Maharashtra News: आज नवीन वर्षाची (२०२५) सुरुवात झाली आहे. तसेच कोरोगाव भीमा (Koregaon Bhima Shaurya Din) या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला लाखो अनुयायींनी अभिवादन केलं आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे तर काही आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर कराडला केजच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

15:56 (IST) 1 Jan 2025

“शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं”, मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारताच राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याचं मोठं भाष्य

“महाराष्ट्रात आणि देशात पवार कुटुंबाचं खूप मोठं वलय आहे. त्यामध्ये अचानक वेगळेपणा झाल्यामुळे प्रत्येकाला अडचणी यायला लागलेल्या आहेत. मी अजित पवार यांच्याबरोबर गेलो तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार यांच्यासमोर गेलेलो नाही. एवढा मी त्यांच्या जवळचा आहे. पण आता मी त्यांच्यासमोर जाणार आहे. शरद पवार यांना सोडून आल्यामुळे त्यांच्यासमोर आता नेमकं कोणत्या तोंडाने जावं? असं अनेकांना वाटत असेल. मात्र, आता आम्ही शरद पवार यांना विनंती करू की आता तुम्ही एकत्र या”, असं नरहरी झिरवाळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

15:51 (IST) 1 Jan 2025

बीड जिल्ह्यात शांतता ठेवायची असल्यास, वाल्मिक कराड याला कठोर शिक्षा झाली पाहिजे : रामदास आठवले

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.या हत्येमागे वाल्मिक कराडचं नाव समोर आल्यानंतर तब्बल 20 दिवस वाल्मिक कराड फरार होते.काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाले आणि काल रात्री उशिरा बीड येथील केज न्यायालयात हजर करण्यात आले.त्यावेळी बराच काळ दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर सरकारी वकिलांची मागणी मान्य करीत वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 1 Jan 2025

शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण; खर्चाची माहिती ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश

पुणे : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांना अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने सुरू आहे का, याची तपासणी करण्यात येणार असून, प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे २०२०-२१ ते २०२४ या काळातील शाळांच्या पोषण आहाराच्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, माहिती सादर न केल्यास नियमानुसार दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

15:45 (IST) 1 Jan 2025

ग्रंथोत्सवात पुस्तक खरेदीला अल्प प्रतिसाद; केवळ १०० ते १५० पुस्तकांची खरेदी

नवी मुंबई – येथील कोपरखैरणे परिसरात भरवण्यात आलेल्या ग्रंथोत्सवातील पुस्तक विक्रीच्या दालनातून दोन दिवसात केवळ १०० ते १५० पुस्तकांची खरेदी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध प्रकाशकांची १० दालने या ग्रंथोत्सवात होती. पहिल्या दिवशी वाचक आणि साहित्यप्रेमींच्या अनुपस्थितीमुळे पुस्तकांची खरेदरी कमी झाली होती.

सविस्तर वाचा

15:38 (IST) 1 Jan 2025

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा-मांडा शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद ठेवला जाणार आहे.

वाचा सविस्तर…

15:18 (IST) 1 Jan 2025

सिंहस्थ कुंभमेळा आराखडा अंतिम करण्याची गरज, सुजाता सौनिक यांची सूचना

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या कामांचे सुक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, प्रयागराजला भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करावा, शहरातील गोदावरीचा काठ हरित करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा विविध सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

सविस्तर वाचा…

15:00 (IST) 1 Jan 2025

उरण-नेरुळ -बेलापूर रेल्वेवर फुकट्यांचा प्रवास, दिवसाची एक लाखांची तिकीट विक्री ५० हजारांवर

उरण : १२ जानेवारी २०२५ ला उरण ते नेरुळ/ बेलापूर हा लोकल मार्ग सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत मार्गावरील प्रवासी संख्येत वाढ झाली असली तरी या मार्गावरील फुकट्या प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. दिवसाची १ लाखांची तिकीटविक्री आता ५० हजारांवर आली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

14:43 (IST) 1 Jan 2025

टिटवाळा गोवेलीतील विशेष मुलांच्या शाळेच्या फलकाची तोडमोड, संस्था चालकांची कठोर कारवाईची मागणी

कल्याण-मुरबाड रस्त्यावर टिटवाळा-गोवेली येथे मार्थेामा विद्यापीठ शैक्षणिक संस्थेतर्फे नियमित विद्यार्थ्यांबरोबर विशेष मुलांसाठी शाळा, महाविद्यालय चालविले जाते. या शाळेचा मुख्य रस्त्यावरील अनेक वर्ष असलेले शाळेच्या नावाचे दिशादर्शक फलक दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तिंनी जेसीपीच्या साहाय्याने तोडून टाकले आहेत. याप्रकरणी मार्थेामा शैक्षणिक संस्थेतर्फे टिटवाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार नोंद करून घेतली आहे.

दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेत अज्ञात व्यक्तिने जेसीपी आणून शाळेचे दिशादर्शक फलक तोडून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी मार्थेामा विद्यापीठाच्या संस्था चालकांना शाळेचे रस्त्यावरील दिशादर्शक फलक तोडण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली. सचिव रोही कुरियन आणि इतरांनी फलकांची पाहणी केली. ते जेसीपीने तोडले असल्याचे निदर्शनास आले. शाळा, विद्यार्थी, पालक, संस्था चालकांना दहशत दाखविण्याचा हा प्रकार असल्याने पोलिसांनी संबंधितांना कठोर कारवाई करण्याची मागणी मार्थोमा विद्यापीठ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांंनी केली आहे.

14:41 (IST) 1 Jan 2025

हक्काच्या घरांसाठी उद्या म्हाडा भवनावर मोर्चा

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी हक्काचे घर द्यावे, या मागणीसाठी संक्रमण शिबिरातील रहिवासी २ जानेवारी रोजी म्हाडा भवनावर मोर्चा काढणार आहेत.

सविस्तर वाचा

14:38 (IST) 1 Jan 2025

भायखळा, बोरिवलीतील ७८ बांधकामे थांबविण्याची नोटीस

भायखळा आणि बोरिवली पूर्व भागातील हवा अतिवाईट श्रेणीत गेल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने भायखळा परिसरातील ३३ आणि बोरिवली पूर्व भागातील ४५ बांधकामांना मंगळवारी काम थांबविण्याची नोटीस बजावली.

वाचा सविस्तर…

14:37 (IST) 1 Jan 2025

बनावट कागदपत्रांद्वारे ४९६ कोटींची कर चुकवेगिरी,जीएसटी कार्यालयाकडून तक्रार; दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे दोघांनी ४९६ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविल्याचे उघडकीस आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडून राजस्थानमधील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

14:27 (IST) 1 Jan 2025

१९४७ सारखेच वर्ष २०२५, सरकारी कर्मचाऱ्यांचा मात्र हिरमोड

विधानसभेच्या निवडणुका होऊन आता एक महिन्याच्या  कालावधी लोटला असून अजूनही जिल्ह्य पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून आता नवीन वर्षातच याचा फैसला होणार हे उघड  आहे. सविस्तर वाचा…

14:26 (IST) 1 Jan 2025

‘मॅडम… माझ्या हृदयातून मुलगा हरवला हो… मला शोधून द्या…’

एक वृद्ध महिला रडतच भरोसा सेलमध्ये आली. तिने हंबरडा फोडला. ‘मॅडम…माझ्या हृदयातून माझा मुलगा हरवला हो…तो आता दिसत नाही, भेटत नाही आणि आई म्हणून आवाजही देत नाही…माझा मुलगा शोधून द्या हो..” अशी तक्रार वृद्धेने पोलिसांकडे केली.

सविस्तर वाचा…

14:24 (IST) 1 Jan 2025

सोलापुरात काँग्रेसची गळती थांबेना; माजी शहराध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी, माजी शहराध्यक्ष प्रकाश संगप्पावाले भाजपमध्ये

सोलापूर : विधानसभा निवडणुकीपासून सोलापुरात काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नाव घेईना. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी कोणतेही कारण न देता पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाची घोषणा त्यांच्या समक्ष भाजपचे आमदार विजय देशमुख यांनी एका कार्यक्रमात केली.

सविस्तर वाचा…

14:14 (IST) 1 Jan 2025

ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा वाढविण्याची मागणी

प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन ठाणे ते कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या शटलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन केली.

वाचा सविस्तर…

14:03 (IST) 1 Jan 2025

नैना प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सिडकोचे शेतकऱ्यांना आवाहन

नवी मुंबई</strong> : ११ वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सिडको महामंडळाच्या हालचालींना वेग आला आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी नैना प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या सहकार्य आणि सहभागाची गरज असल्याचे मत सिडकोने मंगळवारी प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 1 Jan 2025

सोलापूर जिल्हा बँक सेवक पतसंस्थेतही आर्थिक गैरव्यवहार, (जबाबदारी निश्चितीसाठी १८ जणांना नोटिसा)

सोलापूर : एकीकडे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या तत्कालीन ३२ माजी संचालकांवर कारवाईची कुऱ्हाड चालविली जात असताना दुसरीकडे याच बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेतही घोटाळा झाल्याचे आढळून आले आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवसह १८ जणांविरुद्ध कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. या पतसंस्थेत तीन कोटी १९ लाख १५ हजार ४५१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आक्षेप सहकार विभागाने घेऊन कारवाई हाती घेतली आहे.

13:45 (IST) 1 Jan 2025

शिधापत्रिकांची कामे रखडली, ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ आठ दिवसांपासून बंद; कामकाज ठप्प

वसई : शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मात्र मागील आठ दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) चे संकेतस्थळ बंद आहे.

सविस्तर वाचा…

13:33 (IST) 1 Jan 2025

रामकाल पथ प्रकल्पाने सिंहस्थ कामांची सुरुवात; नाशिक महापालिकेला ६५ कोटींचा निधी प्राप्त

नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचे नियोजन प्रगतीपथावर असताना शहरातील सीतागुंफा ते रामकुंड परिसरादरम्यानच्या १.३६ किलोमीटर मार्गावर रामकाल पथ विकसित करण्याच्या प्रकल्पाने या कामांची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला ६५ कोटींचा निधीही प्राप्त झाला आहे.

सविस्तर वाचा

13:33 (IST) 1 Jan 2025

नववर्ष स्वागतासाठी अंनिसचा उपक्रम; मद्य विरोधात मोफत दूध वाटप

नाशिक – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत दारु पिऊन करु नये, व्यसनांपासून दूर राहावे, हा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शहरात अनोखा उपक्रम राबविला. ‘द दारूचा नव्हे तर द दुधाचा’ हा उपक्रम नववर्षाच्या पूर्वसंध्येला राबविला गेला. या अनोख्या उपक्रमाचे नाशिककरांनी स्वागत केले.

सविस्तर वाचा

13:32 (IST) 1 Jan 2025

‘पीएमपी’ बसचालकांसाठी ‘पंचसूत्री’; ‘आयडीटीआर’चे कसे असणार प्रशिक्षण?

पुणे : वाहन चालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (आयडीटीआर) माध्यमातून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचालकांसाठी वाहतूक नियमांच्या ‘पंचसूत्री’वर आधारित प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कुशल आणि तंत्रशुद्ध वाहनचालक घडविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये रस्ते सुरक्षा धोरण, वाहतूक नियमावली, वाहनचालकाचे कर्तव्य-जबाबदारी, वाहन-प्रवाशांची सुरक्षितता, रस्ता विभक्तीकरण धोरण आणि मार्ग व्यवस्थापन आदींबाबत बसचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रवासी वाहतूक क्षेत्रात विशेषत: पीएमपी बसचालक महत्त्वाचा घटक बनला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील अरुंद रस्त्यांपासून, उपगनरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढून नियोजित ठिकाणी प्रवाशांच्या मागणीनुसार बस थांबवून बसचालकांची आठ ते दहा तास कसरत सुरू असते. त्यातच शहरातील वाहतूक नियंत्रण दिवे, विरुद्ध दिशेने येणारी वाहने आणि वर्दळीच्या रस्त्यांचा सामना पीएमपीचे बसचालक नेहमीच करतात. या गर्दीत अपघात होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. त्यातच शहरातील वाहतूक धोरण, वेळोवेळी होणारे वाहतूक बदल रस्ता विभक्तीकरण धोरण यामुळे बसचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यानुसार पीएमपीच्या बसचालकांना वाहतूक धोरणाच्या ‘पंचसूत्री’नुसार प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती ‘आयडीटीआरचे’ प्राचार्य संजय ससाणे यांनी दिली.

13:32 (IST) 1 Jan 2025

बुलढाणा: पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा, पण मित्रपक्षांचीही नजर

विधानसभेच्या निवडणुका होऊन आता एक महिन्याच्या  कालावधी लोटला असून अजूनही जिल्ह्य पालकमंत्री पदाचा तिढा कायम असून आता नवीन वर्षातच याचा फैसला होणार हे उघड  आहे. दरम्यान  जिल्ह्यात पुन्हा मोठा भाऊ म्हणून सिद्ध झालेल्या भाजपचा पालकमंत्री म्हणून भरभक्कम दावा असला तरी  दोन्ही मित्र पक्षही इच्छुक असून या महत्वाच्या पदावर नजर ठेवून आहेत. सविस्तर वाचा…

13:32 (IST) 1 Jan 2025

अवजड वाहनचालकांनाही प्रशिक्षण

पुणे : शहरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक पाहता, अवजड वाहनचालकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्या (२ जानेवारी) वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून तात्पुरते प्रशिक्षण देण्यात येणार असून, नंतर वाहनचालक प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातूनदेखील (आयडीटीआर) अवजड वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.

वाघोली येथील डंपरचालकाने बेधुंद अवस्थेत वाहन चालवून आठ जणांना चिरडल्याची घटना नुकतीच घडली. त्यात तीन जणांना जीव गमवावा लागला. या अपघातानंतर मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर प्रशिक्षित वाहनचालक मिळत नसल्याचे समोर आले. त्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनचालकांसाठी प्रशिक्षणाची गरज अधोरेखित झाली. वाहतूक पोलिसांच्या नियमावलीनुसार, मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना पहाटे सहा ते रात्री दहापर्यंत वाहतुकीस निर्बंध आहेत. त्यामुळे रात्री वाहने रस्त्यावर येतात. या वेळी सर्वच अवजड वाहनचालक नियम पाळतात असे नाही. अनेकदा चालक मद्यसेवन करतात. अनेक किलोमीटरपर्यंत सातत्याने रात्रीचा वाहन प्रवास, आठ तासांपेक्षा जास्त कालावधीत करावे लागणारे काम, अल्प मोबदला यामुळे कुशल वाहनचालकांची कमतरता आहे.

13:32 (IST) 1 Jan 2025

जळगावात दोन गटात राडा; पाळधी गावात संचारबंदी

महाराष्ट्रातील जळगाव येथे काल रात्री दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त पाळधी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
13:31 (IST) 1 Jan 2025

शाळेतच दारू आणि अनागोंदी म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस, संस्थाचालक म्हणतात

शाळा विद्यार्थी घडवण्याचे संस्कार केंद्र म्हणून समाजात आदराने या विद्यामंदिरास पाहल्या जात असते. पण याच मंदिरात दारूचे ग्लास, विद्यार्थी निरक्षर, मुख्याध्यापक बेपत्ता तर शिक्षक  सुमार असे चित्र बघायला मिळत असेल तर पालकांनी कुठे जावे, असा प्रश्न पडू शकतो. म्हणून अशा शाळा बंद कां करू नये, अशी नोटीस शिक्षण खात्याने बजावली आहे.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 1 Jan 2025
सेवागिरींच्या रथावर ८७ लाखांची देणगी अर्पण

सातारा: पुसेगाव(ता खटाव) येथील श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या रथोत्सवात भाविकांनी ८६ लाख ६२ हजार ५०० रुपये देणगी मनोभावे अर्पण केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने यांनी दिली.

दरवर्षी श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत असल्याने देणगीतही वाढ होत आहे. यंदाच्या रथोत्सवाला १२ लाख ६२ हजार २४२ रुपयांची देणगीत वाढ झाली.

13:30 (IST) 1 Jan 2025

नागपूर पोलिसांना झाले तरी काय ? चोऱ्या घरफोड्या वाढल्या…

तहसील पोलिसांनी रुग्णालय परिसरातून वाहन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड केला. चार आरोपींना अटक करून ४० वाहनांसह १३ लाख रुपयांचा माल जप्त केला. आरोपींनी नागपूरच नाहीतर वेगवेगळ्या राज्यांच्या शहरामध्ये रुग्णालय परिसरातून वाहन चोरी केले होते. सविस्तर वाचा…

13:29 (IST) 1 Jan 2025

जिल्हाप्रमुखांच्या हकालपट्टीने जळगावमध्ये ठाकरे गटाची अवस्था गलितगात्र

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची (उद्धव ठाकरे) अवस्था गलितगात्र झाल्यासारखी झाली आहे. सविस्तर वाचा…

13:28 (IST) 1 Jan 2025

पंढरपूर: पवार कुटुंबातील वाद संपून एकत्र येऊ दे ; अजितदादांच्या आईचे विठ्ठलाला साकडे

पवार कुटुंबांमध्ये जो काही वाद आहे, तो वाद संपू दे आणि पुन्हा सर्व पवार एकत्र येऊ देत, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी विठुराया चरणी केली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.

सविस्तर वाचा…

13:16 (IST) 1 Jan 2025
धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दत्तात्रय भरणेंचं सूचक विधान; म्हणाले, “मित्राने काही केलं तर नेत्याचा दोष नसतो”

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, काही आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे या घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्हात पोलिसांना शरण आलेला आहे. तर वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंनी राजीनमा द्यावा, अशी मागणी केली होती. यावर आता मंत्री दत्तात्रय भरणे भाष्य केलं आहे. भरणे यांनी म्हटलं की, “या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेला आहे. तसेच धनंजय मुंडे हे आमचे नेते आहेत, आता मित्र किंवा कार्यकर्ता प्रत्येकाचा असतो. मग एखाद्या मित्राने किंवा कार्यकर्त्याने काही केलं म्हणजे वरच्या नेत्याचा त्यात दोष असतो असं नाही. त्यामुळे यामध्ये धनंजय मुंडे यांचा काहीही संबंध नसावा”, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.

२०७ वा शौर्य दिन : कोरोगाव भीमा या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे.