Marathi News Update : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी औषधोपचार घेणंही बंद केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ आणि आपल्या देशाचं नाव बदललं जाणार असल्याच्या चर्चांमुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकारण ढवळून निघत आहेत. आज दिवसभरात आपल्याला यासंबंधीच्या बातम्या पाहायला मिळणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एकाच क्लिकवर
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा अवधी मागितला होता. मनोज जरांगे यांनी त्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. तसेच ते म्हणाले, सरकारला एक महिन्याचा वेळ दिला तरी मी ही जागा सोडणार नाही. तुमच्या हातात प्रमाणपत्र मिळत नाही तोवर मागे हटणार नाही. समाजाने सरकारला ४० वर्ष दिली आहेत, आता एक महिना देऊ. यावर जरांगे पाटलांनी सर्व आंदोलकांना विचारलं की आपण या सरकारला एक महिना द्यायचा का? त्यावर सर्व आंदोलकांनी होकार दिला. मनोज जरांगे यांनी माच मागण्या मांडल्या.
१) अहवाल कसाही आला तरीही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं लागणार.
२) महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे सगळे गुन्हे मागे घेतले जावेत
३) जे अधिकारी दोषी आहेत त्यांचं निलंबन करा.
४) उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ तसंच छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले हे सगळे तुमच्याबरोबर आले पाहिजेत.
५) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजेच सरकार हे सगळं आम्हाला लेखी हवं आहे वेळेची मर्यादा घालून दिली आहे हे त्यात नमूद करावं.
या पाच मागण्या मांडून मनोज जरांगे म्हणाले, हे पाच मुद्दे पसंत असतील तर सांगू नाहीतर त्यांची आणि आपली सोयरीक मोडलीच म्हणून समजा.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कोल्हापूर महानगर अध्यक्ष निवडीवरून वाद विरतो न विरतो तोवर आता पदाधिकारी निवडीवरून आजरा तालुक्यात चक्क कार्यालयालाच टाळे ठोकले आहे. नाराज कार्यकर्त्यांचा सारा रोख उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर दिसून येत आहे.
सरकारचं मत आहे की मराठ्याला टिकणारं आरक्षण आम्ही देऊ, कोणीही आव्हान देणार नाही असं आरक्षण देऊ, फक्त एक महिन्याचा वेळ द्या. आम्ही एक महिनाही देऊ पण ती प्रक्रिया कशी राबवणार ते सांगा. आपलं आरक्षण अंतिम टप्प्यात आलंय, हे ४० वर्षांत आलं नव्हतं, तोंडाचा घास जवळ आला आहे. कितीही विरोध करूद्यात, आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही.
हातात आरक्षणाचं पत्र पडेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही. शेवटच्या माणसाच्या हातात पत्र पडेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. हे आंदोलन थांबणार नाही म्हणजे नाही. सरकारचं १५ दिवसांपासून म्हणणं आहे की ४० वर्षे थांबलात आता १ महिना थांबा. मी पाच दिवस जास्त देतो, पण का वेळ द्यायचा याचं उत्तर द्या. का वेळ पाहिजे याचं उत्तर द्या.
मुंबई : वसई-विरारला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील पहिला टप्पा जूनमध्येच पूर्ण झाला आहे. मात्र तरीही या प्रकल्पातून वसई-विरारकरांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयावर मोर्चा काढला होता.
वर्धा : काही दिवसांत गणपती बाप्पाचे धडाक्यात आगमन होणार. घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव होणार. मात्र गणपती मंडळास असा सार्वजनिक उत्सव साजरा करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. उत्सवसाठी काही परवानग्या आवश्यक असतात.
गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. राज्य सरकारकडून वारंवार मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाचा ठराव पारित केल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, जोपर्यंत हातात प्रमाणपत्र पडत नाही, तोपर्यंत मी हटणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना सांगितलं की मी आता आमच्या ग्रामस्थांशी आणि समाजाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईन. जरांगे पाटलांची समाजबांधवांबरोबरची बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीतच ते त्यांचा निर्णय जाहीर करतील. पुढच्या अर्ध्या तासात जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबतचा निर्णय जाहीर होईल.
गडचिरोली : बैल पोळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह असून शहरातील बाजारपेठ विविध आकाराच्या लाकडी नंदीबैलांनी फुलली आहे. यात ७० हजारांची बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. यातील एक बैल ४० तर दुसरा ३० हजारांचा आहे.
येथे उद्या, बुधवारी आयोजित सकल मराठा समाजाचा मोर्चा सात वर्षांपूर्वीच्या आंदोलनाचा विक्रम मोडून काढणारा ठरावा, यासाठी आयोजक युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. या मोर्च्यात आरक्षण लढ्याचे सामाजिक ‘आयकॉन’ ठरलेले मनोज जरांगे यांचे कुटुंबीय सहभागी व्हावे यासाठी आयोजक कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे. सविस्तर वाचा…
राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सविस्तर वाचा…
बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरतीचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्याबाबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एका शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात तीन कंत्राटी कर्मचारी काम करू शकतात’ असे विधान केले. सविस्तर वाचा…
पालिका हद्दीतील खड्डे भरणीची कामे येत्या तीन दिवसात रात्रंदिवस काम करुन पूर्ण करावीत. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे. सविस्तर वाचा…
मुंबई : पदपथांवर बेकायदा फेरीवाले अतिक्रमण करत असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. फेरीवाला धोरणाचा अर्थ कुठेही व्यवसाय करावा किंवा दुकान थाटावे असा होत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पदपथांवरील बेकायदा फेरीवाल्यांबाबत सोमवारी टिप्पणी केली.
नागपूर: हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्त्वाचे स्थान आहे.
नागपूर : मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत, अशा लोकांनी नवीन शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. दिवाळी आली की वधू-वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीला लागतात. तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्यांना सुरुवात होते.
पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या १ मार्च २०२४ पर्यंत गावांचा विकास आराखडा करण्यास मुदत मिळाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र अनेकदा त्यांचे वक्तव्य त्यांच्यावरच उलटलेले आहेत. अशीच काहीशी घटना सध्या राज्यात घडली आहे. राज्य शासनाने यापुढे अनेक विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. सविस्तर वाचा…
संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगाव शहराचा होणारा वाढता विस्तार आणि वाहतुकीचा पडणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता शहर वाहतूक पोलीस शाखेसाठी मनुष्यबळ तोकडे पडत असून त्यामुळे समस्या निर्माण होत असल्याकडे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने बोट ठेवले आहे. सविस्तर वाचा…
येथील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावरील प्राचीन गावदेवी मंदिराजवळील उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती. या बेकायदा इमारत प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
ठाण्यातील मासुंदा तलावात मंगळवारी सकाळी सुमारे ७० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिलेची ओळख पटलेली नाही. मृतदेह आढळल्याने सकाळी तलाव परिसरात फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दोन दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची मदत करणे, महागात पडल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने त्याच्या मदतीस अन्य मित्राला बोलावले, मात्र तो आला आणि तो येई पर्यंत ज्याने जखमी अपघातग्रस्ताला मदत केली त्याच्यावरच चाकूचे वार केल्याची घटना घडली. सविस्तर वाचा…
प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी सेवा ठप्प होऊन नागरिकांचे अतोनात हाल होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
तांत्रिक आराखड्यातील रचनेत बदल झाल्यामुळे सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लगाराच्या खर्चात पाचव्यांदा सात कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. परिणामी, सल्लागाराचे मुळ शुल्क ३५ कोटी रुपयांवरून वाढून ८५ कोटींवर पोहोचले आहे. सविस्तर वाचा…
स्वत:च्या मालकीचे धरण असलेली राज्यातील मुंबईनंतरची एकमेव महापालिका म्हणून मोठ्या अभिमानाने मिरविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला आपल्या हद्दीतील वेगवेगळ्या उपनगरांना समान पाण्याचा पुरवठा करणे शक्य होत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील हे गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. भिडे यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटलांची विचारपूस केली. यावेळी संभाजी भिडे म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही करताय ते योग्य आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे, असं माझं मत आहे. तुमच्या यां आंदोलनाला तपश्चर्येला यश मिळणार. ते राजकारणी आहेत म्हणून उगीच भीती बाळगू नका. ते जो शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे लागलं.”
खासदार संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय घेतला पाहिजे. यासाठी घटनेत तरतूद करावी, तसेच घटनादुरुस्ती केली पाहिजे. आरक्षणाविषयी सर्वसमावेशक असा तोडगा काढणं गरजेचं आहे. एवढचं आमचं म्हणणं आहे.
“लोकांनी मंत्र्यांवर हल्ले करू नयेत, आमदारांच्या गाड्या…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, येत्या १६ किंवा १७ सप्टेंबरला मराठवाड्यात कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्यांची कॅबिनेट बैठक मराठवाड्यात घेत आहेत. परंतु, त्या बैठकीआधी त्यांना मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण गुंडाळायचं आहे. म्हणून ही खोटी आश्वासनं, समित्या, उपसमित्या नेमण्याचे प्रकार सुरू आहेत. जेणेकरून त्यांच्या मराठवाड्यातील बैठकीला अपशकून नको. लोकांनी रस्त्यावर उतरू नये, लोकांनी बंद पुकारू नये, मंत्र्यांवर हल्ले करू नयेत, सत्ताधारी आमदारांच्या गाड्या फोडू नयेत या भितीपोटी त्यांना मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळायचं आहे.