Maharashtra News: आज नवीन वर्षाची (२०२५) सुरुवात झाली आहे. तसेच कोरोगाव भीमा (Koregaon Bhima Shaurya Din) या ठिकाणी आज (१ जानेवारी) २०७ वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभाला लाखो अनुयायींनी अभिवादन केलं आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे तर काही आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. तसेच खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर कराडला केजच्या न्यायालयात दाखल करण्यात आलं असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates : राज्यातील राजकीय आणि इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
पनवेलमध्ये यंदा प्रदूषण नियंत्रणात असल्याचा पालिकेचा दावा
पनवेल शहर महापालिकेने मागील वर्षी हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे वर्षाच्या शेवटी पनवेल महापालिका क्षेत्रात साडेतीनशे बांधकामे सुरू असूनही हवेतील धूलिकणांमुळे गुणवत्ता निर्देशांकाचे प्रमाण वाढले नाही, असा दावा पनवेल महापालिकेने केला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात संचारबंदी
जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात दोन जानेवारीच्या पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
खाद्यतेलाच्या दरात ३० टक्के वाढ; निर्यात शुल्क, सोयाबीन दरात वाढ झाल्याचा परिणाम
नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दर आता वधारले आहेत. सोयाबीन दरात वाढ झाल्याने आणि केंद्र सरकारने २० टक्के आयात शुल्क आकारल्याने तेलाच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Post) यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असा संकल्प केला. तसेच राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांतता-सलोखा वाढवत, पर्यावरण जपत आणि विकासासोबत आधुनिकीकरणाच्या दिशेने महाराष्ट्राला अग्रगण्य बनवण्याचे उद्दिष्ट ठेऊन सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या संकल्पांची नववर्षात पूर्तता होईल, अशी मनोकामना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच २०२५ मध्ये पाऊल ठेवताना एकता आणि दृढनिश्चयाने नवीन संधींचे स्वागत करूया. हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य, आनंद आणि भरभराटीचे जावो. २०२५ या नव्या वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक आणि आरोग्यदायी शुभेच्छा”, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देताना 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' असा संकल्प केला. राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि प्रत्येक नागरिकाच्या योगदानाने महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शांतता-सलोखा…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 31, 2024
नववर्षाच्या पहाटे नाशिकमध्ये आग; गोदामासह चार घरे भस्मसात, दोन जखमी
नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे बुधवारी पहाटे अंबड लिंक रस्त्यावर लागलेल्या आगीत गोदामासह चार घरे भस्मसात झाली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, काही आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी आणि त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करत मस्साजोग गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज मस्साजोग गावच्या गावकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात गावातील महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अजित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, “राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वास व्यक्त करतो. नवीन २०२५ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा देतो. नववर्षाचं स्वागत उत्साहानं मात्र, आरोग्यभान राखत संयमानं करा, असं देखील आवाहन करतो. महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर सुरू असलेली आपली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया”, अशा शब्दांत अजित पवारांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मंत्रिपदाचा पदाभार का स्वीकारला नाही? नाराज आहात का? मंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितलं मोठं कारण
राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अद्याप मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “मी बाहेर (परदेशात) होतो. आता पुढच्या आठवड्यात मुंबईला जाणार आहे, मी नाराज नाही. मी १० वर्ष परदेशात गेलो नव्हतो. आता कुठे गेलो तर लगेच नाराजीच्या चर्चा रंगल्या. या नाराजीच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत”, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं.