Mumbai Maharashtra Breaking News Today, 06 December 2023: राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे हा मुद्दा तापू लागला आहे. तिकडे नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून सत्ताधारी व विरोधकांच्या पत्रकार परिषदांमधून अधिवेशनकाळ नेमका कसा जाणार आहे, त्याचा अंदाज येण्याची शक्यता आहे.
Today’s Breaking News Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
वडेट्टीवारांनी एनसीआरबीच्या अहवालाचा हवाला दिला. तो अहवाल कसा वाचायचा, हेही कधीतरी शिकलं पाहिजे. त्या त्या प्रकारात एकूण गुन्हे प्रती लोकसंख्या किती आहे, यावर त्याचा आढावा घेतला जातो. लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र गुन्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे वगैरे. पण ही वस्तुस्थिती नाही. लोकसंख्येच्या बाबतीत आपण देशात आठव्या क्रमांकावर आहोत. हत्येच्या बाबतीत आपण १७व्या क्रमांकावर आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत आपण सातव्या स्थानी आहोत. बलात्काराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र १२व्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे याबाबतीतलं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची गरज आहे – फडणवीस
आज विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला. चहापान चर्चेसाठी होतं. पण कदाचिक विरोधी पक्षाचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान ठेवावं लागेल.. म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसतेय. मात्र आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणं आणि जे पत्र दिलं आहे.. त्यांच्या पत्रकार परिषदेत काही लोक झोपी गेले होते. तीन राज्यांत जसे झोपले, तसे पत्रकार परिषदेतही ते झोपी गेले होते. पण तशाच झोपेत हे पत्र लिहिलंय का हा प्रश्न पडावा असं पत्र विरोधकांनी दिलं आहे. एकतर मला आश्चर्य वाटतं की नागपूरचं अधिवेशन विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी यासाठी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रात विदर्भ, मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही. त्यांना विदर्भ, मराठवाड्याचा विसर पडल्याचं या पत्रावरून दिसतंय. दुसरं राज्यात काय चाललंय याचं भानही त्यांना नाही. त्यांनी पत्रात कंत्राटी भरतीच्या जीआरचा विषय काढला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सहीनं निघालेला जीआर दीड महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी रद्द केला हेही ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही त्या विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे – देवेंद्र फडणवीस
सरकारने खेळाला नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यात अगदी दहीहंडीपासून ते कबड्डीपर्यंतच्या खेळांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील उन्नतनगर तीनमधील ६३ वर्षे जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतून रस्त्यालगत असलेल्या ‘अनधिकृत’ व्यावसायिक सदनिकाधारकांच्या दोन स्वतंत्र गृहनिर्माण संस्थांना म्हाडा उपनिबंधकांनी मान्यता दिल्यामुळे एकत्रित पुनर्विकासात निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुंबई गृहनिर्माण मंडळावर सोपविण्यात आली आहे.
निवडणुकीचे राजकीय परिणाम काय होतील या प्रश्नावर मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
या कृतीस पत्नीनेही अपप्रेरणा दिली असल्याने पती- पत्नी विरूद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे: राज्यात जमिनींच्या सुमारे लाखभर मोजण्या शिल्लक आहेत. या मोजण्या त्वरेने करण्यासाठी राज्य सरकारने नामी शक्कल काढली आहे. या निर्णयामुळे जमिनींच्या मोजण्या लगेच होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
लाखो रूपयांची द्राक्षे मातीआड करताना शेतकरी अस्वस्थ झाला आहे.
मुंबई, रायगड येथील मच्छिमारांचे सुद्धा आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा बंदर विरोधी आंदोलन कार्यकर्त्यांकडून बैठकीत करण्यात आला.
वाहनाची तपासणी केली असता, डिक्कीत एका पोत्यात तीन लाख सात हजार ४४० रुपये किंमतीचा १५ किलो ३७२ ग्रॅम गांजा आढळला.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असताना पूर्वी तीन ते चार आठवडे अधिवेशन होत असे.
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सजावट व उर्वरित तयारी करण्यास आजी व आजोबांनी गेल्या दोन दिवसांपासून तयारीची लगबग सुरू केली होती.
ठाणे येथील गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या धर्तीवर याठिकाणी १०० खाटांचे हे रुग्णालय चालवण्याचा संयुक्त निर्णय महापालिका आणि राज्य शासनाने घेतला आहे.
गोंदिया: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने नोव्हेंबर २०२३ मध्ये १.३७ दशलक्ष टन मालवाहतूक करून १५७.२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. चोरीच्या सामानाच्या ५० हजार ४९६ गुन्ह्यांची नोंद झाली असून संबंधितांकडून २ कोटी ३१ लाख रुपये दंड स्वरूप वसूल करण्यात आले आहेत. याशिवाय रेल्वे आणि मुख्य रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आलेल्या नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात धुम्रपानाची १०९ प्रकरणे नोंदवण्यात आली असून २१ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे आवारात कचरा टाकण्याच्या ६१० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यातून ६३ हजार ९०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. नोव्हेंबरमध्ये विभागात १.७० दशलक्ष तिकिटांची विक्री झाली,यातून २६.१३ कोटी रुपये कमावलेले उत्पन्न मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १३.९१ टक्के अधिक आहे.
गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा येत्या ९ डिसेंबरचा गडचिरोली जिल्हा दौरा व प्रस्तावित कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे. शाह यांच्या दौऱ्याची पुढील तारीख मिळाल्यानंतर हे कार्यक्रम ठरविले जातील, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथील कार्यालयातून दिली.
१९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून कामावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
मुंबई: सांताक्रुझ येथील अनेक भागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून दूषित तसेच अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात दोन वेळा मोर्चा काढण्यात आला.
पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला ससून रूग्णालयातून पसार होण्यासाठी मदत करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले.
शरद पवार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भेटीला, फोटो पोस्ट करून म्हणाले…
Made a courtesy visit to the Vice President of India, Shri Jagdeep Dhankkar Ji in New Delhi pic.twitter.com/TxOPydjz0W
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 6, 2023
पिंपरी: विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात घडली.
नागपूर: हिवाळी अधिवेशन त्यापाठोपाठ आलेल्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चैतन्याचे वारे वाहताहेत. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.
त्यानंतर थोड्याच दिवसांत लोहार यांना एका शिक्षणसंस्थाचालकाकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.
ठाणे : मालकीनीचे अश्लिल छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वारंवार खंडणी उकळणाऱ्या एका लेडिज टेलरला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. विशाल राठोड (४१) असे आरोपीचे नाव असून त्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत १ लाख १० हजार रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे: हडपसर ओैद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात चेष्टा मस्करीतून काॅम्प्रेसर यंत्रातील हवा पाइपद्वारे अल्पवयीन मुलाच्या पोटात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.
अशा बांधकामांची यादी महापालिकेने पहिल्यांदाच संकेत स्थळावर प्रसिद्ध केली असून नागरिकांना या पासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिकांसाठी मोफत बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२ शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. त्याचे वाटप चालू झाले आहे.
जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आगामी तीन वर्षांत भारताचे स्थान कायम असेल.
वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेले सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जाऊ लागला आहे. त्यामुळे हे रस्ते गिळंकृत होऊ लागले आहे. याचा आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे.
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त पन्नास लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२ शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे.
Today’s Breaking News Updates: मराठा आरक्षण, हिवाळी अधिवेशन व इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा