Mumbai Live News Today: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेवर तातडीने अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागणीसाठी गेल्या ७ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण चालू केलं आहे. मराठा आरक्षणसासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला मराठ्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल तयार करून आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची घोषणा केली आहे. या अधिवेशना मराठा आरक्षण व राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. या मुख्य बातमीसह राज्यातल्या सगळ्याच महत्वाच्या घडामोडींवर ब्लॉगच्या माध्यमातून आपली नजर असणार आहे.

Live Updates

Maharashtra Live News Today 16 February 2024|Maharashtra News Live: मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे काय बोलणार? यासह महत्त्वाच्या घडामोडी

17:58 (IST) 16 Feb 2024
सातारा लोकसभेसाठी अजित पवार आग्रही; महामेळाव्यातून रणशिंग फुंकणार!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादीची महत्वपूर्ण बैठक मुंबईत प्रदेश राष्ट्रवादी भवनात झाली.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 16 Feb 2024
“भाजपाने नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले”, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

भाजपाने नेत्यांवर चौकशीची कारवाई केली. त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण केली, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

सविस्तर वाचा...

17:57 (IST) 16 Feb 2024
अखेर ‘तो’ सिरीयल रेपिस्ट गजाआड, वसई पोलिसांच्या गुन्हे शाखा २ ने सुरत येथून केली अटक

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसई विरार शहरात सिरीयल रेपिस्टची दहशत पसरली होती.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 16 Feb 2024
“भाजपाने नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण करून पक्ष फोडले”, पृथ्वीराज चव्हाणांची टीका

भाजपाने नेत्यांवर चौकशीची कारवाई केली. त्यांना तुरुंगात डांबून ठेवलं, दहशत निर्माण केली, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

सविस्तर वाचा...

16:52 (IST) 16 Feb 2024
गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!

गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 16 Feb 2024
रेल्वेचा २२ फेब्रुवारीपर्यंत ब्लॉक! पुणे-मिरजदरम्यान गाड्या रद्द; काही गाड्या विलंबाने धावणार

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-मिरज मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे या स्थानकांदरम्यान लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सुरू झाला असून, तो २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्या विलंबाने धावणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:15 (IST) 16 Feb 2024
नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूटच्या निवासी डॉक्टरांचे कामबंद…निदर्शने सुरू

नागपुरातील एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरच्या निवासी डॉक्टरांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर विद्यावेतनाची मागणी केली जात आहे.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 16 Feb 2024
राहुल गांधी यांची ओबीसींवर टीका, बावनकुळे म्हणाले “…तर काँग्रेस संपून जाईल”

खरे तर ओबीसी समाज काँग्रेसवर नाराज असल्यामुळे प्रथम पटोले यांनीच राजीनामा द्यावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 16 Feb 2024
पिंपरी- चिंचवड : महानगरपालिका शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी- चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 16 Feb 2024
बुलढाणा : अवकाळी पावसाचा आंब्याच्या मोहोराला फटका; वीज पडून एकाचा मृत्यू

जिल्ह्यात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज अंगावर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 16 Feb 2024
पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात डंपरची प्रवासी बसला धडक, अपघातात सात प्रवासी जखमी

पुणे : मुंबई – बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला. मुंबईकडून वेगाने निघालेल्या डंपरने प्रवासी बसला धडक दिली. अपघातात सात प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला.

सविस्तर वाचा....

13:57 (IST) 16 Feb 2024
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या रूपात पाहायचे आहे – अर्जुन खोतकर

पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या रूपाने आम्ही पाहू इच्छित आहे, असे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 16 Feb 2024
VIDEO : …अन् बिबट्याच्या बछड्यांना त्यांची आई मिळाली!

एकदा नाही तर दोनदा ते आईपासून वेगळे झाले. चिमुकले जीव.. त्यांना काय करावे, कुठे जावे काहीच कळत नव्हते. त्यांची नजर आईला सैरभैर शोधत होती.

सविस्तर वाचा...

13:22 (IST) 16 Feb 2024
मुंबई : गिरणी कामगार पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई : दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू कलेल्या विशेष अभियानाला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभियानाची मुदत गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत होती. मुंबई मंडळाने गुरुवारी या अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली.

सविस्तर वाचा...

13:19 (IST) 16 Feb 2024
पुणे मेट्रोने प्रवास करताय..वाहनतळासाठी आता पैसे मोजावे लागणार! जाणून घ्या शुल्क…

पुणे : पुणे मेट्रोच्या स्थानकांवर वाहनतळाची सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. सध्या केवळ आठ मेट्रो स्थानकांवर वाहनतळाची सुविधा आहे. आता त्याच ठिकाणी सशुल्क वाहनतळाची सुविधा महामेट्रोने सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

13:14 (IST) 16 Feb 2024
बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकात शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होती. सकाळच्या सुमारास हा बिघाड झाल्याने, चर्चगेटकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

वाचा सविस्तर...

13:06 (IST) 16 Feb 2024
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा १८ फेब्रुवारीलाच का ? जाणून घ्या या दिवसाचे ऐतिहासिक महत्व

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या महाएल्गार सभेचे आयोजन १८ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

12:57 (IST) 16 Feb 2024
वरळीतील प्रस्तावित वाहनतळाची क्षमता वाढवणार, चार वर्षांत भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करणार; २१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित

मुंबई : वरळी येथील मुंबई महानगरपालिकेच्या ‘इंजिनिअरिंग हब’जवळ बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळाची क्षमता वाढवण्यात आली आहे. चार वर्षांत हे भूमिगत वाहनतळ बांधून पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

वाचा सविस्तर...

12:52 (IST) 16 Feb 2024
आयुर्वेद, होमिओपॅथीलाही आंतरवासिता वाढीव विद्यावेतन!

वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालयातील आंतरवासिता (इंटर्न) विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दुप्पट करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला होता.

सविस्तर वाचा...

12:37 (IST) 16 Feb 2024
नागपूर : चोरीचे सोने विकून चोरट्याने घेतली कार!

चोरलेले दाग-दागिने विकून त्याने चक्क कार घेतली. कार घेऊन ऐटीत फिरायला लागला.

सविस्तर वाचा...

12:26 (IST) 16 Feb 2024
मुंबईत आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम

मुंबई शहर, तसेच उपनगरातील किमान तापमान आणि कमाल तापमान २० ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून शहर आणि उपनगरांमध्ये आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा सविस्तर...

12:25 (IST) 16 Feb 2024
धोकादायक ‘मेडीगड्डा’ धरणामुळे दोन राज्यांतील नागरीकांचा जीव टांगणीला! राजकीय आरोप- प्रत्यारोप

तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी १३ फेब्रुवारी रोजी आपल्या मंत्रिमंडळ व आमदारांसह गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या ‘मेडीगड्डा’ धरणाचा दौरा केला.

सविस्तर वाचा...

12:23 (IST) 16 Feb 2024
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार? फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले, "पुढचा मुख्यमंत्री..."

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील. सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षांत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील राजकारणाचे गणित पुरते बदलले आहे. या दोन्ही पक्षांचा एक गट भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न विचारला जातोय. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर

12:11 (IST) 16 Feb 2024
मुंबई : मुलीची हत्या करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : बोरिवली पूर्व येथे आईने मुलीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बोरिवली येथील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बोरिवली पूर्व येथील कुलूपवाडी परिसरातील गोरक्षधाम इमारतीत गुरूवारी रात्री हा प्रकार घडला. आरोपी महिला रेखा सोलंकी यांनी आपली ११ वर्षांची मुलगी रूहानी सोलंकी हिचा राहत्या घरी ओढळीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलीला तात्काळ कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. पण मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रेखा सोलंकी यांच्यावरही उपचार सुरू आहे. याप्रकरणी मृत रुहानी हिचे वडील राज सोलंकी यांच्या तक्रारीवरून रेखा सोलंकीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती राज यांनी जबाबात दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

12:06 (IST) 16 Feb 2024
Thane dog abuse case : चित्रिकरण प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, वेटिक पशु चिकिस्तालयाच्या मालक-व्यवस्थापक विरोधातही गुन्हा

ठाणे : घोडबंदर येथील वेटिक या पशू चिकित्सालयातील कर्मचाऱ्यांनी एका श्वानाला अमानुष मारहाण करून त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. संपूर्ण देशभरात हे चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर याप्रकरणी श्वानाला मारहाण करणारे कर्मचारी आणि वेटिक चिकित्सालयाच्या अधिकाऱ्यांविरोधात रात्री उशीरा चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

11:58 (IST) 16 Feb 2024
लहान मुलांचे आता मेंदूज्वरापासून संरक्षण! सरकारचा लसीकरण कार्यक्रम जाणून घ्या…

पुणे : जापनीज इन्सेफेलायटिसला (मेंदूज्वर) प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील १ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 16 Feb 2024
धक्कादायक! राज्यात दिवसाला ३४ बाळांचा गर्भातच मृत्यू!

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो. परंतु, राज्यात दर दिवसाला ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहेत.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 16 Feb 2024
‘मास्टर लिस्ट’मधील विजेत्यांची पुन्हा पडताळणी होणार! तक्रारींमुळे म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अंतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील बृहतसूचीवरील (मास्टर लिस्ट) जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील जे २६५ रहिवाशी ॲानलाईन सोडतीद्वारे पात्र ठरले आहेत, त्यांची पुन्हा पात्रता पडताळणी होणार आहे.

वाचा सविस्तर...

11:47 (IST) 16 Feb 2024
मुंबई : मालमत्ता करवाढ न करण्यावर स्वाक्षरी, राज्यपालांच्या सहीनंतर आता केवळ अध्यादेशाची प्रतीक्षा

मुंबई : चालू आर्थिक वर्षात मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात घेतला असला तरी प्रत्यक्षात छापील देयके हातात पडण्यास अजून वेळ लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राज्यपालांनी गुरुवारी सायंकाळी स्वाक्षरी केली. मात्र आता याबाबतचा अध्यादेश काढल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

वाचा सविस्तर...

11:04 (IST) 16 Feb 2024
पिंपरी : महापालिका शाळांतील मुलांसाठी २९ कोटींचे गणवेश

पिंपरी : आगामी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश, ऊबदार स्वेटर खरेदी केले जाणार आहेत.

सविस्तर वाचा...

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटील (संग्रहित छायाचित्र)

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. आता प्रश्न आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार याचा. मागच्या सात दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. आज दुपारी ते पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडणार आहेत.