Today’s News Update, 22 December 2023 : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर जरांगे-पाटील ठाम आहेत. २१ डिसेंबरला सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा केली. पण, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. तसेच, ‘जेएन-वन’ हा करोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकारी आणि प्रशासनास सूचना दिल्या आहेत. यासह विविध घडामोडी जाणून घेणार आहोत…
Today’s Breaking News Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…
शहरातील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागात टँकर लॉबीसाठी महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यास भाग पाडले जात असल्याचा तक्रारी येत आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना बाराही महिने खासगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सविस्तर वाचा…
पुणे रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा बलात्कार प्रकरणातील सहभाग, वाहनतळाची समस्या आणि रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सदस्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, अशी माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर वाचा…
राज्यातील महामार्गांवर तसेच समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने नवीन १७ ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे समृद्ध महामार्गावर ७१ रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. तर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर २१ रुग्णवाहिका तैनात केल्या जाणार आहेत. सविस्तर वाचा…
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा उमेदवारांना आर्थिक मागास वर्गात समाविष्ट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवला. तसेच, आर्थिक मार्गास वर्गातील आरक्षित जागांवर समाविष्ट करण्यात आलेल्या सरकारच्या १११ स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठवली.
सायन कोळीवाडा येथील गुरु तेगबहादूर नगरातील पंजाबी कॅम्प या एकेकाळच्या निर्वासितांच्या वसाहतीचा कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ने (म्हाडा) शासनाकडे पाठविला आहे.
ओमिक्रॉनचा नवा उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चा रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या नव्या उपप्रकाराचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सविस्तर वाचा…
मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. परिणामी, मुंबईकरांना थंडीची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सविस्तर वाचा…
नाशिक : नाशिक पंचायत समितीच्या वतीने शबरी घरकुल योजनेतंर्गत १३४ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासंदर्भात एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आदिवासी आयुक्त कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला होता.
नाशिक : मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतंर्गत जिल्ह्यात ६६ उपकेंद्रांच्या माध्यमातून ४६१ मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या उपकेंद्रांसाठी जागेची निकड महसूल विभागाने पूर्ण केली आहे. जवळपास अडीच हजार एकर जागा महावितरणला देण्यात आली असून ३८ केंद्रांसाठी ७३८ एकर जागेच्या हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
नवी मुंबई : ग्रंथाली प्रकाशन संस्थेचा ४९ वा वाचकदिन सोहळा सोमवार, २५ डिसेंबर रोजी वाशी येथे होणार आहे. यंदाच्या वाचकदिन कार्यक्रमालाअ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची प्रमुख उपस्थिती असेल. अभिनेत्री मधुराणी गोखले, लेखक शरद काळे, सुधीर-नंदिनी थत्ते असे मान्यवर लेखक-कवी उपस्थित असतील. अनेक पुस्तकांचे प्रकाशनही दिवसभराच्या कार्यक्रमांत केले जाणार आहे.
नागपूर : बाजारगावजवळील चाकडोहमध्ये असलेल्या सोलर एक्सप्लोसीव्ह कंपनीत आरडीएक्सच्या स्फोटात ९ कामगारांच्या मृतदेहांचे चिंधड्या झाल्या होत्या. सर्वच मृतदेहांची ओळख पटल्यामुळे अखेर मासांच्या तुकड्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी नागपुरातील मोक्षधाम घाटावरच नातेवाईकांच्या संमतीने अंत्यविधी पार पडला.
“जरांगे-पाटलांनी नाहीतर सरकारनेच जरांगे-पाटलांना वेठीस धरलं आहे. देवही जरांगे-पाटलांना घाबरतात,” असा टोला मंत्री छगन भुजबळांनी लगावला आहे.
सांगली महापालिका क्षेत्रातील विश्रामबाग परिसरित एका दांपत्याला करोना संसर्ग झाल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
गडचिरोली: २२ डिसेंबर रोजी नक्षलवाद्यांनी भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री नक्षल्यांनी दक्षिण गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात झाड तोडून रस्त्यावर टाकले तर पोस्टर लावून जनआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
नागपूर: राज्य सरकार सतत सरकारी रुग्णालयांना खूप निधी दिल्याचे सांगते. मात्र, गेल्या तीन वर्षांची नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची (मेयो) स्थिती बघता येथे प्रत्येक वर्षी रुग्ण वाढले.
कल्याण : येथील आधारवाडी भागात राहत असलेल्या एका वकील महिलेच्या अल्पवयीन शाळकरी मुलाचे बुधवारी सकाळी अज्ञात इसमांनी अपहरण केले. कल्याण परिसरात शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात या अपहरण प्रकरणी तक्रार केली आहे.
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील चुंचाळे भागात घरफोड्या करणाऱ्या संशयिताला मंचर येथून ताब्यात घेत पोलिसांनी सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अजून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नाशिक – भाजपचे ज्येष्ठ नेते, धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं देशात हालचालींना वेग आला आहे. अशातच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी लोकसभेच्या २५ जागांवर दावा सांगितला आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना डिवचत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होईल. तसेच, आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहोत, असं संजय राऊतांनी सांगितलं.
“शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं नसतं. कारण, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय श्रेय घेण्याचा सोहळा बनला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान फार मोठं आहे. उद्धव ठाकरे अयोध्येत गेले, तर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार होईल. त्यामुळे ज्यांचं योगदान आहे, त्यांना सन्मानाने कधीच बोलावणार नाहीत. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत. ते एका राजकीय पक्षाचे किंवा नेत्याची मालमत्ता नाही. राजकीय सोहळा झाल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन धार्मिक सोहळा करू,” असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केला.