Mumbai News Updates : राज्यात बीड प्रकरणावर वादंग सुरू आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून तो सीआयडीच्या कोठडीत आहे. आता त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु, या चर्चांवर प्रतिक्रिया देऊन राजन साळवी यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यताील राजकीय बातम्यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

18:58 (IST) 2 Jan 2025

फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं…

महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. तसेच या भेटीत फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, या भेटीत फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त ७ ते १० दिवस थांबा नंतर चर्चा करु एवढंच ते म्हणाले होते. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असं काहीही बोललेले नाहीत. मी देखील तसं काही सांगितलं नाही”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

18:13 (IST) 2 Jan 2025

शेतात विजेच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू

नाशिक – शेतातील विहीरीजवळ असलेली मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील देवा वाघ (१५) हा त्यांच्या शेतातील विहीरीवरील इलेक्ट्रिक मोटार सुरु करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसला. हा प्रकार परिसरातील नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

17:58 (IST) 2 Jan 2025

जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थांचा शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध

डोंबिवली : जुनी डोंबिवलीत कल्याण डोंबिवली पालिकेकडून शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प अलीकडेच पालिकेच्या घनकचरा विभागाने सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी पसरेल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, असे प्रश्न करत जुनी डोंबिवलीतील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

वाचा सविस्तर…

17:57 (IST) 2 Jan 2025

मिरा भाईंदरमध्ये भटक्या मांजरांचे निर्बिजीकरण

भाईंदर : मिरा भाईंदर शहरात भटक्या श्वानासोबतच मांजरांचे निर्बिजीकरण प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. मागील तीन महिन्यात ७८ मांजरावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर मांजराचे निर्बिजीकरण करणारी राज्यातील पहिली महापालिका असल्याचा दावा प्रशासनाचा दावा आहे.

वाचा सविस्तर…

17:56 (IST) 2 Jan 2025

“…तर आम्हीही फोडाफोडी करू शकतो”, भाजप नगरसेवकाच्या शिवसेना प्रवेशानंतर आमदार कथोरे आक्रमक

बदलापूर : आम्हाला जर लोक फोडायचे असते तर आम्हीही बरेच घेऊ. ते उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे घेऊन नेऊ, अशा शब्दात आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

वाचा सविस्तर…

17:56 (IST) 2 Jan 2025

नववर्षाच्या पार्टीत आवाजावरून मारहाण, जखमी तरुणाचा मृत्यू

भाईंदर : मिरा रोड येथील म्हाडा गृह संकुलात आयोजित नववर्षाच्या पार्टीत गाण्याचा आवाज वाढवण्यावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. राजा परियार(२३) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रमाणे काशिमिरा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे

वाचा सविस्तर…

17:55 (IST) 2 Jan 2025

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम पोलिसांना शरण…

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील डोणगाव पोलीस ठाणे हद्दीत एका वासनांध नराधमाचा असाच विकृत कारनामा समोर आला आहे. चक्क दोन मुलांचा बाप असलेल्या या नराधमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आहे.

वाचा सविस्तर…

17:42 (IST) 2 Jan 2025

सावधान! राज्यात जलजन्य आजाराचे १४ बळी; सर्वाधिक मृत्यू अतिसारामुळे…

नागपूर: प्रतिबंधात्मक उपाययोजनेनंतरही राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य आजाराने दहा जणांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारातून हा तपशील समोर आला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू अतिसारामुळे झाले.

वाचा सविस्तर…

17:30 (IST) 2 Jan 2025

अस्तित्वहीन ‘शकुंतला’ रेल्‍वेचा वाढदिवस साजरा, दिव्यांची आरास…

आज ना उद्या ‘शकुंतला’ रेल्वे पुन्हा धावेल, या आशेतून जमलेल्या अचलपूरकरांनी नॅरोगेज ‘शकुंतला’ रेल्वेचा १११ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. १११ दिव्यांची आरास सजवून महाआरती करीत अचलपूर ते मुर्तिजापूर हा रेल्वेमार्ग पुन्हा सुरू व्हावा, अशी प्रार्थना नागरिकांनी केली.

वाचा सविस्तर…

17:19 (IST) 2 Jan 2025

करवसुलीच्या खासगीकरणाचा राज्यातील एकमेव प्रयोग फसला; अकोला महापालिकेपुढे आता…

संपूर्ण राज्यात केवळ अकोला महापालिकेत करवसुलीचे खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, हे विशेष. मात्र, हा प्रयोग फसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता अकोला महापालिकेपुढे करवसुलीचे मोठे आव्हान राहील.

वाचा सविस्तर…

17:08 (IST) 2 Jan 2025

आज नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य पुतळे उभे केले आहेत. सावित्रीबाईंची उद्या जयंती आहे. आज रात्रीच आम्ही नाशिकला त्यांना वंदन करणार. उद्या सकाळी नायगावला जाणार. दरवर्षी जातोच आम्ही. २००० सालापासून. आणि तिथे मुख्यमंत्री आणि सरकारचा वार्षिक कार्यक्रम आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केले आहेत, त्या कार्यक्रमासाठी पवार येणार आहेत. मीही तिथे आमंत्रित आहे, मी तिथे जाणार आहे. मग पिंपरी चिंचवडलाही एक कार्यक्रम आहे. त्यासाठी जाणार आहे – छगन भुजबळ

परदेशात असताना मला कोणाचेही फोन आले नाहीत. आले तरी मी तुम्हाला सांगू शकणार नाही. मी पूर्णपणे थोडावेळ राजकारणातून डोकं बाजूला काढलं होतं. बाकी आयुष्यभर राजकारण करतच आहे. ६७ सालापासून करत आहे. थोडावेळ राजकीय डोक्याला आरामही द्यावा लागतो. ते फक्त सात आठ दिवस थांबा म्हणाले होते. मंत्रि करणार असं म्हणाले नव्हते – छगन भुजबळ

वड्डेटीवार काय म्हणतात, जितेंद्र आव्हाड काय म्हणतात यावर मी काय चर्चा करू शकतो. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, म्हणून कोणाला तरी काढा असं माझ्या मनात येणं अशक्य आहे- छगन भुजबळ

16:25 (IST) 2 Jan 2025

राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये सुरू

राज्यातील पहिले ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ पनवेल शहरामधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी सुरू करण्यात आला. माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कक्ष सुरू करण्यात आला. सविस्तर वाचा…

16:24 (IST) 2 Jan 2025

नवी मुंबईत २६६ मद्यपींना दट्ट्या

नववर्षाच्या पूर्वसंध्येला २६६ मद्यपी वाहन चालकांवर तर वाहतूक नियमभंग करणाऱ्या २ हजार ३५७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ सकाळी ६ पर्यंत लावण्यात आलेल्या बंदोबस्ता दरम्यान करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

16:24 (IST) 2 Jan 2025

बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच

विकसन अर्थात बांधकाम परवानगीचे प्रस्ताव नव्या वर्षात केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. तांत्रिक अडचणीचे कारण देऊन ही प्रकरणे विकासकांच्या मागणीनुसार मनपा आयुक्तांच्या मान्यतेने ऑफलाईन स्वीकारण्यास मान्यता दिली गेली होती. नव्या निर्णयामुळे त्यावर फुली मारण्यात आली आहे. सविस्तर वाचा…

16:23 (IST) 2 Jan 2025

धुळे जिल्ह्यात वर्षभरात ४०८ जणांची आत्महत्या; पुरुषांची संख्या सर्वाधिक

२०२४ या वर्षभरात धुळे जिल्ह्यात ४०८ जणांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वाधिक ८२ टक्के पुरुषांचा समावेश असून १३४ जणांनी मानसिक तणावामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २०२४ या वर्षात जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय आत्महत्या आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल झालेल्या नोंदींचे विश्लेषण केले.

सविस्तर वाचा…

16:21 (IST) 2 Jan 2025

बांगलादेशच्या भूमीवर पुन्हा पाकिस्तानचे सैन्य… दोन अस्थिर शेजाऱ्यांमधील करार भारतासाठी डोकेदुखी ठरणार?

प्रशिक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कराकडून बांगलादेशी अधिकाऱ्यांमध्ये भारतविरोधी विचारसरणी पद्धतशीरपणे पसरविली जाईल, हे उघड आहे. दुसरीकडे पाकिस्तानी बनावटीची ‘अब्दाली’ क्षेपणास्त्रे बांगलादेशात पोहोचली तर ईशान्य भारतासाठी सर्वांत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकेल. सविस्तर वाचा…

16:21 (IST) 2 Jan 2025

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे लवकरच सुरु होणार

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. हा प्रतिक्षेत असलेले दोन्ही बोगदे नवीन वर्षात २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत, अशी माहिती पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी दिली आहे.

वाचा सविस्तर…

16:02 (IST) 2 Jan 2025

घरफोडीत साडेआठ लाखांचा ऐवज चोरीला; बालेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोडीत चोरट्यांनी साडेआठ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. सिंहगड रस्ता, तसेच बालेवाडी परिसरात या घटना घडल्या.

वाचा सविस्तर…

15:58 (IST) 2 Jan 2025

गुंगीचे शितपेय पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दापोलीत एकाला अटक

दापोली : दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला एका फार्महाउसमध्ये नेवून तिला शितपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तिचे फोटो काढून ते समाज माध्यमावर टाकण्याची धमकी देत तिच्याशी वारंवार शरिरसंबंध ठेवून तिला मारण्याची धमकी देणाऱ्या एका युवकाविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

15:58 (IST) 2 Jan 2025

पुणे महापालिका निवडणुकीदरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला राहावा : नाना भानगिरे

पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेतेमंडळी महायुतीमध्ये सहभागी होत आहे. तर आगामी कालावधीत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन, पुण्यातील ठाकरे गटाचे विशाल धनवडे, बाळा ओसवाल यांचासह अन्य तीन महिला नगरसेविका असे एकूण पाच माजी नगरसेवक येत्या पाच तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

वाचा सविस्तर…

15:49 (IST) 2 Jan 2025

मुक्त विद्यापीठात गझल संध्या, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या शुल्कात ७५ टक्के वाढ

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एकीकडे विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवते तर दुसरीकडे गझल कार्यक्रम घेऊन या अवास्तव खर्च करत असल्याची बाब समोर आली आहे.

वाचा सविस्तर…

15:37 (IST) 2 Jan 2025

नवीन वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक, दोन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब!

15:37 (IST) 2 Jan 2025

विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात चढउतार होत आहेत. आधी कडाक्याची थंडी, त्यानंतर पाऊस आणि आता पुन्हा एकदा थंडी परतली आहे. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूर येथे करण्यात आली.

वाचा सविस्तर…

15:18 (IST) 2 Jan 2025

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये तापमानवाढ; उत्तर-दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम

पुणे : शहर आणि परिसरासाठी यंदाच्या थंडीच्या हंगामातील डिसेंबर महिना वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी, तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी थंडीचा जोर कमी-जास्त होत राहिला. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या डिसेंबरच्या तुलनेत यंदा सरासरी किमान तापमान अधिक नोंदवले गेले आहे.

वाचा सविस्तर…

15:12 (IST) 2 Jan 2025

प्रदूषण करणाऱ्या दोनशेहून अधिक झोपु प्रकल्पांना नोटिसा; उल्लंघन सुरू राहिल्यास बांधकामांना स्थगिती

मुंबईतील हवेच्या ढासळता दर्जा आणि त्यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याची दखल महापालिकेपाठोपाठ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही घेतली आहे. झोपु प्राधिकरणाने यासाठी अभियंत्यांची नियुक्ती केली असून आतापर्यंत प्रदूषण करणाऱ्या दोनशेहून अधिक प्रकल्पांवर नोटिसा बजावल्या आहेत. सविस्तर वाचा

15:11 (IST) 2 Jan 2025

शेत जमिनीतील वाढते प्रदूषक रोखणाऱ्या जीवाणूंचा शोध; आयआयटी मुंबईतील संशोधकांमुळे जमीन होणार सुपीक

रासायनिक कीटकनाशके पिकांचे कीटकांपासून संरक्षण करीत असली तरी त्यांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक संसाधने प्रदूषित होत आहेत. याचा पिकांच्या वाढीवर, तसेच जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होत आहे. सविस्तर वाचा

15:10 (IST) 2 Jan 2025

कर्ज वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

एका वित्तीय कंपनीच्या वसुली एजंटकडून होणाऱ्या छळवणुकीला कंटाळून कांदिवली येथील २७ वर्षीय व्यवसायिकाने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. सविस्तर वाचा

15:10 (IST) 2 Jan 2025

गर्भाशयाच्या मुखावरील तांबी मूत्राशयाच्या पिशवीपर्यंत सरकली, शस्त्रक्रिया करून महिलेची त्रासातून मुक्तता

गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकदा महिला कॉपर – टी (तांबी) बसवितात. तांबी सुरक्षित असली तरी, त्याकडे दुर्लक्ष केल्यास ती घातक ठरू शकते. याचा प्रत्यय सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल रुग्णाला आला. सविस्तर वाचा

15:09 (IST) 2 Jan 2025

आता ५०० ऐवजी २०० प्रकल्प असल्यास विकासकांच्या संघटनेस स्वयंविनियामक म्हणून मान्यता, महारेराचा महत्त्वपूर्ण निर्णय

महारेरा नोंदणी, विकासक नोंदणीसह महारेराशी संबंधित प्रत्येक कार्यवाही आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशाबाहेरील अनेक विकासकांना दलालांची मदत घ्यावी लागते. त्यांच्या परिसरातील गृहप्रकल्पांची संख्या कमी असल्याने या विकासकांना संघटना स्थापना करता येत नाही. सविस्तर वाचा

15:08 (IST) 2 Jan 2025

बंदुकीचा धाक दाखवून दोन कोटींचे दागिने लुटणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक

महालक्ष्मीच्या सात रस्ता परिसरातील रिषभ ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दागिने खरेदीचे निमित्त करून आलेल्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून दोन कोटी रुपयांचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. सविस्तर वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह