Maharashtra News Today, 03 November 2023: मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. तरीही मराठा आरक्षणाची लढाई सुरुच राहणार असल्याचं म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. तर सरकारतर्फे हे सांगण्यात येतं आहे की २ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. नेमकी कुठली डेडलाईन आहे याबाबत संभ्रम आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली आहे. या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Latest Marathi News Updates|Maharashtra Breaking News : मराठा आरक्षणासाठी डेडलाईन २४ डिसेंबर की २ जानेवारी? यासह महत्त्वाच्या बातम्या

18:57 (IST) 3 Nov 2023
कुख्यात भामटे अजय-विजय गजाआड; फसवणुकीच्या ६३ गुन्ह्यांची नोंद

समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच त्याच्याकडील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम हातचलाखीने काढून पसार व्हायचे.

सविस्तर वाचा…

18:51 (IST) 3 Nov 2023
दिवाळीमुळे वाहतूक मार्गात बदल

ठाणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुमारे १६०० कोटी रुपये खर्चून आनंदनगर ते साकेत असा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

18:23 (IST) 3 Nov 2023
तरुणाचे अपहरण करून १० हजार रुपये लुटले; एक आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू

आरोपींनी गोवंडी येथे सरफराजला मारहाण केली आणि त्याच्याकडील रोख १० हजार रुपये रक्कम घेऊन पोबारा केला.

सविस्तर वाचा…

18:17 (IST) 3 Nov 2023
आमदार प्रतिभा धानोरकर संतापल्या… वीज कार्यालयाला ठोकले कुलूप; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना खोलीत कोंडले

चंद्रपूर: शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी वरोरा येथील राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून कुलूप ठोकले.

सविस्तर वाचा…

18:17 (IST) 3 Nov 2023
डोंबिवली : भरधाव वाहनाने दिली चार ते पाच वाहनांना धडक; ठाकुर्लीत घडला प्रकार

मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे. दुपारच्या वेळी हा अपघात झाला. त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

सविस्तर वाचा…

17:58 (IST) 3 Nov 2023
सांगली : विट्याचा गणेश हत्ती उपचारासाठी गुजरातला रवाना

बिहारमधील पाटणाजवळील सोनपूर येथून गणेश या हत्तीला विट्यात आणले. त्यावेळी गणेशचे वय चार वर्षे होते.

सविस्तर वाचा…

17:45 (IST) 3 Nov 2023
मराठा आरक्षणासाठी अकोल्यात सलग सहा दिवस ‘अन्नत्याग’; अखेर उपोषण सोडताना म्हणाले, ‘आता…’

अकोला: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजसेवक गजानन हरणे यांनी सलग सहा दिवस अन्नत्याग्र सत्याग्रह केला.

सविस्तर वाचा…

17:42 (IST) 3 Nov 2023
महाड एमआयडीसीत स्फोट, पाच जण जखमी; ११ कामगार बेपत्ता

संध्याकाळी उशीरापर्यंत मदत व बचाव कार्य सुरू होते. दुर्घटना घडली त्यावेळी कंपनीत एकूण ५७ कामगार काम करत होते.

सविस्तर वाचा…

17:25 (IST) 3 Nov 2023
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार

लिंबू, हळदीकुंकू, टाचण्या टोचलेल्या बाहुल्या आदी वस्तू आढळून आल्या आहेत. लगतच असलेल्या लाल कापडावर दुरडी लगत या बाहुल्या ठेवण्यात आल्या होत्या.

सविस्तर वाचा…

17:01 (IST) 3 Nov 2023
जातीच्या दाखल्यात फेरफार केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

संबंधित महिलेने मराठा जात ऐवजी वडार जात लावून जन्म तारखेत बदल करत वडार जातीच्या दाखल्याची मागणी केली.

सविस्तर वाचा…

16:58 (IST) 3 Nov 2023
नागपूर: शाळेतील खड्ड्यात पडून मृत्यू, शेकडो पालकांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी सारंगाला अखेरचा निरोप

नागपूर: भारतीय विद्या भवन शाळेतील तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी सारंग होमेश्वर नागपुरे याचा फुटबॉल खेळताना शाळेच्या मैदानावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याच्या घटनेने पालक आणि विद्यार्थीही हादरले आहेत.

सविस्तर वाचा…

16:39 (IST) 3 Nov 2023
थंडीत श्वसन विकाराचे रुग्ण वाढले; दिवाळीत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा धोका

नागपूर: उपराजधानीत उन आणि थंडीचा खेळामुळे तापमानात वारंवार बदल होत आहे. या बदलामुळे शहरात श्वसन विकाराचे रुग्ण वाढले आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे वायू प्रदुषणात वाढ होऊन हे रुग्ण वाढण्याचा धोका आहे.

सविस्तर वाचा…

16:38 (IST) 3 Nov 2023
यवतमाळच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा; विनावेतन सहायक शिक्षकाकडून नियुक्तीसाठी २० लाख रुपये घेतल्याची तक्रार

यवतमाळ: एका अनुदानित खासगी शाळेवर विनावेतन सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ येथील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह संस्था चालकांविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

16:01 (IST) 3 Nov 2023
अमरावती-पुणे, बडनेरा-नाशिकदरम्‍यान ३६ उत्‍सव विशेष रेल्‍वेगाड्या

अमरावती: दिवाळी सणानिमित्‍त प्रवाशांची अतिरिक्‍त गर्दी लक्षात घेऊन मध्‍य रेल्‍वेने अमरावती-पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्‍यान उत्‍सव विशेष मेमू रेल्‍वेगाड्या चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 3 Nov 2023
केळीच्या विम्यासाठी दहा हजार बोगस अर्ज; जळगावमधील प्रकार

२०२२-२३ मध्ये केळीच्या फळपीक विम्यासाठी एकूण ७७,८३२ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी १०,६१९ फळपीक विम्याचे अर्ज बोगस असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

15:44 (IST) 3 Nov 2023
वृक्षांना रोषणाईचा फास, नवी मुंबई शहरात स्वच्छतेतील अग्रक्रमासाठी कोट्यवधींचा झगमगाट

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात नवी मुंबईचा अग्रक्रमांक असावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांचा झगमगाट केला जात असून रस्त्यांच्या कडेला तसेच दुभाजकांवर असलेल्या वृक्षांवरही रोषणाईचा हा फास आवळला जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महापालिकेच्या विद्युत विभागाने या रोषणाईसाठी खास निविदा मागविल्या आहेत.

सविस्तर वाचा…

15:42 (IST) 3 Nov 2023
नागपूरमध्ये व्हीव्हीआयपींच्या दौ-यानिमित्त कोट्यवधींची कामे

नागपूर: डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा आणि विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असल्याने यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या आहेत.

सविस्तर वाचा…

15:27 (IST) 3 Nov 2023
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तणाव; पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची घटना समोर आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. त्या घटनेच्या निषेधार्थ भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काही संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि घोषणा देणार्‍यांमध्ये वाद झाला. विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देणार्‍या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

15:17 (IST) 3 Nov 2023
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वसईत दाखवले काळे झेंडे, आगरी सेनेचे दोन कार्यकर्ते ताब्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवारी विरार येथे बॅंकेच्या कार्यक्रमासाठी येत असताना आगरी सेनेतर्फे त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. याप्रकरणी विरार पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

वाचा सविस्तर…

15:16 (IST) 3 Nov 2023
उरणच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती, रात्रीच वाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत

उरण : तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील एमआयडीसीच्या जलवाहिनीला गुरुवारी रात्री १० वाजता गळती लागली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने उरणकरांवर येणारे पाणी कपातीचे संकट दूर झाले.

सविस्तर वाचा…

15:04 (IST) 3 Nov 2023
मुंबई : म्हाडा सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे अखेर रिक्त राहणार! प्रतीक्षा यादीतील कपात भोवली!

मुंबई : मुंबईतील चार हजार ८२ घरांसाठी काढलेल्या सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे विविध कारणांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अखत्यारीतील मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे परत आली आहेत.

सविस्तर वाचा…

14:23 (IST) 3 Nov 2023
चंद्रपूरचा दीपक ठरला ब्रिटीश सरकारचा ‘गोल्ड’ मॅन! लंडनमधील शैक्षणिक स्वयंसेवेची जागतिक दखल

चंद्रपूर: युनायटेड किंग्डम येथे जगभरातून उच्च शिक्षणासाठी जाणा-या तरुणांना शिक्षणासह ज्यांच्या कामाचा सामाजिक प्रभाव तेथील सरकारवर पडतो, त्यांना ब्रिटीश सरकारच्या फॉरेन काॅमनवेल्थ डेवलपमेंट विभागाकडून गौरवण्यात येते.

सविस्तर वाचा…

14:19 (IST) 3 Nov 2023
‘महाज्योती’च्या सरसकट अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे आझाद मैदानात बेमुदत उपोषण

महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्योती’ संस्थेतर्फे २०२० पासून राज्यातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती’च्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते.

सविस्तर वाचा…

14:07 (IST) 3 Nov 2023
कर्मचाऱ्यांना आगामी वर्षात ९.८ टक्के पगार वाढ शक्य

जागतिक पातळीवरील प्रतिकूल घटनांमुळे जागतिक मंदीची चिंता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

14:06 (IST) 3 Nov 2023
गोवा, सिंधुदुर्गमध्ये तीन दिवस पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 3 Nov 2023
नवी मुंबई: शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष, १ कोटी ३७ लाखांची फसवणूक

शेअर मार्केट मध्ये जादा आमिष दाखवून वाशीतील एका व्यक्तीची तब्बल एक कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून सायबर शाखा आरोपीचा शोध घेत आहे. 

वाचा सविस्तर…

13:23 (IST) 3 Nov 2023
नागपूर: वृद्धेला विषारी सापाचा दंश; साप घेऊनच गाठले रुग्णालय…

नागपूर: अमरावती रोडवरील सातनवरी गावातील फार्म हाऊसवर जमिनीवर झोपलेल्या वृद्धेला विषारी साप चावला. तिच्या पतीने काठीने सापाला ठार मारले. त्यानंतर प्रथम जवळचे रुग्णालय आणि त्यानंतर नागपुरातील मेडिकल रुग्णालय गाठले.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 3 Nov 2023
अंबरनाथ: वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेला शेतकी सोसायटीचा विरोध

अंबरनाथ: येत्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शिक्षणाचा श्रीगणेशा अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणार असला तरी आता येथील सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटीने महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षित केलेल्या जागेवरच आक्षेप घेतला आहे.

वाचा सविस्तर…

12:54 (IST) 3 Nov 2023
पुणे : स्ट्रक्चरल ऑडिटवर सीओईपीने दाखवले महामेट्रोकडे बोट

पुणे : महामेट्रोने केवळ मेट्रो स्थानकांच्या वरील रचनेचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. त्यानुसार स्थानकांची केवळ वरील रचना तपासून त्याचा अहवाल आम्ही सादर केला, अशी माहिती हे स्ट्रक्चरल ऑडिट करणारे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील प्राध्यापक बी. जी. बिराजदार यांनी गुरुवारी दिली.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 3 Nov 2023
सावधान! येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता

नागपूर: देशातील हवामान गेल्या आठवडाभरापासून मोठा बदल होत आहे. पहाटे आणि रात्री थंडी, तर दिवस ऊन असे वातावरण आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे.

सविस्तर वाचा…

मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून चालू असलेलं उपोषण मागे घेतलं.

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. तरीही मराठा आरक्षणाची लढाई सुरुच राहणार असल्याचं म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. तर सरकारतर्फे हे सांगण्यात येतं आहे की २ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. नेमकी कुठली डेडलाईन आहे याबाबत संभ्रम आहे.