Marathi News Live Update : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी भाजपाने त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत भाजपाने अनेक दिग्गजांचं तिकीट कापलं आहे, तर नव्या चेहऱ्यांना संधीदेखील दिली आहे. अशातच आता काँग्रेससह इतर पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या समोर येतील. वेगवेगळे पक्ष देशभर निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत. दिवसभर याबाबतच्या राजकीय बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच दिल्लीच्या वेशीवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

Maharashtra Breaking News Live 04 March 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

11:37 (IST) 4 Mar 2024
वसई विरारच्या विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू, २० वर्षांचे नियोजन, नव्याने आरक्षणे टाकणार

वसई : वसई विरार महापालिकेने आगामी २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ४५ लाख लोकसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 4 Mar 2024
पुणे : पुरंदरमध्ये पुन्हा अफूची शेती; कांदा, लसणाच्या पिकात अफूची झाडे

पुणे : पुरंदर तालुक्यातील कोडित गावात पाच दिवसांपूर्वी आढळलेल्या अफूच्या शेतीनंतर पुन्हा मावाडी गावातील शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा…

11:27 (IST) 4 Mar 2024
मला यावेळीदेखील लोकसभेची उमेदवारी मिळेल आणि मी जास्त मताधिक्याने निवडून येईन : सुनील मेंढे

लोकसभा उमेदवारीबाबत भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे म्हणाले, राजकारणात कुठल्या पक्षात स्पर्धा असतेच. या स्पर्धेला माला तशी काही अडचण वाटत नाही. पक्षांमध्ये स्पर्धा ही असलीच पाहिजे. मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदीयातील जनतेची मी प्रामाणिकपणे सेवा केली आहे. मी केलेल्या सर्व कामांची पावती म्हणून मला पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळेल आणि मी मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने मी निवडून येईन

“सुनेत्रावहिनी तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल कराच”, ‘या’ कारणामुळे ठाकरे गटाचा सल्ला

अजित पवार यांनी जुलै २०२३ या महिन्यात महायुतीसह जात सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदारही गेले. त्यांचं हे बंड यशस्वी ठरलं आणि राष्ट्रवादीत फूट पडली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सामनामध्ये भाजपाच्या मांडीवर या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून अजित पवारांवर आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सुनेत्रा वहिनींनी देवेंद्र फडणवीसांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असंही म्हटलं आहे.

राज्य बँक घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवणार होते. त्यांनी तो आत्मनिर्धारच केला होता. त्या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंडाळला. अजित पवारांविरोधात पोलिसांना काहीही ठोस सापडलं नाही. अजित पवारांच्या कथित बँक घोटाळ्यावर फडणवीस यांनी तांडव केले होते. महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा पवारांनी आणि त्यांच्या गँगने लुटल्याचा आरोपच नाही तर आपल्याकडे पुरावे असल्याचे ते सांगत होते. आता या पुराव्यांचे काय झाले? हे पुरावे गिळून ढेकर दिला की आणखी काही केले?

भ्रष्टाचार-भ्रष्टाचार असे ओरडत राहून जमिनीवर काठ्या आपटायच्या आणि माहौल निर्माण करायचा हे यांचे धंदे आहेत. तिसरा पर्याय म्हणजे समाजसेविका सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पती अजित पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी, कुटुंबास मनस्ताप देऊन काकांच्या पाठीत सुरा खुपसण्यास भाग पाडल्याच्या सबबीखाली देवेंद्र फडणवीस व त्यांच्या लोकांवर अब्रू नुकसानीचा खटलाच चालवायाला हवा. कुणीही उठायचे आणि बदनामीचा चिखल उडवायचा हे बरे नाही. असा उल्लेख सामनात करण्यात आला आहे.