Today’s News Update, 21 December 2023 : कोरोना विषाणूच्या नव्या जेएन.१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव सध्या देशभरात पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थाही अलर्ट मोडवर असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आपल्या २४ डिसेंबरच्या मुदतीवर ठाम असून ते इशारा सभा घेणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…
Nagpur Assembly Winter Session 2023 Updates | राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा
सांगली : म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडून विवाहित तरूणीचा मृत्यू झाल्याची घटना जत तालुययातील अंकले गावी बुधवारी घडली. मृत तरूणी मतीमंद असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली असली तरी पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
सविता धोडिंबा राजमाने (वय २३ रा. अंकले) ही विवाहित तरूणी बुधवारी डोर्ली ते अंकले मार्गावरील म्हैसाळ योजनेच्या कालव्यातील पाण्यात पाय घसरून पडली होती. शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस पाटील मनोहर सुतार यांनी जत पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून शवविच्छेदनानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा रेशमासह मुकूट गहाळ झाला असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानच्यावतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या काळम्मावाडी योजनेला बुधवारी पुन्हा एकदा गळती लागली.
अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्याच मित्र तसेच नातेवाईक आणि एका ओळखीतील तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागातील एका चाळीतील खोलीत एका तरुणाने पत्नी आणि दोन मुलांच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅट मारुन त्यांचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
येथील एक रिक्षा चालक मोहन राठोड यांच्या रिक्षेतून बुधवारी एक महिला प्रवास करत होती. रिक्षेतून उतरल्यानंतर ही महिला जवळील सात तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज असलेली पिशवी रिक्षेत विसरली. चालक राठोड यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी ही पिशवी महात्मा फुले पोलीस ठाणे अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केली. सविस्तर वाचा…
घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅस गळती होऊन घरात स्फोट होऊन गंभीररित्या भाजलेल्या येथील मनसेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल विखणकर यांच्यावर नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. ऐशी टक्के भाजलेल्या शीतल यांचे गुरूवारी उपचार सुरू असताना निधन झाले. सविस्तर वाचा…
भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गेल्या काही महिन्यात दोन वेळा शाई फेकीच्या घटना घडल्या होत्या. या दोन्ही घटनेनंतर ज्या ठिकाणी चंद्रकांत पाटील कार्यक्रमास जातात त्या ठिकाणी अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत असतो, ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये. सविस्तर वाचा…
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. मनोज जरांजे पाटील यांनी दिलेली मुदत संपली आहे. सविस्तर वाचा…
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. सविस्तर वाचा…
कोल्हापूर : संसदेच्या प्रांगणामध्ये तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अवमान करणारे वर्तन केले. याचे चित्रीकरण राहुल गांधी यांनी केले. या निंदनीय कृती बद्दल बुधवारी भाजपने बिंदू चौकात निदर्शने केली.
देशविरोधी इंडीया आघाडीचा धिक्कार असो, कॉंग्रेस सरकारचा धिक्कार असो, उपराष्ट्रपतींचा अवमान नही सहेगा हिंदुस्थान अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशाप्रकारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचा अपमान कधीही झाला नाही. कॉंग्रेसच्या हीन वृत्तीचा विचार या कृतीतून दिसून आला आहे.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, गिरीश साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, हर्षद कुंभोजकर, सचिन तोडकर, दिलीप मेत्रानी आदी उपस्थित होते.
“हिंदूमध्ये जात वडिलांवरून ठरते. आई ही वडिलांसोबत कुटुंबात राहते, मुलगाही राहतो. त्यामुळे आई कुणबी असल्यास मुलाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट दिले जाऊ शकत नाही”, असे मिर्झा म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरची मुदत राज्य सरकारला दिली होती. त्यानुसार त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. यासाठी सरकाच्यावतीने मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे पोहोचले आहे.
नागपुरातील विधिमंडळ अधिवेशनात यावर सविस्तर चर्चा टाळून सरकारने पळ काढला, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
आता आर्थिक अनुशेष संपला, भौतिक अनुशेष थोडा शिल्लक आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
धानोरा तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेत सकाळी नाष्ता केल्यानंतर पुन्हा १७ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे काल सुप वाजले. दहा दिवस चाललेल्या अधिवेशनात नेमके किती कामकाज झाले याबाबत प्रत्येक वैदर्भीयांना उत्सूकता असते.
राम ही वैयक्तिक मालमत्ता आहे, असे कुणाला वाटत असेल तर अत्यंत चुकीचे आहे. ‘मन मे बसे राम’, अशी भारताची परंपरा आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून रामाला आपण ओळखतो. त्या रामाला कुणीतरी वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखे वापरून निवडणुकीच्या वेळेस रामाला बाहेर काढले जाते. लोकांच्या श्रद्धेचा राजकीय हितासाठी जो वापर सुरू आहे, तो योग्य नसल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.
मालेगाव : निवासी जागेचे संरक्षण मिळावे म्हणून छायाचित्र ओळखपत्र (फोटोपास) प्राप्त करण्यासाठी झोपडपट्टीधारकांकडून महापालिकेला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या तीन गोण्यांमध्ये भरुन ठेवलेल्या फायली रस्त्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
नाशिक : ज्ञानप्रसाराच्या भूमिकेतून ग्रंथाली प्रकाशनाने महाराष्ट्राच्या १२ जिल्ह्यांमध्ये आयोजलेली विज्ञानधारा-आरोग्ययात्रा नाशिक येथे दाखल होत आहे. २१ ते २३ डिसेंबर या तीन दिवसीय यात्रेत ग्रंथालीद्वारे आरोग्य व विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन अंबड गाव रस्त्यावरील ग्लोबल व्हिजन शाळेत आयोजित करण्यात आले आहे.
ग्लोबल व्हिजन शाळेच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायं सात या वेळेत कोणालाही प्रदर्शनास भेट देता येईल. प्रसिद्ध कलादिग्दर्शक हेमंत जोशी यांनी चितारलेली आरोग्य-विज्ञान विषयक १०० भित्तीपत्रके हे या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण असेल. ग्रंथालीच्या या यात्रेत डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभ्यासक, लेखक, कलाकार अशी अनेक मंडळी सहभागी झालेली आहेत. ही यात्रा नाशिक परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य आणि विज्ञानविषयक विचार-जाणिवा पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारतामध्ये ‘जेएन १’ या ओमायक्राॅनच्या नव्या उपप्रकाराचा विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत असतानाच, ठाणे शहरात गेल्या २० दिवसांत नऊ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सविस्तर वाचा…
कल्याण – वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने वाहनतळांची व्यवस्था पालिकेकडून केली जाते. या नियमाला बगल देऊन ठाकुर्लीत ९० फुटी या सध्या सर्वाधिक वर्दळीचा ठरलेल्या रस्त्यावर म्हसोबा चौकात कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने दूरसंवेदन पध्दतीने दुचाकींचे वाहनतळ सुरू केले आहे. सविस्तर वाचा…
जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सातत्यापुर्ण कारवाईमुळे गेल्या काही काळापासून काही प्रमाणात नियंत्रीत असलेला ठाणे जिल्ह्यातील खाडी पात्रामधील बेकायदा रेती उपशा पुन्हा एकदा जोरात सुरु झाला आहे. सविस्तर वाचा…
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त साधना प्रकाशनच्या राजन हर्षे लिखित ‘पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकावर गुरुवारी (२१ डिसेंबर) होणाऱ्या चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे, असे राष्ट्रीय पुस्तक न्यासाकडून (एनबीटी) कडून ऐनवेळी सांगण्यात आले. सविस्तर वाचा…
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केलेली निविदा दोन दिवसांनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्य केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा सावळा गोंधळ समोर आला आहे. ही निविदा तत्काळ रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. सविस्तर वाचा…
सर्वसामान्यांना स्वप्नातील व वाजवी दरात घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (नरेडको) २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘होमेथॉन २०२३’ या गृह प्रदर्शनाचे आयोजन गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानात करण्यात आले आहे.
नेरुळ-उरण मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक ते आंबिवली असा १९ किलोमीटर तर कळंबोली-चिखले-कोनपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग विकसित करता येऊ शकतो का याची चाचपणी करण्यासाठी सिडकोने एका अभ्यासगटाची स्थापना केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी शेटफळ रस्त्यावर हा अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यातील वरुड गावातील सात पुरूष, सहा महिला आणि लहान मुलांना घेऊन एक पिकअप वाहन पंढरपूरकडे निघाले होते. सकाळी कुर्डूवाडी येथे वाहनाचा अपघात झाला.
एक लाख ८८ हजार ४२४.८८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला.
महाराष्ट्र आणि देशातील सर्व घडामोडी जाणून घ्या