Marathi News Update, 01 December 2023 : सध्या राज्यासह देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीची उपांत्य फेरी मानली जात आहे. दुसरीकडे राज्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं जोडण्याच्या कामाला वेग आला आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून रणनीती आखली जात आहे. जागा वाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकासआघाडीतही जागा वाटपावर मंथन चालू आहे. विशेष म्हणजे बंडखोरांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर दिवसभरातील राज्याच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Updates : राज्याच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…
गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील कार्यालयात साप शिरला. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.
खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून करण्यात आला.
मालेगाव: पाकिस्तानमध्ये दोन मंदिरे पाडण्यात आल्याची प्रतिक्रिया मालेगावात उमटली असून या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. पाकिस्तानला भारत सरकारने धडा शिकवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
युनेस्को या संघटनेने विश्व विरासत स्थळ म्हणून घोषित केलेल्या आणि हिंदू धर्मियांच्या आस्थेचा भाग असलेल्या नियंत्रण रेषेशेजारील शारदापीठ मंदिर तसेच सिंध प्रांतातील मिथी शहरातील श्री हिंगलाज माता मंदिर पाडण्यात आले आहे. स्थानिक न्यायालयाच्या आदेशाने ही मंदिरे पाडण्यात आल्याचे तेथील प्रशासनातर्फे सांगितले जाते. केवळ हिंदूंच्या आस्थेला ठेच पोहोचविण्यासाठीच ही मंदिरे पाडण्यात आल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
पाकिस्तानची ही कृती दहशतवादाची आहे. त्यातून जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना मालेगाव शहर भावसार समाजाचे अध्यक्ष अभिषेक भावसार, सचिव समीर भावसार, देवेंद्र भावसार, सुरेश भावसार, नीलेश भावसार आदी उपस्थित होते. समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन शिरस्तेदार तुप्ते यांनी स्वीकारले.
धुळे: जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शुक्रवारी कामावर उशिरा येणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर थांबवून आपल्या प्रशासकीय कामकाजाचा पहिला धक्का दिला. सविस्तर वाचा…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.
राष्ट्रपती यांच्या राजशिष्टाचारानुसार त्यांचा दौरा जेथे होतो किंवा ज्या स्थळाला त्या भेटी देतात त्या सर्वांची माहिती गोळा केली जाते.
मनमाड: शहरातील इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल खचल्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक प्रशासनाने बंद केली असून त्यामुळे सर्वदूर वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रामुख्याने रेल्वे जंक्शनमुळे मनमाड येथून शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली आहे.
वसईत राहणारा अभिजित राणे (३३) हा रविवारी रात्री मुंबई अहमदाबाद महामार्गावरून घरी येत होता.
नाशिक: अवैधरित्या तीन वाहनांमधून जनावरांची अमानुषपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या पाच जणांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या अवैध वाहतुकीत दोन गोवंश जनावरांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ७९ जनावरांची सुटका करुन २१ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वाहनांमधून जनावरांची बेकायदेशीरपणे आणि निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदगाव रेल्वे उड्डाणपूल येथे वाहनांचा पाठलाग करून पोलिसांनी वाहने ताब्यात घेतली. या वाहनांमध्ये ७९ जनावरे कोंबून भरलेली होती. वाहनातच दोन गोवंश जनावरांचा मृत्यू झाला होता. अवैध व बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी रवींद्र वाघ, राकेश मगर, तुषार जाधव (रा. हेदनुर, जि.धुळे), कुणाल शिंदे (विंचूर, जि.धुळे), योगेश म्हसदे (डोंगराळे,मालेगाव) या पाच जणांविरुद्ध नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याचे अनेक प्रकार घडत असतात. प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिक-धुळे दरम्यान ही वाहतूक अधिक प्रमाणावर होत असल्याचे याआधी निष्पन्न झाले आहे.
मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी दुकानांवर दगडफेक करीत बोर्ड फोडण्यात आले.
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.
बाप लेकीचे घट्ट प्रेम पाहून, लग्नदारी आलेल्यांचे डोळे मात्र पाणावले होते.
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाने (कात्रज) गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांनी कपात केली आहे. आज. एक डिसेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयाचा पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील ग्राहकांना फायदा होणार आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या संभाव्य अभ्यासक्रमात अर्थशास्त्र विषय मुख्य विषय ठेवण्याऐवजी दुय्यम ठेवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी नयनला मारहाण करण्यासाठी भंडारा येथील पाच ते सहा तरुण पांढराबोडी येथील शिवारात गेले होते.
कापूस आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अहवालातून देण्यात आली आहे.
यंत्रणेची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा अभाव याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्र या दशकात कालबाह्य ठरत आहे.
पोलीस दलात नोकरी लावून देण्याच्या नावावर तीन जणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक: शाळेत अटल टिंकरिंग प्रयोगशाळेसाठी नीती आयोगाने दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करून दीड कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्या प्रकरणी महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती नाशिक या संस्थेच्या या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे, अपूर्व हिरे, संचालक मंडळ आणि संबंधित शाळांचे तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज यंत्रणांना दिले.
ठाणे: रेल्वे स्थानकात पुर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी दोन पादचारी पुलांची उभारणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु या कामासाठी ठाणे महापालिकेडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने पुलाचे काम रखडले आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे.
महायुतीचा उमेदवार मीच असून माझा विजय देखील निश्चित असल्याचा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
अकोला : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अकोला – तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वेचा सेवा कालावधी वाढविण्यात आला आहे. पूर्णा, नांदेड, काचीगुडा, धर्मावरम मार्गे धावणारी गाडी क्र. ०७६०५ तिरुपती अकोलाच्या ०१ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०७६०६ अकोला-तिरुपतीच्या ३ ते ३१ डिसेंबरदरम्यान पाच फेऱ्या होतील. या गाडीच्या रेल्वे फेऱ्यांचे वेळापत्रक आणि थांबे यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी (१ डिसेंबर) होणार आहे. या कार्यक्रमाला येथे शिकलेले देश, विदेशातील सुमारे ३ हजार आजी- माजी विद्यार्थी उपस्थित राहतील.
मुंबई: मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे गुरुवारी रात्री अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. मुंबई महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
माहीम येथील खाजगी डॉक्टरांना दाखविल्यानंतर त्यांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ-महाराष्ट्र सीमेवरील प्रतापपुर जंगल परिसरात फलक लावल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
‘एआयएएआरओ’तर्फे नागपूरात १ ते ३ डिसेंबरदरम्यान एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रोमुळे थेट ठाणे शहराशी जोडली जाणारी आणि कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट नवी मुंबईशी जोडून शहरांतर्गत वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या कल्याण – तळोजा मेट्रो १२ मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.