Today’s News Update, 21 December 2023 : कोरोना विषाणूच्या नव्या जेएन.१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव सध्या देशभरात पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थाही अलर्ट मोडवर असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आपल्या २४ डिसेंबरच्या मुदतीवर ठाम असून ते इशारा सभा घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…

Live Updates

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates | राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

11:50 (IST) 21 Dec 2023
नवी मुंबई : साठवलेले पैसे चोरण्यासाठी हत्या, तिघांना अटक

संधी शोधून तिघे उदय शेट्टी ज्या खोलीत झोपतो तिथे गेले. पैसे चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ज्या ठिकाणी पैसे ठेवले त्या कपाटाला कुलूप होते.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 21 Dec 2023
सरकारी अधिकारी जाणूनबुजून मराठा समाजाला नोटीस देत आहे – जरांगे पाटील

मराठा समाजाने आता शांततेत कार्यक्रम घेऊ नये, असे सरकारला वाटत असेल म्हणून सरकारच्या वतीने मराठा समाजातील लोकांना जाणूनबुजून नोटिसा पाठविल्या जात आहेत, असा आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.

11:37 (IST) 21 Dec 2023
नागपूरला पळवलेले पशुधन मंडळाचे मुख्यालय अकोल्यात परतणार, नेमके कारण काय? वाचा…

हे मुख्यालय पुन्हा अकोल्यात स्थलांतरित करण्याचे निर्देश महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 21 Dec 2023
रेल्वेतील धूरशोधक यंत्रणा निष्क्रिय

मुंबई : रेल्वे गाड्यांमध्ये धूम्रपान करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी शौचालयात बसवण्यात आलेली धूर शोधक यंत्रणा ‘टिश्यू पेपर’ने झाकून ती निष्क्रिय केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

वाचा सविस्तर…

11:18 (IST) 21 Dec 2023
धक्कादायक! तलाठ्यावर गौण खनिज तस्करांचा जीवघेणा हल्ला

गंभीर जखमी झालेल्या अवस्थेतच तलाठी मोडके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 21 Dec 2023
चंद्रपूर : दोन वाघ रस्ता पार करताना दिसल्याने खळबळ, उर्जानगर वसाहत परिसरात सतर्कतेचा इशारा

वीज केंद्र परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 21 Dec 2023
थंडीमुळे चंद्रपूर गारठले, सर्वत्र हुडहुडी

देशासह राज्यात सर्वाधिक उष्ण शहर असलेले चंद्रपूर हे हिवाळ्यात गारठले असून तापमान ९.२ अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे.

सविस्तर वाचा…

11:02 (IST) 21 Dec 2023
भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या, हडपसर भागातील घटना

धुमाळ यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

सविस्तर वाचा…

11:01 (IST) 21 Dec 2023
पळा, पळा… रेल्वेला आग लागली! आळंदी रेल्वे स्थानकावर एकच धावाधाव अन् शेवटी…

अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली.

सविस्तर वाचा…

10:59 (IST) 21 Dec 2023
विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार गटाचे वर्चस्व असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे टेस्ट ऑडिट होणार

नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात आमदार प्रतिभा धानोकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते.

सविस्तर वाचा…

10:39 (IST) 21 Dec 2023
डोंबिवली मोठागाव खाडीत बेकायदा रेती उपसा- दिवस-रात्र सक्शन पंपाची धडधड

जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या सातत्यापुर्ण कारवाईमुळे गेल्या काही काळापासून काही प्रमाणात नियंत्रीत असलेला ठाणे जिल्ह्यातील खाडी पात्रामधील बेकायदा रेती उपशा पुन्हा एकदा जोरात सुरु झाला आहे. सविस्तर वाचा

10:39 (IST) 21 Dec 2023
पिंपरी : पदपथांवर कोट्यवधींचा खर्च, तरीही पादचारी रस्त्यावरच! काय आहे कारण?

शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे पदपथांना अतिक्रमणांनी विळखा घातला असून, पादचाऱ्यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा

10:38 (IST) 21 Dec 2023
पिंपरी : मुख्यमंत्र्यांच्या आदेशापूर्वीच महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे महापालिकेला पत्र; केली ‘ही’ मागणी

महापालिकेचे चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाच्या वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश देण्याच्या एक दिवस अगोदरच महामंडळाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ताबा मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी १२ डिसेंबर रोजी प्राणी संग्रहालय हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा

10:37 (IST) 21 Dec 2023
पुणे : करोना काळानंतरचा मोठा बदल… ‘याच्या’ मागणीमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ!

करोना काळानंतर पुस्तक वाचनाचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा विद्यार्थी-पालकांना समजल्या. त्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या पुस्तकांच्या मागणीतील वाढ ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यात कृती पुस्तके, अवांतर वाचनासाठी गोष्टीच्या पुस्तकांना विशेष मागणी असल्याचे निरीक्षण मराठे यांनी नोंदवले. सविस्तर वाचा

10:35 (IST) 21 Dec 2023
अनधिकृत जाहिरात फलक अधिकृत करण्याचा महापालिकेचाच घाट?

पुणे : महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेला वादग्रस्त जाहिरात फलक पाडण्याऐवजी जागा अकरा महिन्यांसाठी भाडेकराराने देण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या माध्यमातून अनधिकृत जाहिरात फलक अधिकृत करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत.

नदीपात्रातील संभाजी पुलालगतच्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत लोखंडी जाहिरात फलक उभारण्यात आला होता. हा जाहिरात फलक अनधिकृत असल्याचे पुढे आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. परवाना आणि आकाशचिन्ह विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत जाहिरात फलकाची उभारणी करण्यात आल्याचे पुढे आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडून या प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कसबा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाकडून त्याबाबत अहवालही मागविण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार आणि आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केलेल्या पाहणीत महापालिकेच्या जागेत जाहिरात फलकाची उभारणी केल्याचे पुढे आल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता हा जाहिरात फलक अधिकृत करण्याचा घाट महापालिका प्रशासनाकडूनच घालण्यात आला आहे.

महापालिकेच्या जागेत असलेल्या फलकाचा लोखंडी सांगाडा पाडण्याऐवजी जागा अकरा महिन्यांच्या मुदतीसाठी संबंधित व्यावसायिकास भाडेकराराने देण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलकाला वाचविण्याचा प्रयत्न प्रशानसाकडून सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

10:34 (IST) 21 Dec 2023
नव्या वर्षात पुणेकरांसाठी खुशखबर : मिळकत कराबाबत महापालिकेने दिले ‘हे ‘संकेत

मिळकतकरात वाढ न करण्याचे महापालिकेचे संकेत

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मिळकतकरामध्ये आगामी आर्थिक वर्षात कोणतीही करवाढ न करण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. त्यामुळे शहरातील लाखो मिळकतधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही मिळकतकरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती.

आगामी आर्थिक वर्षासाठीचे (२०२४-२५) महापालिकेचे अंदाजपत्रक करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. साधारपणे महापालिका प्रशासनाकडून मिळतकरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला जातो. मात्र स्थायी समितीकडून अंदाजपत्रक निश्चित करताना करवाढ करायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेचे सभागृह अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार यांचे अंदाजपत्रक अंतिम होत असून त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी मिळतकरामध्ये वाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असतानाच कर आकारणी आणि कर संकलन विभागाने करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

मिळकतकराबरोबरच बांधकाम शुल्क, वस्तू आणि सेवा करातून मिळणारे उत्पन्न, मुद्रांक शुल्क महापालिकेचे अन्य आर्थिक स्रोत आहेत. गेल्या काही वर्षात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी महापालिकेची परिस्थिती झाली आहे. जायका प्रकल्प, मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना, समाविष्ट गावांसाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यातच सातव्या वेतन आयोगाचा आर्थिक भारही महापालिका प्रशासनावर पडला आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी महापालिकेची धावाधाव सुरू झाली आहे. त्यामुळे मिळकतकरामध्ये वाढ होईल, अशी शक्यता होती. मात्र करवाढीऐवजी थकबाकी वसुलीला प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

10:31 (IST) 21 Dec 2023
मुंबई : डेटिंग ॲपवर ओळख झाल्यानंतर सहाय्यक दिग्दर्शकाकडे खंडणीची मागणी

मुंबई : टिंडर या डेटिंग ॲपवर झालेल्या ओळखीनंतर सहाय्यक दिग्दर्शकाचे नग्नावस्थेत चित्रीकरण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार घडला आहे.

वाचा सविस्तर…

10:30 (IST) 21 Dec 2023
पक्षफूट हा मतदारांचा विश्वासघात! उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल; केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबई : राजकीय पक्षातील फूट आणि अन्य पक्षात प्रवेश करणे हा सध्याच्या राजकीय संस्कृतीचा भाग बनला असून हा एक प्रकारे मतदारांचा विश्वासघात आहे. त्यामुळे, पक्षांतील फूट आणि विलीनीकरणाला संरक्षण देणारा राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील चौथा परिच्छेद रद्द करण्याच्या मागणीसाठी केलेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने बुधवारी दखल घेतली.

वाचा सविस्तर…

10:28 (IST) 21 Dec 2023
राज्यात भाजपा एकट्याने निवडणूक लढविणार – जितेंद्र आव्हाड

“नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले”, असे ट्विट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र आणि देशातील सर्व घडामोडी जाणून घ्या