Marathi News Update, 01 December 2023 : सध्या राज्यासह देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीची उपांत्य फेरी मानली जात आहे. दुसरीकडे राज्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं जोडण्याच्या कामाला वेग आला आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून रणनीती आखली जात आहे. जागा वाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकासआघाडीतही जागा वाटपावर मंथन चालू आहे. विशेष म्हणजे बंडखोरांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर दिवसभरातील राज्याच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्याच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर...

19:16 (IST) 1 Dec 2023
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात महामेट्रोची ई-रिक्षा सेवा

नागपूर: राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला आगमन झाले. पाहिल्या दिवशी राष्ट्रपती यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. राष्ट्रपतींच्या दौऱ्या निमित्ताने स्थानिक पातळीवर सर्व शासकीय यंत्रणा राबत असतानाच, या संपूर्ण आयोजनात नागपूर मेट्रोचादेखील सहभाग होता.

19:15 (IST) 1 Dec 2023
मी कारखानदार नाही, मला ऊस दरातील कळत नाही - मंत्री खाडे

सांगली : मी साखर कारखानदार नाही, उस दरातील मला काही कळत नाही, यामुळे उसदराबाबत सुरू असलेल्या आंदोलनात आपण हस्तक्षेप करणार नाही. ही जबाबदारी आपण भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सोपवली असल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

19:14 (IST) 1 Dec 2023
'केएमटी'चे कर्मचारी संपावर; कोल्हापुरातील प्रवाशी वाहतुकीवर परिणाम

कोल्हापूर : सातवा वेतन आयोगासह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर महापालिका संचलित केएमटी बस सेवेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परिवहन सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

19:13 (IST) 1 Dec 2023
भाजपचे असंतुष्ट नेते सुरेश पाटील यांची प्रदेश आघाडीवर वर्णी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचा प्रदीर्घ अनुभव असलेले; परंतु भाजपमध्ये गेली दहा वर्षे असंतुष्ट नेते समजले जाणारे सुरेश पाटील यांची अखेर प्रदेश पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावली आहे.

18:55 (IST) 1 Dec 2023
सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी वनविकास कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नाशिक: महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) अधिकारी, कर्मचारी यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा...

18:47 (IST) 1 Dec 2023
मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा

मुंबई: मध्य रेल्वेवरील लोकल दररोज १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत असून मध्य रेल्वेचा हा लेटलतीफपणा प्रवाशांना नवा नाही. मात्र मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

सविस्तर वाचा...

18:26 (IST) 1 Dec 2023
डोंबिवलीतील वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या जिवाला भूमाफियांकडून धोका

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी आक्रमक पुढाकार घेणारे ज्येष्ठ वास्तुविशारद संदीप पाटील यांना भूमाफियांकडून धमक्या देण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा....

17:59 (IST) 1 Dec 2023
नाशिक : नांदगावजवळील अपघातात महिलेचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील नांदगांव - येवला रस्त्यावर मल्हारवाडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी चारचाकी वाहनाखाली सापडल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. एक जण गंभीर आहे. मयत महिलेचे नाव सुनिता जाधव (५०) असून दुचाकीस्वार भिकन वाळुंजे (६३, रा. नाशिक) हे गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती नांदगांव पोलिसांना मिळाल्यावर निरीक्षक प्रतिम चौधरी, सहायक निरीक्षक नितीन खंडागळे सहकाऱ्यांसह अपघातस्थळी पोहचले. जखमी व्यक्तीस रुग्णालयात हलविले. महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

17:12 (IST) 1 Dec 2023
पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

वारकरी संप्रदायात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीला येतात.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 1 Dec 2023
चुनाभट्टीतील ‘टाटानगर’ इमारत अखेर जमीनदोस्त; गिरणी कामगार मात्र वाऱ्यावर

मुंबई: गेली अनेक वर्षे धोकादायक स्थितीत उभी असलेली चुनाभट्टीमधील टाटानगर इमारत अखेर मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. मात्र या इमारतीत वास्तव्यास असलेले गिरणी कामगार आद्यपही वाऱ्यावरच आहेत.

सविस्तर वाचा...

16:53 (IST) 1 Dec 2023
पोषण आहारात अंडी नको! ‘या’ संघटनांचा वाढता विरोध, ‘हे’ सुचविले पर्याय…

सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहारात अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 1 Dec 2023
डोंबिवलीत सराफाचे दुकान फोडून ७५ लाखाच्या ऐवजाची चोरी

डोंबिवली: भाड्याने घेतलेल्या दुकानातील भिंतीला छिद्र पाडून त्यातून शेजारच्या सराफाच्या दुकानात प्र‌‌‌वेश करून चोरट्यांनी ७५ लाखाचा सोने, चांदीचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

सविस्तर वाचा...

16:38 (IST) 1 Dec 2023
आमदार केचेंचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाच आव्हान, काय म्हणाले वाचा…

वर्धा: आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपमधील कलगीतुरा थांबण्याचे नावच घेत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांची आगामी उमेदवारी डोळ्यापुढे ठेवून सुरू झालेली विकास कामांची एक्सप्रेस विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्या चांगलीच जिव्हारी लागत आहे.

सविस्तर वाचा...

16:31 (IST) 1 Dec 2023
हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महायुतीत असलो तरी विचारधारा वेगळी’

आम्ही महायुतीत असलो तरी आमच्या विचारधारा मात्र वेगळ्या आहेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 1 Dec 2023
वाढदिवसाच्या पार्टीनंतर घडलं अघटीत! कार अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भंडारा कोरंभी मार्गावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.

सविस्तर वाचा...

16:15 (IST) 1 Dec 2023
“विदर्भात ९० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे काय झाले?” प्रदीप माहेश्वरी यांचा सवाल

नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस जागतिक आर्थिक परिषदेत केलेल्या सामंजस्य करारासह दोन वर्षात पाच मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली होती. या माध्यमातून विदर्भात ९० हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचा दावा केला होता.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 1 Dec 2023
आमदार सुभाष धोटे म्हणतात, ‘फडणवीसांना विनंती की त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद सोडावे’

पूर्णवेळ पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील खोळंबलेले विकास कामे मार्गी लागतील, अशी मागणी धोटे यांनी यावेळी केली.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 1 Dec 2023
सौद्यानंतर एक दिवस आधी कोसळलेल्या पावसाने शेतकरी उदध्वस्त; अवकाळीने हंगामपूर्व द्राक्षांचे मोठे नुकसान

नाशिक: बागलाण तालुक्यातील तळवाडे येथील शेतकरी बापू गायकवाड यांनी १२ एकर क्षेत्रावर हंगामपूर्व द्राक्षाचा बहार धरला होता. लाखो रुपयांचे भांडवल खर्च करून अपार मेहनत घेत त्यांनी उत्कृष्ट द्राक्ष उत्पादित केले होते.

सविस्तर वाचा...

15:31 (IST) 1 Dec 2023
सातारा : महाबळेश्वर पाचगणी गिरीस्थानांवर उतरले ढग

सकाळी पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले असता वेण्णा लेक परिसरात एकदम ढग उतरल्याने स्वर्गसुखाचा अनुभव पर्यटकांनी घेतला.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 1 Dec 2023
वाढवण बंदराविषयी जनसुनावणी पुढे ढकला; बंदर विरोधी संघटनेसह बाधीत ग्रामपंचायत सरपंचांच्या बैठकीत ठराव

जनसुनावणी दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी बंदर विरोधी संघटना आणि ३० ग्रामपंचायत सरपंचांच्यावतीने करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

15:14 (IST) 1 Dec 2023
सायबर गुन्हेगाराकडून ११ लाखांनी फसवणूक, पाच दिवसांत पती पत्नीचे बँक खाते रिकामे

आयटी कंपनीत असलेल्या एका व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 1 Dec 2023
जव्हार, मोखाडा मधील गाव पाड्यातील आदिवासी कुटुंबात रोजगारासाठी स्थलांतर… गावामध्ये वृद्ध आणि बालके

पालघर जिल्ह्यातील दुर्गम गाव, पाडे ओस पडायला लागली आहेत. गावामध्ये फक्त वयोवृद्ध व्यक्ती आणि शाळेत जाणारी मुलेच दिसत आहेत.

सविस्तर वाचा...

14:50 (IST) 1 Dec 2023
टिटवाळा लोकलमध्ये प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवाशाला मारहाण

कल्याण: मुंबई सीएसएमटी ते टिटवाळा लोकलमध्ये बुधवारी दुपारी प्रथम श्रेणीच्या डब्यात एका प्रवाशाला दोन प्रवाशांनी शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धावत्या लोकलमध्ये बेदम मारहाण केली.

सविस्तर वाचा...

14:40 (IST) 1 Dec 2023
नागपूर : विवाहितेची आत्महत्या; मैत्रिणीचा पैशांसाठी तगादा

पैशाचा तगादा लावल्यामुळे घाबरलेल्या विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वाचा...

14:38 (IST) 1 Dec 2023
आता सेंट जॉर्ज रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शक्य

मुंबई: राज्य सरकारने सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये यकृत प्रत्यारोपण विभाग सुरू करण्यास मंजुरी दिली असून या विभागासाठी चार कोटी ३० लाख २४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...

14:35 (IST) 1 Dec 2023
गडचिरोलीच्या हजारो शेतकऱ्यांचे चंद्रपूरात ठिय्या आंदोलन, हत्ती आणि वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी

गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्यात वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा...

14:13 (IST) 1 Dec 2023
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त अमरावती-मुंबई-अमरावती विशेष रेल्‍वे

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महापरिनिर्वाण दिन निमित्त मध्य रेल्वे आणखी २ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. मध्‍य रेल्‍वेने या आधी १४ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ०१२१८ अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष रेल्‍वेगाडी ५ डिसेंबर रोजी अमरावती येथून सायंकाळी १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.२५ वाजता पोहोचेल. ०१२१७ मुंबई अमरावती अनारक्षित विशेष रेल्‍वेगाडी ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पोहोचेल.

14:12 (IST) 1 Dec 2023
छापील वीज देयकास ४० हजार ग्राहकांचा नकार; पर्यावरणस्नेही मार्गाचा अवलंब

नाशिक: महावितरणच्या नाशिक परिमंडळातील ४० हजार ८३५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी छापील वीज देयक नाकारून कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ऑनलाईन सेवेचा पर्याय स्वीकारला आहे.

सविस्तर वाचा...

14:11 (IST) 1 Dec 2023
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच; आरोग्य व्यवस्थेवर परिणाम, काँग्रेसचा आंदोलकांना पाठिंबा

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदांवर समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास भेट देऊन डॉ. सुधीर ढोणे यांनी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याने आरोग्य व्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे.

13:54 (IST) 1 Dec 2023
शरद पवारांवरील प्रफुल्ल पटेलांच्या आरोपावर जयंत पाटील म्हणाले...

मी त्यावेळी लहान होतो. मला तपशील माहीत नाही.ते म्हणतात २००४ ला भाजपाबरोबर जाणार होते, पण तेव्हा ते गेले का? घटना काय घडली यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर शरद पवारांना भाजपाबरोबर जायचं असतं, तर ते यापूर्वीच गेले असते. ते भाजपाबरोबर गेले नाहीत ही वस्तूस्थिती आहे. त्याचं दुःख कुणाला असेल, तर माझा त्याला नाईलाज आहे.

- जयंत पाटील</p>

Mumbai Maharashtra Live News in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Story img Loader