला, संचालनालयाला त्यांच्या मागे लावत नाही. मी जेव्हा जेव्हा संसदेत सरकारविरोधात बोलते, प्रश्न मांडते तेव्हा तेव्हा माझ्या पतीच्या विरोधात नोटीस निघते. कालच एक नोटीस माझ्या कुटुंबाला मिळाली आहे. त्यानंतर मी काल परत काही प्रश्न मांडले, आता अजून एक लव्ह लेटर (प्रेम पत्र) येईल. आम्ही त्याला नोटीस म्हणत नाही, आम्ही त्या नोटिशींना प्रेमापत्रं म्हणतो. सरकारला प्रश्न विचारला की अशी प्रेमपत्रं येत असतात.
शहरातील काही भागातील रस्त्यांसाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला. काही भागातील लोक अक्षरश: चिखलातून ये- जा करत होते.
सत्ताधाऱ्यांनी अनेक घरे फोडली त्यात लातूर अपवाद राहील असे वाटले होते. पण लातूरातील ‘देवघर’ही फोडले.
३५ रुग्णांवर ते मृत असतानाही उपचार केल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याची तक्रार यामध्ये करण्यात आली होती.
मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी एखादं वक्तव्य केलं तर ते आम्ही गांभीर्याने घेऊ, अन्यथा इतरांच्या वक्तव्यांबद्दल विचार करण्याची आम्हाला आवश्यकता नाही, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल तर तो त्यांनी जाहीर करावा. राऊत म्हणाले काँग्रेसकडे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार किंवा स्वतः नाना पटोले आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे असतील तर ते त्यांनी जाहीर करावं. काँग्रेसने १० जणांची यादी जाहीर करावी की आमच्याकडे मुख्यमंत्रिपदासाठी हे १० चेहरे आहेत. माझी त्यावर काहीही हरकत नसेल.
“पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार, तर मुंबईत…”, मनोज जरांगेंचा इशारा
विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे, मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं सर्व चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबतही खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.
यातच सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. “आम्ही जरी काही जागा निवडून आणू शकलो नाहीत, तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार आणि मुंबईत १९ जागांचा करेक्ट कार्यक्रम करणार”, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे.