Today’s News Update, 22 December 2023 : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर जरांगे-पाटील ठाम आहेत. २१ डिसेंबरला सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा केली. पण, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. तसेच, ‘जेएन-वन’ हा करोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकारी आणि प्रशासनास सूचना दिल्या आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Today’s Breaking News Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…
जळगाव : शहरात २४ डिसेंबर रोजी होणार्या हिंदू राष्ट्रजागृती सभेनिमित्त पूर्वसंध्येला वाहनफेरी काढण्यात आली. यावेळी हिंदू समाजाने रामराज्य साकार करण्यासाठी संघटित व्हायला हवे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या अहिल्यानगर येथील समन्वयिका प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीतर्फे २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचला शिवतीर्थ मैदानावर धर्मजागृती सभा होणार आहे. प्रमुख वक्ते चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी, सनातनचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छतीसगड राज्य संघटक सुनील घनवट, हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
या पार्श्वभूमिवर वाहन फेरी काढण्यात आली. सुरुवातीला सनातन संस्थेचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, वासुदेव बेहडे यांच्या हस्ते नारळ वाढवून नेहरू चौकापासून वाहन फेरीला प्रारंभ झाला. सद्गुरू जाधव यांच्या हस्ते धर्मध्वजपूजन, तर वासुदेव बेहडे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. वाहन फेरी टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ मैदान, बसस्थानक, काव्यरत्नावली चौक, मू. जे. महाविद्यालय, बहिणाबाई चौक, नूतन मराठा महाविद्यालयामार्गे शिवतीर्थ मैदानावर तिचा समारोप झाला.
फेरीवर कोर्ट चौक, काव्यरत्नावली चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सायली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जळगावलगतच्या खेडेगावांतून तरुण मोठ्या संख्येने फेरीसाठी आले होते.
सोलापूर : वर्षानुर्षांच्या प्रतिक्षेनंतर तेसुद्धा शेतकऱ्यांच्या उपोषणामुळे अखेर उजनी धरणाचे पाणी अक्कलकोट व दक्षिण सोलापूरच्या ७२ गावांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु त्याचे श्रेय घेण्यावरून एकीकडे राजकारण रंगले असताना दुसरीकडे काँग्रेसचे स्थानिक नेते, माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे फलक फाडण्याचे आणि शेण टाकून फलक विद्रुपीकरणाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
गोंदिया: ग्रामपंचायतमध्ये बसलेल्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडली. प्रथम बाचाबाची व त्यातून वाढलेल्या वादातून हाणामारी व त्यानंतर चाकूने हल्ला केला असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.
अमेरिकी भांडवली बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत आघाडीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आलेल्या तेजीने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीवर स्वार होते. सविस्तर वाचा
बुलढाणा: मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेल्या बुलढाणा व लोणार तालुक्यात व एकूण ७३ महसूल मंडळात विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहे.
महसूल गुप्तावार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत अजगर व सापांच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. आरोपीकडून नऊ अजगर, दोन साप जप्त करण्यात आले असून आरोपीविरोधात सीमाशुल्क व वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत झोपडपट्ट्यांमधील शौचालयांची पुनर्बांधणी करण्याच्या कामाला विलंब करणाऱ्या सल्लागारांना पालिका प्रशासनाने प्रत्येकी एक लाख रुपये दंड केला आहे. पश्चिम उपनगरात शौचालयांच्या पुनर्बांधणीच्या कामाला विलंब झाल्यामुळे दोन सल्लागारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
मुंबई : मांसाहारी मराठी माणसांना इमारतींमध्ये घर नाकारणे, विकासकाकडून मराठी माणसांची होणारी अडवणूक, मराठी माणसांची गळचेपी होत असल्याची टीका करीत विलेपार्ले येथील मराठी नागरिकांनी अनोख्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांची आणि मुंबईत मराठी माणसाला ताठ मानेने जगण्यास शिकवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ डिसेंबर २०२४ रोजी क्षमा मागण्याचे पार्ले पंचम या संस्थेने ठरवले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेत आज एमबीए अभ्यासक्रमातील लीगल ॲस्पेक्ट ऑफ ऑफ बिझनेस या विषयाचा पेपर फुटल्याचे उघडकीस आले आहे. एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचे समाजमाध्यमाद्वारे दिसून आले असून, या विषयाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. सविस्तर वाचा
नांदेड सिटीमधील सदनिकाधारकांचा कायदेशीर हक्क महापालिकेने हिरावून घेतला आहे. सदनिकाधारकांना त्यांचा अधिकार परत मिळेल, असे चित्र असताना सवलत योजना पुढे करून त्यांना लालूच दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हे महापालिकेचे षडयंत्र आहे, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. सविस्तर वाचा
सुस्थितीत असलेल्या आणि गेल्या काही वर्षांपूर्वीच पुनर्रचना केलेल्या जंगलीमहाराज रस्त्याच्या दुरुस्तीचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. या रस्त्यावर एक खड्डाही नसताना दुरुस्तीसाठी दोन कोटींचा खर्च केला जाणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सविस्तर वाचा
बुलढाणा: आजचा दिवस सराफा बाजारात खळबळ उडवून देणारा ठरला. परिसरातील एका कुटुंबाने सामूहिक विष प्राशन केल्याच्या अफवेने परिसर हादरला.
नागपूर: लग्नाचा हंगाम सुरू असतांनाच नागपुरात सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. नागपूर सराफा बाजाराच्या दरानुसार नागपुरात शुक्रवारी (२२ डिसेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल ६३ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले.
मुंबई : करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुजीत पाटकर व त्यांच्या भागिदारांच्या १२ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. सुजीत पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निटवर्तीय मानले जातात. टाच आणण्यात आलेल्या मालमत्तेत तीन सदनिका, म्युच्युअल फंड व बँकेची खाती यांचा समावेश आहे.
भाईंदर : मानसिक तणावाखाली असलेल्या एका महिलेने इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मीरा रोड मध्ये घडली आहे. तहूरा अमन खान (३८) असे या मयत महिलेचे नाव आहे.ती मीरा रोडच्या शांती गार्डन येथील म्हाडा गृहसंकुलातील रहिवाशी होती. तहूरा मागील काही वर्षांपासून मानसिक तणावाने आजारी होती. तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जात होते.
दोन दिवसापूर्वीच बेव्हर्ली पार्क येथील मारी गोल्ड इमारती मध्ये ती आपल्या दिराकडे राहण्यास आली होती.२१ डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास तिने अचानक आतल्या खोलीच्या गॅलरी मधून उडी मारली.त्यानंतर कुटुंबीयांनी तिला जवळील रुग्णालयात नेले असता ती मृत पावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्तास्थापन करणार होते. पण, संजय राऊतांनी ही बातमी फोडली आणि शरद पवारांना सांगितली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं ज्या युतीला मतदान केलं, ती होऊ शकली नाही. पुढील काळात होणारी फूटही टळली असती,” अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
नंदुरबार : घोडे व्यापारासाठी देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडे बाजाराला सुरुवात झाली असून दोन हजारांहून अधिक खरेदीदार दाखल झाले आहेत. सारंगखेडा घोडे बाजारानिमित्त आयोजित चेतक फेस्टिव्हलमध्ये घोड्यांच्या विविध स्पर्धा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.
वाशिम: अनेक कुटुंब दारुमुळे उद्ध्वस्त होत आहेत. याची सर्वाधिक झळ घरातील, महिला मुलांना सोसावी लागते. गावागावात राजरोसपने अवैध दारु विक्री होत आहे. याविरोधात महिलांकडून अनेकदा पोलिसांना निवेदने, तक्रारी झाल्या.
उरण : जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारे साडेबारा टक्केचे विकसित भूखंड स्वतंत्र देण्याची मागणी केली असून यासंदर्भात सिडकोकडून चाचपणी सुरू आहे.
नाशिक – बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या तीन दिवसीय अधिवेशनास शनिवारपासून येथे प्रारंभ होत आहे. संस्कृत- भाषा शास्त्र, व्याकरण, अभिजात साहित्य धर्म तत्वज्ञान, प्राचीन- विज्ञान- तंत्रज्ञान, इतिहास-पुरातन आणि उत्तर महाराष्ट्र संस्कृती या विविध विषयांवर यात राज्यातील १०० हून अधिक अभ्यासक शोधनिबंध सादर करणार आहेत. दर दोन वर्षांनी भरणाऱ्या अधिवेशनाचे हे १५ वे वर्ष असून नाशिकमधील हे दुसरे अधिवेशन आहे.
शंकराचार्य न्यास आणि डॉ. मुंजे व्यवस्थापनशास्त्र संस्था यांच्यावतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. नर्मदेच्या समाज व शिक्षण जीवनात मोलाची भर टाकणाऱ्या प्रवाजिका विशुद्धानंदा (भारतीताई ठाकूर) आणि साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष लेखक डॉ. सदानंद मोरे यावेळी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते शब्दमल्हार प्रकाशनाचे ‘शंकराचार्य महाभागवत डॉ. कुर्तकोटी’ चरित्राची दुसरी आवृत्ती आणि रामकृष्ण मठ नागपूरच्या जीवन-विकास मासिकात १९५८ ते १९६२ काळात कुर्तकोटींच्या प्रसिद्ध झालेल्या विविध लेखांचे लक्ष्मीकांत जोशी यांनी निवड व संपादित केलेल्या ‘तत्त्वबोध’ पुस्तकाचे प्रकाशन होईल.
शनिवारी सकाळी १०.०० ते ११.३० या वेळेत गंगापूर रस्त्यावरील डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या या कार्यक्रमास नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष डॉ. गणेश थिटे, सचिव डॉ. श्रीनंद बापट, न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी केले आहे.
सिडको महामंडळाच्या अनधिकृत बांधकामे नियंत्रण विभागाने पनवेल येथील मोहा गावातील चार मजली इमारत जमीनदोस्त केली आहे. ही इमारत मोहा गावच्या सर्व्हे क्रमांक ३५ मध्ये सिडको मंडळाची परवानगी न घेता उभारली होती. नुकतीच ही कारवाई सिडको मंडळाने केली.
भंडारा: राज्यात महिला अत्याचाराच्या आणि गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता भंडारा जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या आई वडिलांनीच पैशांसाठी असं काही केलं की वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
गोंदिया: ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण असलेला ख्रिसमस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. ख्रिसमसनिमित्त गोंदिया शहरातील मेथोडीस चर्च, मार्टिन चर्च, ख्रिस्तानंद चर्च, निर्मल शाळा अशा विविध चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली रेल्वेस्थानकासमोरील पुलावर ठाण्याकडून बेलापूरच्या दिशेने असलेली मार्गिका काँक्रीटीकरणासाठी पूर्ण बंद झाली आहे. परिणामी घणसोली स्थानकाजवळील बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दिवसरात्र वाहतूक कोंडी होत आहे.
“जाणूनबुजून मराठ्यांना वाकड्या वाटेस जाऊ देऊ नका. आणखी संधी तुमच्या हातातून गेली नाही. विनाकारण नोटीसा बजावण्यात आल्यामुळे मराठा समाज जास्तच जावं, असं म्हणत आहे. समजा मुंबईला जायचं ठरलं तर अडचण काय आहे? आम्ही मुंबई पाहिली तर काय अडचण आहे? मंत्री कुठल्या घरात राहतो, हे पाहायचं आहे. मुंबईला जायचं ठरलं नाही, तरीही नोटीसा बजावण्यात येत आहेत. मराठ्यांच्या मुलांना त्रास झाला, तर सगळेजण पाठीशी उभे राहणार. जर मुलांना अटक केली, तर सगळेजण पोलीस ठाण्यात जाऊन बसा. करायची तर सगळ्यांना अटक करा. आमची तयारी आहे,” असं आव्हान जरांगे-पाटलांनी सरकारला दिलं आहे.
ससून रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडले. सविस्तर वाचा…
मटणाची उधारी न देता फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर भागातील एका नामांकित हॉटेल मालकाविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकाने ६१ लाखांची उधारी न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमसारखी लक्षणे आणि गंभीर श्वसनविषयक परिस्थितीवर सात वर्षांच्या मुलाने मात केली आहे. करोना संसर्गानंतर मल्टिसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम ही दुर्मिळ गुंतागुंत त्याच्या शरीरात निर्माण झाली होती. आता त्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे. सविस्तर वाचा…
मागील काही काळापासून ‘कॅशलेस’ आरोग्य विमा सुविधा देणाऱ्या शहरातील रुग्णालयांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे ही सुविधा मिळण्याचा रुग्णांचा हक्क डावलला जात आहे. याप्रकरणी आरोग्य विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि मनमानी कारभाराकडे रुग्णालये बोट दाखवत आहेत. सविस्तर वाचा…