Mumbai News Updates : राज्यात बीड प्रकरणावर वादंग सुरू आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून तो सीआयडीच्या कोठडीत आहे. आता त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु, या चर्चांवर प्रतिक्रिया देऊन राजन साळवी यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यताील राजकीय बातम्यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा
काँग्रेस पेक्षा भाजप बरी, शरद पवारांनी मोदींना साथ द्यावी, केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आवाहन !
पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार यांनी एकत्र यावे, यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, यासाठी आपण पण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.
दोन्ही पवारांनी एकत्र यावे, ही आमचीही इच्छा आहे. यापूर्वी देखील शरद पवार यांनी महायुतीत सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी आपणदेखील भाजपच्या विरोधात होतो, पण विकासासाठी भाजपला पाठिंबा दिला. काँग्रेस पेक्षा भाजप बरी त्यामुळे आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील महायुतीत सहभागी व्हावे. काँग्रेसने त्यांना पंतप्रधान केेले नाही. त्यामुळे आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी,’ असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
नाताळच्या सुट्टीत मुंबई महापालिकेला महसूल भेट
मुंबई : नाताळनिमित्त शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमध्ये भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) पर्यटकांनी गजबजली. मुलांना बागेतील प्राणिसंपदा, वनस्पती आणि विविध झाडांची ओळख व्हावी, याहेतूने बहुतांश पालकांनी राणीच्या बागेला पसंती दिली.
डोंबिवलीतील महानगर गॅसचा पुरवठा दुरुस्तीसाठी ८ जानेवारी रोजी बंद
डोंबिवली : मुख्य गॅस वाहिकेच्या दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने महानगर गॅसकडून डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा ८ जानेवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी एका पूर्व सूचनापत्राव्दारे डोंबिवली एमआयडीसीसह शहराच्या विविध भागातील सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
वीजदरवाढीची टांगती तलवार, प्रतियुनिट ४० पैसे वाढण्याची भीती; केंद्र सरकारकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न
राज्य सरकारने केंद्राकडे या सक्तीतून सुटका करण्यासाठी पाठपुरावा न केल्यास राज्यातील औष्णिक वीजप्रकल्पांसाठीही ही युनिट बसवावी लागणार आहेत.
महाराष्ट्राचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करा : शेलार
‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्याोग-व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल, असे शेलार यांनी सांगितले.
नागपूर : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन ठार
नागपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाले.तिघांनाही एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हिंजवडी आयटी पार्क ते चाकण एमआयडीसी : नव्या वर्षात सुटो उद्योगांचे ग्रहण !
हिंजवडी आयटी पार्क, चाकणसह इतर औद्योगिक क्षेत्रांत पायाभूत सुविधांची स्थिती दयनीय आहे. यामुळे उद्योगांची चोहोबाजूंनी कोंडी होत आहे. नव्या वर्षात तरी उद्योगांना लागलेले हे ग्रहण सुटावे…
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, सगळंच बाहेर येईल – सचिन खरात
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, यामुळे महाराष्ट्र हादरलेला आहे. बीड मधील नेते म्हणत आहेत बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तानसारखी केलेली आहे. परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, यानंतर वाल्मिक कराड हा फरार झाला, मग खरंच वाल्मिक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला? त्यानंतर हाच वाल्मिक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला, त्यामुळे या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत. त्यामुळे या वाल्मिक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली.
वाढत्या किमती अन् निवडणुकांमुळे घरांच्या बाजारपेठेला घरघर
देशातील ७ प्रमुख शहरांत गेल्या वर्षी ४ लाख ५९ हजार ६५० घरांची विक्री झाली. त्याआधीच्या वर्षात २०२३ मध्ये घरांची विक्री ४ लाख ७६ हजार ५३० होती. गेल्या वर्षी २०२३ च्या तुलनेत विक्रीत ४ टक्के घट झाली आहे.
कल्याणच्या विशाल गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
कल्याण : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी यांना गुरुवारी पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठीडीची आठ दिवसांची मुदत संपल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
ठाणे : तुळशीधाम येथील धर्मवीरनगर परिसरात सात वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वाल्मीक कराड, बीड पोलीस स्टेशन अन् पाच बेड… विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
संशयित आरोपी वाल्मीक कराडबाबत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय सुरक्षा आढावा बैठक सुरू
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय सुरक्षा आढावा बैठक सुरू
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 2, 2025
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त व गृह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित.
? दु. १२.५० वा. |… pic.twitter.com/o2sR04SLQY
Maharashtra Live News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक, म्हणाले…
दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष… https://t.co/IbDVZ4GO2v
— Narendra Modi (@narendramodi) January 2, 2025
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा
महायुतीत सहभागी असलेल्या आरपीआयला पुणे महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने उपमहापौरपद दिले होते. यावेळी पुणे शहराचा महापौर हा आरपीआयचा करावा अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
२० टक्के योजनेतील पाच हजार घरांचा प्रश्न
मुंबई : नाशिकमधील विकासक २० टक्के योजनेअंतर्गत म्हाडाच्या हिश्शातील घरे आणि भूखंड देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ही घरे आणि भूखंड मिळावेत यासाठी म्हाडा मागील तीन-चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. विकासकांविरोधात कारवाई करून म्हाडाने नोटिसाही बजावल्या. मात्र त्यानंतरही सुमारे पाच हजार घरे म्हाडाला मिळालेली नाहीत.
कुटुंब नियोजनावर ‘पुरुष मौन’! कुटुंब नियोजन जनजागृती पंधरवड्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ‘शून्य’
ठाणे : जिल्हा आरोग्य विभागातर्फे नुकतेच कुटुंब नियोजन जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये पुरुषांनी अधिक संख्येने सहभागी होऊन नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ” कुटुंब नियोजनावर बोलू काही ” असे घोषवाक्य असलेल्या या अभियानात पुरुष नसबंदी शास्त्रकियेची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार, कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल
वसई : वसईच्या सातिवली येथील कंपनीत काम करणार्या १६ वर्षीय मुलीवर कंपनी मालकाने सलग दोन दिवस बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी कंपनीच्या कार्यालयात आणि गच्चीवर ही घटना घडली. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पानसरे हत्या प्रकरण : प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरू ठेवायची आवश्यकत नाही
मुंबई : दोन फरारी आरोपीबाबतचा तपास वगळता कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या सर्व पैलूंनी तपास झाला आहे. त्यामुळे, दोन फरारी आरोपींच्या कारणास्तव प्रकरणाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख सुरूच ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.
चंद्रपूर : जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे वेध
चंद्रपूर : मागील तीन वर्षापासून निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगरसेवकांना २०२५ या वर्षात जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.
नागपूर महापालिकेकडून कर वसुलीसाठी दंड माफी, काय आहे योजना?
नागपूर : महापालिकेने पाण्याचे देयक थकबाकी ठेवणाऱ्याबरोबरच मालमत्ता कर थकवणाऱ्यांना देखील दिलासा देण्याचा आणि मालमत्ता कर वसुली वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मामलत्ता कर थकबाकीदारांना आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ८० टक्के माफ करण्यात येत आहे.
साताऱ्यात तीर्थक्षेत्रांवर भाविकांचा उत्सव
सातारा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील भाविकांची साताऱ्यातील मंदिरात मोठी गर्दी केली आहे. शहरातील कुरणेश्वर गणपती मंदिर, मांढरदेव, वाईचा महागणपती, सज्जनगड, गोंदवले, पालीचा खंडोबा, औंधची यमाई आदी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक देवदर्शनाने करतात. त्यामुळे राज्यभरातून भाविकांंबरोबर अनेक नामवंत कलाकार राजकीय मंडळी व इतरांनी मंदिरामध्ये उपस्थिती लावली. मंदिरामध्ये नतमस्तक होऊन भाविकांनी नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे व आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना केली. भाविकांनी जिल्हाभरात मंदिरात गर्दी केल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मांढरदेवी येथील काळुबाई मंदिरात मागील तीन दिवसांपासून मोठी गर्दी आहे. महाबळेश्वर पाचगणीला जाणारे व येणारे पर्यटक वाईच्या महागणपती मंदिर व काशी विश्वेश्वर मंदिरात आवर्जून उपस्थिती लावतात. या मंदिरात पुणे, मुंबई, गुजरात येथील भाविकांनी आज महागणपती व काशीविश्वेश्वर मंदिरात गर्दी केली होती. त्याचप्रमाणे म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिर, पाली येथील खंडोबा, औंध येथील यमाई, किन्हई येथील देवीच्या मंदिरात, पालीच्या खंडोबा मंदिरातही गर्दी आहे.
जिल्हा रुग्णालयामधून चांगल्या सुविधा द्याव्यात – प्रकाश आबिटकर
सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्ण येतात. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांच्यावर चांगले उपचार करावेत. याबाबतीत तक्रार येऊ देऊ नका, अशी सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. जिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.
शिराळ्यातील ‘जाणीव ग्रुप’तर्फे मुलांसाठी पुस्तक पेढी
सांगली : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणूस बहुआयामी घडविण्याची ताकद केवळ पुस्तकातील शब्दांवरच आहे. मुलांमध्ये मोबाइलऐवजी पुस्तकाची गोडी वाढावी यासाठी शिराळा तालुक्यातील ‘जाणीव ग्रुप’च्या माध्यमातून खास मुलांसाठी पुस्तक पेढी सुरू करून नववर्षाचे स्वागत केले. या माध्यमातून शिराळा व शाहूवाडी (जि. कोल्हापूर) या तालुक्यांतील प्राथमिक शाळेत मुलांच्या हाती पुस्तके देण्यात आली.
औदुंबर संमेलन मकर संक्रांतीवेळी; डॉ. सुनीलकुमार लवटे अध्यक्षपदी
सांगली : सदानंद साहित्य मंडळाच्यावतीने औदुंबर येथे मकर संक्रांतीवेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली ८२ वे साहित्य संमेलन होत असल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह पुरुषोत्तम जोशी यांनी बुधवारी दिली. कृष्णाकाठी असलेल्या औदुंबर या तीर्थस्थळी गेली ८१ वर्षे साहित्य संमेलन भरविण्यात येत असून, या निमित्ताने कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात येते. यंदाच्या साहित्य संमेलनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. यामुळे यंदाचे साहित्य संमेलन डॉ. लवटे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
Maharashtra Live News : धनंजय मुंडेंना काढून भुजबळांना मंत्रिमंडळात घेणार? आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
कदाचित अजित पवारांच्या शांत राहण्याने मुंडेंची विकेट काढून टीममध्ये भुजबळांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजित दादांच्या डोक्यात आहे का हा प्रश्न चार पाच दिवसांपासून पडतोय. अजित पवार मुंडेंच्या प्रकरणात अजिबात बोलत नाहीत, यामुळे भुजबळांना वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल. नाहीतर मुंडे – फडणवीसांच्या भेटीत काहीतरी झालंच असेल – विजय वडेट्टीवार, काँग्रेस, आमदार
पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाला धक्का, पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर
पुणे : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत. पुढील आठवड्यात या नगरसेवकांबरोबर काही पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता असल्याने पुण्यात शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे.
विदर्भ अॅडवान्टेज विदर्भ कार्यक्रमाचं उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. पालकमंत्री….अजून पालकमंत्री जाहीर झाले नाहीत. पण नागपूरचे पालकमत्री चंद्रशेखर बावनकुळे होणार आहेत. ते पूर्वीही पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांचं नाव तोंडपाठ झालंय.
‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी
पुणे : राजगुरुनगर भागात खाऊच्या आमिषाने दोन बालिकांवर अत्याचार, तसेच त्यांचा पिंपातील पाण्यात बुडवून खून करणाऱ्या उपाहारगृहातील कामगाराला राजगुरूनगर-खेड सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.