Today’s News Update, 26 December 2023: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांनी दिलेली २४ डिसेंबरची मुदत संपली असून आता मुंबईत मोठं आंदोलन करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पुढची नेमकी राजकीय दिशा काय असेल? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
Marathi News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
उसने १०० रुपये दिले नाही म्हणून एका तरूणावर चाकूने वार करण्यात आल्याचा प्रकार डायघर भागात उघडकीस आला आहे.
पुणे: कौटुंबिक वादातून एकाने पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना येरवड्यातील लूप रोड परिसरात सोमवारी घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्याने जाणार होता.
पुणे: येरवड्यात मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवली. टोळक्याने ३० ते ३५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. येरवड्यातील लक्ष्मी नगर भागात मध्यरात्री टोळके आले. त्यांच्याकडे कोयते होते.
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधकांना अधिछात्रवृत्तीतून अर्थसहाय्य केले जाते. या क्रमात आता महाज्योतीच्या संचालक मंडळाने पीएच.डी. संशोधकांच्या अर्थसहाय्य योजनेत वाढ केली आहे.
गडचिरोली : काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस घातला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळ काढावा लागला. हल्ल्यात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नागपूर : शासनाने जून-२०२२ मध्ये विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांना विदेशी मद्य दुकान लिहिण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु राज्यातील ८० टक्के दुकानांवर अद्यापही वाईन शाॅपच नमूद आहे. त्यामुळे विविध फळांपासून तयार वाईनकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होत असल्याचा आरोप नागपूरसह इतर ठिकाणच्या वाईन क्लबकडून करण्यात आला आहे.
नागपूर : न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना रविवारीही १०२ डिग्री ताप आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर एन्जिओग्राफी करता येईल का, याबाबतची शक्यता उद्या तपासली जाणार आहे.
“दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती, मात्र तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही आणि तत्वांशी महाराजांनी तडजोड केली नाही”, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
अमरावती : शेतीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने जन्मदात्री आई आणि भावाला जबर मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामा या गावात उघडकीस आली आहे.संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्यातील व्यक्तीवर जीवघेणा हल्ल करण्यापर्यंत मजल जात आहे, हे रामा येथे घडलेल्या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
वाशीम : जिल्ह्यात सध्या वाळूला मोठी मागणी आहे. मात्र, वाळू घाटाची संख्या अत्यंत कमी असल्याने व लिलाव न झाल्यामुळे वाळू माफियाचे चांगलेच फावले आहे. दररोज रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक होत असून वाळूचे दर गगणाला भिडले आहे.
वर्धा : २८ डिसेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय संमेलन नागपूरला होत आहे. हम तय्यार है, या नावाने होत असलेल्या या संमेलनाच्या तयारीसाठी राष्ट्रीय सचिवांना नेमण्यात आले आहे. लगतच्या जिल्ह्यातून अधिकाधिक लोक यावेत म्हणून पूर्वतयारीसाठी आढावा बैठका घेतल्या जात आहे.
नवी मुंबई : वाशी येथे तिसऱ्या खाडी पुलाच्या निर्मितीच्या अखेरच्या टप्प्यात कोणतीही आर्थिक अडचण उभी राहू नये यासाठी रस्ते विकास महामंडळाने पैशांची वेगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ठेकेदारास ३५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पुढे करावी लागणार आहे.
अमरावती: मध्य रेल्वेवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकातून, रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना अडचणीचे होते. अनेक वेळा तक्रार करूनही फेरीवाले आपले बस्तान हटवत नाहीत.
पिंपरी: श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे.
मुंबई: मागील काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. त्यानंतर मुंबईकरांना गुलाबी थंडीची अपेक्षा होती. मात्र, मुंबईत २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वाहतुक पोलिसांचे पथक शहरातील मुख्य चौक तसेच मुख्य रस्त्यांलगत तैनात केले जाणार असून त्याद्वारे मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहेत.
रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असून, चिंतेचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. करोनाचा नवीन व्हेरियंट देशात पसरत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र याच बालेकिल्ल्यातून आता अजित पवारांना एक- एक धक्का बसत असल्याचं समोर येत आहे.
नाताळच्या सुट्टीत कुंभनगरीच्या अर्थकारणाला धार्मिक पर्यटनाने गती दिली आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांस्तव भाविकांचे हाल होत आहेत.
लैच कामातून जायचा अंदाज दिसतोय तो माणूस. मला तर धाकच पडलाय त्यांचा. तुमच्याकडून सुसंस्कृतपणा काय शिकायचा भुजबळ साहेब. सुधरा. आज म्हणतोय सुधरा. बसायचा शॉक राव तुम्हाला. तुम्ही राज्यातला एक अभ्यासू माणूस आहात. मला फार टेन्शन येईल तुम्हाला झटका बसला तर. इतका चांगला माणूस पागल होऊन द्यायचा नाही आम्हाला. मला फारच वाईट वाटायला लागलंय आता. काय बरळंल हा माणूस. काय झालं असेल तुम्हाला? सांगा तरी. महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊ द्या फटकून तर तेही येत नाहीत. त्यांना वाटतं का हे येडे व्हावेत म्हणून.. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे. तुमची संस्कृती या बोलण्यावरूनच लक्षात आली. कोयत्याच्या, काठ्यांच्या, पाय तोडण्याची भाषा करणारे तुम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवणार आहात राज्याला? तुम्ही तुमचं बघा ना. आम्ही आमचं बघतो. आम्ही लढणार. तुम्ही गप्पा ठोकायला बसलेत फक्त – जरांगे पाटील
Marathi News Updates: मराठा आरक्षण व राजकीय समीकरांच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या!