Maharashtra Live Updates Today, 04 October 2024 : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यांच्या हस्ते आज (शुक्रवार ४ ऑक्टोबर) कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नावरण करण्यात येणार आहे. याशिवाय ते शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. तसेच गुरुवारी रात्री केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय मध्यरात्री मंत्री संजय राठोड यांच्या गाडी गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चालक गंभीर असल्याची माहिती आहे. यासह इतर घडामोडींकडेही आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 04 October 2024 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं शरद पवारांकडून स्वागत

11:28 (IST) 4 Oct 2024

विजय वडेट्टीवारांच्या मुंबईतील घराबाहेर भाजपाकडून आंदोलन

चंद्रपुरात एका अल्पवयिन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून यात युवक काँग्रेसच्या नेत्याचा समावेश आहे, असा आरोप करत भाजपाकडून विजय वडेट्टीवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी पोलिसांनी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे..

11:07 (IST) 4 Oct 2024
राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.

वाचा सविस्तर...

11:04 (IST) 4 Oct 2024
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

पुणे : केंद्र सरकारने देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजना (पीएम – आरकेव्हीवाय) आणि कृषीउन्नती योजना (केवाय) या १,०१,३२१.६१ कोटी रुपयांची तरतुद असलेल्या योजनांना मंजुरी दिली आहे.

वाचा सविस्तर...

11:04 (IST) 4 Oct 2024
मेट्रो ३ : आरे – बीकेसी भुयारी मेट्रोच्या संचलनाचा मार्ग मोकळा

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी अशा पहिल्या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र अखेर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) प्राप्त झाले आहे.

वाचा सविस्तर...

10:55 (IST) 4 Oct 2024
ठाणे: ९०५ वन हक्क दावेदारांना वनपट्टयांचे वाटप, श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश

ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी नागरिकांची संख्या मोठी आहे. या आदिवासी नागरिकांकडून गेली अनेक वर्ष शासनाच्या जमिनी राखण्याचे काम केले जात आहे.

सविस्तर वाचा...

10:28 (IST) 4 Oct 2024
पुणे : बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया

अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

https://twitter.com/supriya_sule/status/1842050334816141420

10:25 (IST) 4 Oct 2024

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याबद्दल तमाम मराठी जनांचं अभिनंदन - राज ठाकरे

घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

https://twitter.com/RajThackeray/status/1841885654197927986

10:24 (IST) 4 Oct 2024

लवकरात लवकर जागावाटपाचा प्रश्न सोडवा; शरद पवारांची महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती

सांगलीबाबत लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या माहितीप्रमाणे चर्चा झाली नसावी असं वाटतंय. पण आजच्या निवडणुकांसाठी सर्व जागांच्या संबंधात चर्चा चालू आहे. त्यात आमच्याकडून जयंत पाटील व इतर काही सहकारी आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले व त्यांचे सहकारी आणि संजय राऊत व त्यांचे सहकारी एकत्र बसून चर्चा करत आहेत. मी ऐकतोय की काही बाबतीत त्यांची सहमती झाली आहे. काही गोष्टींवर ते ७, ८, ९ या तीन तारखांना बसणार आहे. माझा त्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा आणि आपण लवकर लोकांमध्ये जाऊयात. दिवस थोडे राहिले आहेत. लोकांना महाराष्ट्रात बदल पाहिजे. लोकमत आपल्याला अनुकूल आहे. त्याचा आदर आपण लवकर करायला हवा असा माझा आग्रह आमच्या सहकाऱ्यांना आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

10:23 (IST) 4 Oct 2024
सचिन तेंडुलकर सातव्यांदा ताडोबात; बिजली, छोटी तारा वाघिणीचे दर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले होताच पहिल्याच दिवशी सचिन तेंडूलकर यांची 'एन्ट्री' झाली.

सविस्तर वाचा...

10:14 (IST) 4 Oct 2024

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता; राजवर्धन पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर चर्चांना उधाण

भाजापाचे नेते हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राजवर्धन पाटील यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनंतर चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी तुतारीचा फोटो स्टेटसला ठेवला आहे. यासदंर्भात बोलताना जे ठरलं होतं, तेच स्टेटसला ठेवलं आहे. बाकी तुम्हाला लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

10:12 (IST) 4 Oct 2024
राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. मराठवाडा आणि विदर्भानंतर राज ठाकरे आता उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी आणि एकंदरितच तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

10:11 (IST) 4 Oct 2024
पुणे: कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

बोपदेव घाटात फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना धमकावून लुटमारीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

सविस्तर वाचा...

10:06 (IST) 4 Oct 2024

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय फक्त जुमला ठरू नये - नाना पटोले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय फक्त जुमला ठरू नये, असे ते म्हणाले.

Sharad Pawars big statement about increasing oppression of women

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं शरद पवार यांनी स्वागत केलं आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. प्रत्येक मराठी माणसांचं मनापासून समाधान व्हावं, असा हा निर्णय आहे. गेली अनेक वर्षे केंद्र सरकारकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा म्हणून मागणी होती. ती मागणी महाराष्ट्र सरकारने केली. ती मागणी साहित्यीक संस्थांनी केली. ती मागणी साहित्य परिषदेमध्ये, अधिवेशनात ठराव करून केली. माझ्यासारख्या अनेक सहकारी, ज्यांना या प्रश्नामध्ये आस्था आहे. आम्ही लोकांनी सुद्धा व्यक्तिगत पातळीवर केंद्र सरकारला या सबंधीचा आग्रह केला, असं शरद पवार म्हणाले.