Live Marathi News Update: महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहे तो मराठा आरक्षणाचा मुद्दा. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यानंतर सरकार त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करतं आहे मात्र सरकारला अद्याप यशस्वी शिष्टाई शक्य झालेली नाही. जोपर्यंत मराठा समाजाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. अशात निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी-मराठा, मराठा-कुणबी असं जात प्रमाणपत्र देऊ असा अध्यादेश सरकारने काढला आहे. मात्र या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं म्हटलं आहे.महाराष्ट्रात मागचे काही दिवस पाऊस पडल्यानंतर आता पावसानेही विश्रांती घेतली आहे. तर इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा