Today’s News Update, 26 December 2023: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांनी दिलेली २४ डिसेंबरची मुदत संपली असून आता मुंबईत मोठं आंदोलन करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पुढची नेमकी राजकीय दिशा काय असेल? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Live Updates

Marathi News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!

18:13 (IST) 26 Dec 2023
निरोगी आरोग्य अभियानाअंतर्गत दोन कोटी पुरुषांची तपासणी!

मुंबई: आरोग्य विभागाच्या `निरोगी आरोग्य तरुणाईʼचे अभियानांतर्गत आतापर्यंत १८ वर्षांवरील दोन कोटींहून अधिक पुरुषांची सर्वांगीण आरोग्य तपासणी पार पडली आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे‘ अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत २३ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ वर्षांवरील दोन कोटी पाच लाख ४२ हजार १६१ पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी एक कोटी ९५ लाख ६९ हजार ८०९ लोकांच्या आवश्यक त्या चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या आहेत. ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार असून, त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

त्याचप्रमाणे, गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर ॲपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या, या माहितीची नोंद त्या ठिकाणी केली जाते.

18:04 (IST) 26 Dec 2023
सांगली : अपहरण करुन परप्रांतीय कामगारास खंडणीसाठी मारहाण

परप्रांतीय कामगाराचे अपहरण करून खंडणीसाठी मारहाण करीत ओलीस ठेवण्याचा प्रकार मिरजेत घडल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातून मंगळवारी मिळाली.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 26 Dec 2023
सांगली : औदुंबरसह जिल्ह्यात दत्तजयंती उत्साहात साजरी

‘दिगंबरा दिगबंरा श्रीपाद वल्लभ दिगबंरा’च्या गजरामध्ये श्री क्षेत्र औदुबंर येथे सायंकाळी ५.३० वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला.

सविस्तर वाचा...

17:50 (IST) 26 Dec 2023
शिरुरमध्ये कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील यांच्यात लढत? माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवारांसोबत?

पिंपरी: शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचा पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविताच काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्यावर टीका करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 26 Dec 2023
केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिवजयंतीची ऐच्छिक सुटी मंजूर – उदयनराजे भोसले

महाराष्ट्राबाहेर कार्यरत असलेल्या मराठी कर्मचाऱ्यांना शिवजयंती साजरी करता यावी म्हणून या यादीत शिवजयंतीच्या सुटीचा समावेश करावा, अशी मराठी जनतेची मागणी होती.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 26 Dec 2023
रायगड : अवैध रेती उत्खनन करण्यास विरोध केला म्हणून डोक्यातच फावडा घातला…

या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सविस्तर वाचा...

17:09 (IST) 26 Dec 2023
शेगाव: श्री संत नगरीमध्ये 'दिगंबरा दिगंबरा'चा घोष

बुलढाणा : शेगावच्या गजानन महाराज संस्थान परिसरात आज 'गण गण गणात बोते'च्या  बरोबरीने 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चा जयघोष गुंजला! आज संस्थान व परिसरांमध्ये श्री दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमामुळे उत्साहन  साजरी करण्यात आली.

सविस्तर वाचा

16:48 (IST) 26 Dec 2023
पिंपरी- चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा, दोन तरुणींची सुटका

त्या ठिकाणी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळाली.

सविस्तर वाचा...

16:45 (IST) 26 Dec 2023
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उपायुक्‍त कार्यालयावर मोर्चा

अमरावती : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, अंगणवाडी सेविकांना शासकीय तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्‍या (सीटू) वतीने मंगळवारी महिला व बालकल्‍याण विभागाच्‍या उपायुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला.

सविस्तर वाचा

16:44 (IST) 26 Dec 2023
वऱ्हाडी साक्षगंधास निघाले अन् वाटेत काळाने गाठले! भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, पाच जखमी

गोंदिया : तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे टवेरा वाहनाला अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व के. टी. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

16:31 (IST) 26 Dec 2023
Maharashtra News Live Today: नांदेडमध्ये ट्रेनच्या बोगीला आग!

नांदेड मेंटेनन्स यार्डमध्ये रिकाम्या बोगीला आग, अर्ध्या तासात आग नियंत्रणात आल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती

https://twitter.com/ANI/status/1739577831624245403

16:26 (IST) 26 Dec 2023
Maharashtra Live News: सचिन अहिर यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

बाबरी मशिदबाबत पळपुट्याची भूमिका घेणारे जणू प्रभू श्रीरामांनीच साक्षात्कार दिल्यानं हे राम मंदिर बांधत असल्याचं भासवत आहेत. प्रत्यक्षात कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे हे बांधकाम सुरु झालेलं आहे. - सचिन अहिर, आमदार

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1739566518827196779

16:23 (IST) 26 Dec 2023
वृद्ध महिलेचे हात-पाय बांधून मौल्यवान वस्तूंची लूट

मुंबई: घरात एकट्याच असलेल्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्याने तिचे हात-पाय बांधून घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची घटना भांडुप परिसरात घडली आहे.

सविस्तर वाचा...

15:54 (IST) 26 Dec 2023
सानपाडा भुयारी मार्गाचे काम पुढे ढकलले

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानक मधील भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम दत्त जयंती मुळे पुढे ढकलण्यात आले आहे. सानपाडा येथे जागृत दत्त मंदिर असल्याने भक्तांच्या सोयीसाठी हे काम पुढे ढकलण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 26 Dec 2023
चारित्र्याच्या संशयावरून बहिणीशी झाला वाद, भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून

सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात.

सविस्तर वाचा...

15:14 (IST) 26 Dec 2023
धवनकर प्रकरणातील तक्रार मागे घेणाऱ्यांकडून वेतनाचे पैसे वसूल करावे, मध्यस्थी करणाऱ्यांबाबत विद्यापीठात चर्चा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांची आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरोधात सुरू असलेला विभागीय चौकशी समितीचा तपास अंतिम टप्प्यात असताना सातपैकी चार तक्रारकर्त्यांनी माघार घेतली.

सविस्तर वाचा

15:11 (IST) 26 Dec 2023
कचऱ्याची पिशवी रस्त्यावर टाकणाऱ्या दुकानदाराला दंड; दादरमध्ये पालिकेची स्वच्छतेसाठी अनोखी शोधमोहीम

मुंबई: दुकानतला कचरा पिशवीत भरून रस्त्यावर टाकून दिल्यामुळे दादरमधील न चिं केळकर मार्गावरील एका दुकानदाराला पालिकेच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 26 Dec 2023
'जग्गू डॉन'ने शेतकऱ्यांना फसवून खरेदी केली कोट्यवधीची मालमत्ता; फ्लॅट, दुकान, शेतीची खरेदी अन्...

बुलढाणा:शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करून जमवलेल्या गडगंज रक्कमेतून आरोपी जगन नारखेडे उर्फ जग्गू डॉन याने  तब्बल ५.७६ कोटींची मालमत्ता खरेदी केली. मलकापूर शहर पोलिसांच्या आजवरच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

सविस्तर वाचा

14:43 (IST) 26 Dec 2023
१७८ किलो गांजा केला जप्त, तरी न्यायालयाने केली पाच आरोपींची निर्दोष सुटका; वाचा काय आहे प्रकरण...

नागपूरः १८७ किलो गांजाची ट्रकमधून तस्करी करण्याच्या प्रकरणातील पाचही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. राष्ट्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाद्वारा (डीआरआय) ही कारवाई करण्यात आली होती, हे विशेष.

सविस्तर वाचा

14:42 (IST) 26 Dec 2023
नागपूर: गर्भवती महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, परिसरात मात्र घातपाताची चर्चा...

नागपूर : कन्हानमध्ये सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. सुमन करमचंद्र मौर्य (३६) असे आत्महत्या करणाऱ्या गर्भवती महिलेचे नाव आहे. परंतु, सुमनची आत्महत्या नसून काहीतरी घातपात घडवून आणल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

सविस्तर वाचा

14:27 (IST) 26 Dec 2023
शहरबात : समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार…

अडचणींत घट होण्याऐवजी त्यामध्ये दिवसागणिक भर पडत असल्याने एक प्रकारे मच्छीमारांची समस्यांच्या जाळ्यात तडफड होऊ लागली आहे, असेच चित्र सद्य:स्थितीत दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 26 Dec 2023
Maharashtra News Live : राहुल गांधी हे भाजपासाठी वरदान!

राहुल गांधी हे भाजपासाठी वरदान! - देवेंद्र फडणवीसांचा टोला!

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1739531186953994356

14:07 (IST) 26 Dec 2023
सोनू निगम, नेहा कक्करच्या सुरांनी बदलापुरकर थिरकले, दोन्ही संगीत कार्यक्रम हाऊसफुल्ल, रसिकांची मात्र तारांबळ

वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेतील कार्मेल शाळेशेजारी तालुका क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपासून आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा...

13:59 (IST) 26 Dec 2023
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या डोक्याला कॅमेरा लागताच…

गाडीमधून उतरताच आमदार चेतन तुपे आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत चर्चा करीत प्रकल्पाच्या ठिकाणी अजित पवार हे जात होते.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 26 Dec 2023
अखेर इंद्रायणी नदीतील प्रदूषणाची सरकारकडून दखल, सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यास कारवाईचे आदेश

पुणे: इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. इंद्रायणी सांस्कृतिक महत्व लक्षात घेता नदीत जाणारे दूषित, प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखावे आणि सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सविस्तर वाचा...

13:31 (IST) 26 Dec 2023
उपचाराअभावी मृत्यू… तेही मुंबईत; वरळीकरांनी उपचारासाठी जायचे कुठे?

मुंबई: रुग्णालयात पोहोचता आले नाही म्हणून मृत्यू, रुग्णालयाची शोधाशोध … ही कोणत्याही अडगावातील नाही, तर मुंबईतील स्थिती आहे. वरळी व आसपासच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय महत्त्वाचे समजले जाते.

सविस्तर वाचा...

13:25 (IST) 26 Dec 2023
कल्याण पूर्वेत दहशत पसरविणाऱ्या रूपेश कनोजियाला तडीपार करण्याच्या हालचाली, पोलिसांकडून अर्धनग्न अवस्थेत धिंड

नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी त्याची सोमवारी कल्याण पूर्व भागात रस्त्यावरून धिंड काढली.

सविस्तर वाचा...

13:13 (IST) 26 Dec 2023
राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर, मुंबईची बाजी; महिला गटात नागपूर, तर पुरूष गटात मुंबई विजयी

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर अंतिम सामन्यासाठी क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 26 Dec 2023
शंभराव्या नाट्यसंमेलनाचा शुक्रवारी नाट्यपंढरी सांगलीत मुहुर्त

नाट्यपंढरी सांगलीत शुक्रवारी मुहुर्तमेढ विधीने शंभराव्या नाट्यसंमेलनाचा प्रारंभ होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

12:47 (IST) 26 Dec 2023
CBSC Exam 2024: सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना

वर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार. १ जानेवारी २०२४ पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. दहावीच्या मुख्य परीक्षा १९ फेब्रुवारी १३ मार्च दरम्यान तर बारावीच्या १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२४ दरम्यान घेतल्या जातील.

सविस्तर वाचा

Deputy CM of maharashtra

मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुरघोड्याच अधिक ! (संग्रहित छायाचित्र)

Marathi News Updates: मराठा आरक्षण व राजकीय समीकरांच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या!

Story img Loader