Live Marathi News Update: महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहे तो मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यानंतर सरकार त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करतं आहे मात्र सरकारला अद्याप यशस्वी शिष्टाई शक्य झालेली नाही. जोपर्यंत मराठा समाजाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशात निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असं जात प्रमाणपत्र देऊ असा अध्यादेश सरकारने काढला आहे. मात्र या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.महाराष्ट्रात मागचे काही दिवस पाऊस पडल्यानंतर आता पावसानेही विश्रांती घेतली आहे. तर इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.
Maharashtra Breaking News | Maharashtra Breaking News Live: शिंदे सरकारचा तो निर्णय चुकीचा! पृथ्वीबाबांचा आरोप आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
गडचिरोली : भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत दुधाळ गाय वाटप योजनेत आदिवासींना आलेले अनुदान दुसऱ्या खात्यात वळवून फसवणूक केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ सप्टेंबरला अखिल भारतीय सरपंच परिषदेने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
नागपूर : सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला. कृती समितीने नागपुरातील संविधान चौकात धरणे सुरू केले आहे.
चंद्रपूर: पाच वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात आशावर्कर, अंगणवाडीसेविकांच्या मानधनात वाढ केली होती. मात्र, अजूनही एक रुपयाची वाढ त्यांच्या मानधनात झाली नाही.
नवी मुंबई: मागील दोन महिन्यांपासून बाजार गाजवणाऱ्या टोमॅटोचे गडगडले असून सोमवारी वाशी एपीएमसी बाजारात प्रतिकिलो ५-१०रुपयांवर घसरले आहेत.
बुलढाणा : अपुऱ्या पावसामुळे पावसाळा संपत आला असतानाही पाणी टंचाईचा जिल्ह्यातील ‘मुक्काम’ कायम आहे. यावर कळस म्हणजे ही टंचाई केवळ पाण्याचीच नसून निधीचीही असल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना उधारीवरच सुरू आहे.
चंद्रपूर : जालन्यातील आंदोलनात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध केला आहे. जरांगे पाटील याच्या मागणीविराेधात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आज सोमवारपासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
नागपूर : रेल्वेच्या भोपाळ विभागातील जुझारपूर-पावरखेडा दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी हे पूल बांधण्यात येत आहे. त्यामुळे येथून रेल्वेगाड्यांना नॉन-इंटरलॉकिंगद्वारे जे-जा करावे लागत आहे. रेल्वेगाड्यांची अतिशय संथ गती असल्याने काही रेल्वेगाड्यांना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुलढाणा : मोताळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला मुस्लीम बांधवांनी भेट देऊन आपला पाठिंबा दिला आहे.
नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वाहतुकीदरम्यान अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत असून रुग्णांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केल्यास मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
नागपूर : देशात दरवर्षी ११ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन पाळला जातो. भारतातील वन्यजीव, जंगले आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी प्राण गमावलेल्या कामगारांचे स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी देशभरातील वनक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाला महत्त्व दिले जाते.
बुलढाणा : बालाजी नगरी म्हणून प्रसिद्ध देऊळगाव राजामध्ये एका इसमाकडून तब्बल २४ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. यामुळे ही नगरी गांजा तस्करीचे केंद्र बनत चालली की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.
काही वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आता घरातील तरुण मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
कोल्हापूर : यंदा साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळाल्यामुळे कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले आहेत. महागाईमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील साखर कारखान्यांनी दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन किमान ४०० रुपये देण्याबाबत कारखानदारांना आदेश द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
५८ टक्के कमी पाऊस या महिन्यात झाला. तब्बल १०२ वर्षानंतर सर्वाधिक कमी पाऊस या महिन्यात झाला.
नागपूर : विभागीय नियंत्रक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने तिला वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात सोमवारी सकाळी उपोषण सुरू केले. एसटीच्या इतिहासात प्रथमच महिला कर्मचारी अशा पद्धतीने आंदोलन सुरू केल्याचा दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
नवी मुंबई: चांगला चाललेला व्यवसाय जागतिक पातळीवर नेताना काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण कोणाशी व्यवहार करतो हे जाणून घेण्याची गरज आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे.
अकोला : मध्य रेल्वेच्या झांसी जंक्शन रेल्वेस्थानकाच्या दुरुस्ती कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या सहा एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे : मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ असे जातीचे दाखले देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील १४ दिवसांपासून जालना जिल्ह्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. यावर आमदार धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं आहे. मराठा आरक्षणासाठी ते उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर आले होते. त्यावेळी आरक्षण हाच माझ्यावरचा सर्वात चांगला उपचार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नागपूर : तमिळनाडूचे मंत्री स्टॅलिन सनातन धर्मावर टीका करीत असतना काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजूनपर्यंत त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. विरोधकांनी या मुद्यावर मौन सोडले पाहिजे, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नागपूर : ब्रिटीश राजवटीत लोक अत्याचाराने त्रस्त होते. त्यावेळी देश स्वातंत्र्य व्हावा या भावनेतून पिवळी मारबत सुरू केली तर इंग्रज शासनात बाकाबाई भोसले ही इंग्रजांना जाऊन मिळाली, त्यामुळे येथे बांकाबाईचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून १९८१ पासून नेहरू पुतळा चौकात काळी मारबत तयार केली जाते. या काळ्या मारबतीला १४३ वर्षांचा इतिहास आहे.
मुंबई: मुंबईतील अनेक उपनगरीय रुग्णालये सुपरस्पेशालिटी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार मुलुंडमधील एम टी अगरवाल रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे रुग्णालय नव्या वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.
गोंदिया : सुरक्षित प्रसुती आणि गर्भवती मातांच्या सुरक्षेकरिता जननी सुरक्षा कार्यक्रम राबविला जात आहे. याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. यातून सुरक्षित प्रसुतीच्या दृष्टीने जे काही साहित्य आणि औषध लागेल, ते मोफत देण्यात येते. मात्र बाई गंगाबाई रुग्णालयात हे साहित्य रुग्णांनाच बाहेरून खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे या योजनेकरिता येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
गडचिरोली: शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. महानंदा दिनेश मोहूर्ले (५३, रा.फरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मी इष्काची हो इंगळी, पाव्हणा झालाय येडापिसा या लावणीवर नृत्य करीत असताना दिलकी कातील म्हणून तरूणाईला झिंग आणणारी गौतमी पाटील तोल गेल्याने व्यासपीठावरच कोसळण्याची घटना रविवारी रात्री पलूस येथील दहीहंडीवेळी घडली. सविस्तर वाचा…
निवडणुकीच्या आधी दंगली घडवल्या जातील असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. जाती धर्माच्या आधारे महाराष्ट्रासह देशभरात दंगली घडवल्या जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नागपूर: शहरात डेंग्यू उच्चांक गाठत असून रुग्ण संख्या वाढतच आहे. नागपूर महापालिकेच्या प्रयोगशाळेत डेंग्यूचे निदान करणाऱ्या किटचा तुटवडा होता. आता १० किट्स पोहचल्या पण १,१५६ नमुने प्रलंबित असल्याने त्याचीच तपासणी पहिली होईल.
अमरावती: एका तरुणीने मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी नवाथे चौकानजीकच्या रुळावर उघडकीस आली होती.
कावडधारी शिवभक्तांवर काळ बनून ट्रक आला आणि भरधाव वाहनाने अनेकांना उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या घटनेमुळे अकोट तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. सविस्तर वाचा
मुंबई ते हैदराबाद पवन एक्सप्रेसने प्रवास करताना कल्याण ते कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मध्य रेल्वेच्या आस्थापनेवरील एका तिकीट तपासणीसाला एका प्रवाशाने मी रेल्वेचा कर्मचारी आहे, असे सांगून तिकीट दाखविण्यास नकार दर्शविला. सविस्तर वाचा…
मराठा आरक्षण प्रकरणात काय काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ आणि २०१८ च्या मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांनीही ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.