Maharashtra News Today, 27 October 2023 : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे-पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे. तर, “कृषिमंत्री असताना काय केले?” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह विविध बातम्या जाणून घेणार आहोत….

Live Updates

Mumbai News in Marathi : राजकीय, क्राइम आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोड, एका क्लिकवर....

18:15 (IST) 27 Oct 2023
"आमच्याकडे येणाऱ्यांच्या ‘वेटिंग लिस्ट’मध्ये जयंत पाटीलही";अजित पवार गटातील नेत्याचं मोठं विधान

राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठा गौप्यस्फोट केला. जयंत पाटील हे आमच्याबरोबर येण्यासाठी वेटिंगमध्ये आहेत. अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्यासोबत आजघडीला एकूण ४५ आमदार आहेत. येत्या काळात ५३ आमदार होतील हे नक्की, असाही दावा आत्राम यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाणे नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी केला.

वाचा सविस्तर...

17:10 (IST) 27 Oct 2023
नाशिक : सरकारच्या निषेधार्थ येवल्यात मराठा आंदोलकांचे मुंडण

नाशिक – मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्याने त्यांना पाठिंब्यासाठी राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत असताना सरकार आरक्षणाविषयी निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ येवला तहसील कार्यालयासमोर मराठा उपोषणकर्त्यांनी मुंडण केले.

सविस्तर वाचा...

16:45 (IST) 27 Oct 2023
पिंपरीत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. अंबादास दानवे येण्यापूर्वीच काही महिला आणि व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दानवे यांचा वाहनांचा ताफा येताच नागरिकांच्या घोळक्यात असलेले सखल मराठा मोर्चातील कार्यकर्ते समोर आले आणि काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ गोंधळ उडाला, पोलिसांची धावपळ झाल्याचं बघायला मिळालं, त्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.

15:58 (IST) 27 Oct 2023
पिंपरीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना विरोध; सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पिंपरी- चिंचवड शहरात कुठल्याही नेत्याला सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, त्यांना फिरकू देणार नाही असा इशारा सकल मराठा बांधवांकडून देण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 27 Oct 2023
पुणे : कृषी आयुक्तालयाच्या नवीन इमारतीसाठी २२५ वृक्षांवर हातोडा

२२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाला देण्यात आला आहे. मात्र, वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे.

सविस्तर वाचा...

15:56 (IST) 27 Oct 2023
अन्न पदार्थात भेसळ, विशेष मोहिमेत ‘या’ बाबींची तपासणी

नागपूर: सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

सविस्तर वाचा...

15:45 (IST) 27 Oct 2023
बुलढाणा: नादुरूस्त बस घेऊन जाणाऱ्या एसटीला मालवाहूची धडक; चालक ठार

बुलढाणा: खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा परिसरात घडलेल्या विचित्र अपघातात एक चालक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. राहुड फाट्याजवळ आज शुक्रवारी (दि २७) ही दुर्घटना घडली.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 27 Oct 2023
"ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो, कारण..."; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या...

पुणे-नाशिकसह राज्यभर ड्रग्ज तस्करी केल्याचा आरोपी ललित पाटीलचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच सध्या कशावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही, असंही सुषमा अंधारे यांनी नमूद केलं. यावेळी सुषमा अंधारे यांनी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावरही गंभीर आरोप केले.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 27 Oct 2023
मनोज जरांगेंच्या उपोषणावर शरद पवार स्पष्टच म्हणाले, "जे करणं शक्य नाही त्याचा शब्द..."

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा वेळ संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केलं. "जे करणं शक्य नाही त्याचा शब्द कधी देऊ नये," असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसेच सध्याच्या परिस्थितीला उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असंही नमूद केलं.

सविस्तर वाचा...

15:37 (IST) 27 Oct 2023
"...एका घटनेमुळे जयंत पाटलांनी आमच्याबरोबर शपथ घेतली नाही"; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाली आणि पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज व ज्येष्ठ नेते अजित पवारांबरोबर गेले. मात्र, अशा परिस्थितीतही जयंता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंत केलं. असं असलं तरी काही दिवसांपासून जयंत पाटीलही अजित पवार गटाबरोबर जाण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. ते शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

15:36 (IST) 27 Oct 2023
मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची चाहूल

गेले अनेक दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरांत ऑक्टोबरमधील उकाड्याचा प्रभाव दिसून आला. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणारी काहिलीमुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, आता मुंबईतील किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे वातावरणात गारवा जाणवू लागला. मुंबईशिवाय पुणे, कल्याण, ठाणे या पट्ट्यातही दोन दिवसांपासून तापमान खाली आलं आहे. राज्यातील इतर भागातही थंडीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे.

सविस्तर वाचा...

15:27 (IST) 27 Oct 2023
डी.जे.च्या आवाजाने मधमाशा उडाल्या; दोन किलोमिटरपर्यंत केला लोकांचा पाठलाग

नागपूर: डी.जे.च्या भयंकर आवाजाने हृदयरोगाचा झटका आल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, हिंगणा तालुक्यातील मौजा मोंढा पांजरी येथील दुर्गादेवी विसर्जन सुरू असताना एक अनोखी घटना घडली. विसर्जनासाठी डी.जे.ची व्यवस्था करण्यात आली होती.

सविस्तर वाचा...

15:21 (IST) 27 Oct 2023
मराठा क्रांती मोर्चाने सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळला

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने केली आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 27 Oct 2023
आम्हालाही मुंबई महानगरपालिका मुख्यालयात कार्यालय द्या, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना कार्यालये देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेते म्हणून आम्हालाही कार्यालय द्यावे या मागणीचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुनरुच्चार केला आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पालकमंत्र्यांचे कार्यालय म्हणजे भाजपाचा अड्डा बनल्याची टीकाही त्यांनी केली.

सविस्तर वाचा...

15:10 (IST) 27 Oct 2023
नागपूर पोलीस धावले, निरोगी राहण्याच्या संदेश देण्यासाठी नाचले…

नागपूर: सरदार वल्लभभाई पटेल, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी, हैदराबाद संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात एकाचवेळी झालेल्या कार्यक्रमात नागपूर पोलीस आणि इतरही सुरक्षा यंत्रणा सहभागी झाल्या.

सविस्तर वाचा...

15:02 (IST) 27 Oct 2023
कुख्यात सोंटू जैनच्या गोंदियातील घर, दुकान, हॉटेलची घेतली झाडाझडती

गोंदिया: ‘ऑनलाइन गेमिंग’ फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागपूर गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पथक अनंत उर्फ ​​सौंटू जैन याच्यासह आरोपीच्या काका चौक, सिव्हिल लाइन्स गोंदिया येथील घरी गुरूवार २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता शारीरिक पडताळणीसाठी पोहोचले, येथे ५८ कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात घराची झडती घेण्यात आली.

वाचा सविस्तर....

15:01 (IST) 27 Oct 2023
कसबा पेठेत मेट्रो कामगारांना मारहाण करुन रोकड लुटली

पुणे : कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांना धमकावून त्यांच्याकडील २० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर...

14:55 (IST) 27 Oct 2023
पूर्व विदर्भातील संपकर्त्यांची संख्या वाढली; रुग्णांचा जीव टांगणीला

नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाला रोज प्रतिसाद वाढत आहे. शुक्रवारी (२७ ऑक्टोंबर) तिसऱ्या दिवशी संपकर्त्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या गैरसोयी वाढण्याचे संकेत मिळत आहे.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 27 Oct 2023
ठाणे: ‘धर्मवीर’मधील बाल कलाकाराचे वाहतुक कोंडीसंदर्भात प्रशासनाला पत्र

ठाणे : ‘धर्मवीर’ चित्रपटात खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणारा अथर्व जयेश वगळ या १४ वर्षीय बाल कलाकाराने शहरात होणाऱ्या वाहतुक कोंडीला कंटाळून ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे वाहतुक शाखेला पत्र लिहून कोंडी सोडविण्यासाठी नियोजन करण्याची विनंती केली आहे.

वाचा सविस्तर...

14:19 (IST) 27 Oct 2023
नवी मुंबईतील प्रदूषणाला राजकीय आश्रय? नागरिकांच्या तक्रारींकडे यंत्रणांचे दुर्लक्षच

नवी मुंबई : प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या नवी मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांकडे महापालिका, पोलीस तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्या्चे चित्र असून दोन दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने वाशीतील दोन विकासकांवर केलेली दंडात्मक कारवाई म्हणजे यंत्रणांना उशिरा सुचलेले शहाणपण असल्याच्या प्रतिक्रिया रहिवाशांमधून व्यक्त होत आहेत.

सविस्तर वाचा...

14:04 (IST) 27 Oct 2023
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जव्हार बाजारपेठेत मारली फेरी

कासा: भारतीय जनता पार्टीच्या महावीजय २०२४ संकल्प दौऱ्याच्या पालघर लोकसभा दौऱ्याला पालघरमधील जव्हार येथून आज सुरुवात झाली असून चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी जव्हारवासियांशी संवाद साधून या प्रत्यक्ष दौऱ्याला सुरुवात केली. भाजी विक्रेते फळ विक्रेते दुकानदार यांची भेट घेतली. तसेच तारपा नृत्यवर ठेका धरला.

२०२४ च्या आगामी निवडणुकीसाठी २८ पक्ष एकत्र आलेले आहेत. राज्यातल्या सर्वच नेत्यांची उद्धव ठाकरे यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र बिर्याणीचे बिल देखील दिले नसल्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले. सर्व पक्ष एकत्र आले तरीही ते मोदींना हरवू शकणार नाही असे देखील त्यांनी सांगितले.

14:01 (IST) 27 Oct 2023
वसई विरारच्या पाण्यासाठी आयुष्यातली पहिली केस घेण्यासाठी तयार, शर्मिला ठाकरे यांनी सरकारला ठणकावले

वसई विरार महापालिकेवर पाण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात त्यांनी सरकारला हा इशारा दिला.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 27 Oct 2023
पुणे : दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खाजगी प्रवासी बसचे भाडे दुप्पट; संघटनेचे आरटीओकडे बोट

पुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून मूळ गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची संख्या मोठी असते. यामुळे या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खाजगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन खाजगी प्रवासी बसमालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

13:49 (IST) 27 Oct 2023
भाजपने आरक्षणाच्या प्रश्नाला हात न लावता राज्य व देश लूटला; नाना पटोले आक्रमक

अकोला: भाजपने आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवली. मराठा समाजासह अनेकांना त्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात पाळले नाही. केंद्रात व राज्यात सत्ता असतांना आरक्षणाच्या मुद्द्याला हात न लावता राज्य व देश लूटला.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 27 Oct 2023
संकेतस्थळावर स्वस्त घराचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; दोन ठकसेनांना आचोळे पोलिसांकडून अटक

अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना विक्री करायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 27 Oct 2023
ठाणे पालिकेचे हक्काचे कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित, १४ वर्षांनंतर डायघर कचरा प्रकल्प सुरू; भंडार्ली कचरा प्रकल्प पालिकेकडून बंद

येत्या काही महिन्यांत येथे कचऱ्यापासून बायो गॅस आणि वीज निर्मितीचे काम सुरू होणार आहे.

सविस्तर वाचा...

13:28 (IST) 27 Oct 2023
धर्मप्रसारकांविरोधात गुन्हे दाखल, हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप

भाईंदरच्या जेसल पार्क येथील एंजल सोसायटीत राहणार्‍या मनोजकुमार मिश्रा (४४) यांच्या घरी गुरूवारी डेव्हीड रेड्डी आणि सीरज राजवंशी हे दोघेजण आले होते.

सविस्तर वाचा...

13:19 (IST) 27 Oct 2023
नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार बंद, १०० कोटींचे व्यवहार ठप्प

नवी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार संघटनेने बंद पुकारला होता. त्यामुळे आज दिवसभर एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात आला. यात कांदा बटाटा, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळला गेला असून भाजी आणि फळ बाजार समिती मात्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या दोन्ही बाजारांचे व्यवहार नियमित प्रमाणे सुरू होते.

सविस्तर वाचा...

13:19 (IST) 27 Oct 2023
पुणे: व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपये खंडणीची मागणी; तीन तरुण गजाआड

पुणे: इंटरनेट पुरवठादार व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात ही कारवाई करण्यात आली.

सविस्तर वाचा....

13:02 (IST) 27 Oct 2023
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ जलवाहिनी फुटली; डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम, हजारो लीटर पाणी वाया

जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी बाहेर फेकले गेले. यामुळे कल्याण न्यायालय, तहसीलदार कार्यालय परिसर जलमय झाला.

सविस्तर वाचा...

pm narendra modi assures to complete 26 irrigation projects in maharashtra

केंद्र सरकारने योजनांची अंमलबजावणी करताना गरिबांच्या कल्याणाला प्राधान्यक्रम दिला आहे. योजनांची यशस्वी अंमलबजावणी हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राज्यातील २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही देतानाच केंद्र सरकारने विकासाच्या बाबतीत शेतकरी हा प्राधान्यक्रम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.