Maharashtra News Today, 03 November 2023: मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. तरीही मराठा आरक्षणाची लढाई सुरुच राहणार असल्याचं म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. तर सरकारतर्फे हे सांगण्यात येतं आहे की २ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. नेमकी कुठली डेडलाईन आहे याबाबत संभ्रम आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली आहे. या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
Latest Marathi News Updates|Maharashtra Breaking News : मराठा आरक्षणासाठी डेडलाईन २४ डिसेंबर की २ जानेवारी? यासह महत्त्वाच्या बातम्या
पुणे : मेट्रोच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर महामेट्रोकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मेट्रोच्या कामांची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी केली आहे.
ठाणे : ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पत्रक काढून ते अंमलबजवाणीसाठी ठाणे पोलिसांना पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तहसीलदार संजय भोसले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : ससून रुग्णालयामधून अमली पदार्थ तस्कर आरोपी ललित पाटील हा पळून गेल्यानंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी ललित पाटील आणि टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार मोक्का कारवाई केली आहे. पण ललित पाटील याला ससून रुग्णालयात अनेक गोष्टींसाठी मदत करणारे ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून मोक्काअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केली.
ठाणे : भिवंडी शहराचा पुढील २० वर्षांचा विचार करून पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारुप विकास आराखड्यातील विविध आरक्षणे बदलण्याची प्रलोभने दाखविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरक्षण बदलाची प्रलोभने दाखविणाऱ्या दलालांचा शहरात सुळसुळाट झाल्याने पालिका प्रशासन हैराण झाले आहे.
रायगड – महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. स्फोटानंतर गॅस गळती झाल्याने कामगारांना त्रास होत असून, काही कामगार अडकल्याची भिती आहे. स्फोटानंतर प्लांटमध्ये आग लागली. अग्नीशमन यंत्रणा, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यवतमाळ: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी करणार्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल ११ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
बुलढाणा: कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याची खरीप हंगामाची दुसऱ्या टप्प्यातील अर्थात सुधारित पैसेवारी संभाव्य दुष्काळ दर्शविणारी आहे. त्यामुळे सध्या दोन तालुके दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित झाली असली तरी अंतिम पैसेवारीत तालुक्यांची संख्या जास्त राहण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्याने कंदिल, दिवे, पणत्या, रांगोळी, रंग, माळा, सजावटीचे साहित्य, किल्ले, चित्र यांनी बाजारपेठ सजली आहे. साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी आहे. यंदा वेगवेगळ्या पारंपरिक कापडांच्या कंदिलांना ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे दिसते आहे. खण, पैठणी, म्हैसूर सिल्क, टंचोई सिल्क, बंगळुरू सिल्क, इरकल या साड्यांपासून तयार करण्यात आलेल्या कंदिलांकडे ग्राहकांचा ओढा आहे.
नाशिक: मतदार यादीत नाव नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने प्रथमच ५३ महाविद्यालयांसमवेत करार केला असून महाविद्यालय व्यवस्थापन आणि निवडणूक यंत्रणा एकत्रितपणे हे काम करणार आहे. या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.
नाशिक: राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींविरोधात आंदोलक आक्रमक झाले असताना नाशिकमध्ये मात्र मराठा समाजातील शेतकऱ्यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेत जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
नागपूर: बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच योजनांमध्ये एकसमानता आणण्याचे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. या चारही संस्थेच्या योजनांमध्ये कायमस्वरुपी एकसमानता आणण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
पुणे : पुणे रास्ता पेठेतील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
चंद्रपूर: झोपण्यासाठी गेलेल्या दिव्यांगी उमरे (१४) या मुलीच्या बोटाला ब्लॅकेटमध्ये असलेल्या भल्या मोठ्या जहाल विषारी मण्यांर सापाने चावा घेतला. गंभीर अवस्थेत मुलीला बेंदले रूग्णालयात दाखल करण्यात आले.
पिंपरी : श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक लाखापासून अडीच लाखांपर्यंत वेतन घेणाऱ्या वर्ग एक, दोनच्या अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम दिवाळी बोनस म्हणून देण्यात आली आहे. वर्ग एक, दोनच्या अधिकाऱ्यांच्या बोनसवर पाच कोटी रुपये खर्च करावे लागले असून दिवाळी बोनसमुळे महापालिकेच्या तिजोरीवर ५५ कोटी रुपयांचा खड्डा पडला आहे.
मुंबई : एकीकडे मुंबईमधील खालावलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. तर या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी, वायू प्रदूषणात भर पडण्याची भिती व्यक्त होत आहे.
कल्याण: कल्याण डोंबिवली शहराच्या १३५ चौरस किलोमीटर हद्दीत कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस ठराविक रस्ते आणि भागात प्रवासी वाहतूक करतात. या बस शहरातील प्रत्येक रस्त्यावर धावतील असे नियोजन करा. अन्यथा, येत्या काही दिवसात पालिकेच्या परिवहन कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा ‘उबाठा’ पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी परिवहन प्रशासनाला दिला आहे.
ठाणे : कोलशेत येथे कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनं मनोज जरांगे-पाटलांना २ जानेवारीपर्यंत मुदत दिली. त्यामुळे जरांगे-पाटलांनी उपोषण मागे घेतलं आहे. मात्र, पेच कायम आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला वेळ हवा आहे. पण, मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे. तरीही मराठा आरक्षणाची लढाई सुरुच राहणार असल्याचं म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. तर सरकारतर्फे हे सांगण्यात येतं आहे की २ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. नेमकी कुठली डेडलाईन आहे याबाबत संभ्रम आहे.