Marathi News Update, 01 December 2023 : सध्या राज्यासह देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीची उपांत्य फेरी मानली जात आहे. दुसरीकडे राज्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं जोडण्याच्या कामाला वेग आला आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून रणनीती आखली जात आहे. जागा वाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकासआघाडीतही जागा वाटपावर मंथन चालू आहे. विशेष म्हणजे बंडखोरांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीही चालू आहे. या पार्श्वभूमीवर दिवसभरातील राज्याच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Updates : राज्याच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

10:41 (IST) 1 Dec 2023
पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा कमी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे शहरात पाणीकपात करावी लागणार आहे.

वाचा सविस्तर…

10:41 (IST) 1 Dec 2023
चाळीस कोटींपेक्षा जास्त किंमत असूनही घरांना मागणी! जाणून घ्या खरेदी करणारे कोण…

देशभरात यंदा ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या ५८ आलिशान घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी अशा केवळ १३ घरांची विक्री झाली होती. यंदा त्यात तब्बल २४७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

10:40 (IST) 1 Dec 2023
पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, सरकारने तातडीने निधी द्यावा – मनोज जरांगे

पावसाने शेतकऱ्यांचं नुकसानही झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारला विनंती आहे की, त्यांना उघड्यावर पडू देऊ नका. राज्य आणि देश जगवणारा शेतकरी वर्ग आहे. त्यांच्या फार हालअपेष्टा होत आहेत. त्यांना तातडीने निधी द्या. पंचनामेही करा. काही ठिकाणी पंचनामेही सुरू नाहीत. बऱ्याच अधिकाऱ्यांना पंचनामे करायला वेळच नाही वाटतं.

– मनोज जरांगे

10:39 (IST) 1 Dec 2023
राज्यात उद्यापासून वातावरण कोरडे

पुणे : राज्यावर असलेले ढगाळ हवामान कमी होऊन शनिवार, दोन डिसेंबरपासून वातावरण कोरडे होण्यास सुरुवात होईल. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोमवार, चार डिसेंबरपासून विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

10:27 (IST) 1 Dec 2023
“त्याचे काय डोळे गेले आहेत का? त्याने…”; एकेरी उल्लेख करत जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

हे शक्तीप्रदर्शन नाही. आम्ही एकमेकांशी संवाद साधत आहोत. आम्ही आमच्या समाजातील लेकरांना न्याय मिळावा म्हणून एकत्र येत आहोत. त्याला यात जेसीबी आणि फुलच दिसत आहेत. त्याने आरक्षणही पहावं. त्याचे काय डोळे गेले आहेत का? त्याने आरक्षण द्यायचंही बघावं, तिकडेही लक्ष द्यावं. ३२ लाख लोकांना आरक्षण मिळालं. आयुष्याची भाकरी मिळाली म्हणून आनंदात ते जेसीबी, फुलं आणत आहेत. त्याला केवळ जेसीबी दिसत आहेत, ७० वर्षांपासून आरक्षण नाही तेही दिसू दे. तो स्वतः आरक्षण खातो आणि आमचंही आरक्षण बुडाखाली घेऊन बसला आहे. त्याचे काय डोळे गेले आहेत का? हे पोरं त्रास-वेदना सहन करत आहेत. त्याने तेही बघावं.

– मनोज जरांगे

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह