Mumbai News Updates : राज्यात बीड प्रकरणावर वादंग सुरू आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून तो सीआयडीच्या कोठडीत आहे. आता त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु, या चर्चांवर प्रतिक्रिया देऊन राजन साळवी यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज्यताील राजकीय बातम्यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील ताज्या बातम्या वाचा

11:11 (IST) 2 Jan 2025

ठाणे शहरात वर्षभरात आगीच्या ८०८ घटना

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात २०२४ या वर्षभरात ८०८ आगीच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश आगीच्या घटना तांत्रिक कारणांमुळे लागल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याने आग लागत असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.

वाचा सविस्तर…

10:55 (IST) 2 Jan 2025

सायबर फसवणुकीविरोधात विमा संरक्षण देण्याची मागणी, मुंबई ग्राहक पंचायतीचे अर्थमंत्र्यांना साकडे

मुंबई : एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या काळात २१ हजार ३६७ कोटींची सायबर फसवणूक झाल्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेनेच दिला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ दहा पट आहे. अशा वेळी केंद्र सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन अशा सायबर फसवणूक होणाऱ्या खात्यांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे केली आहे.

वाचा सविस्तर…

10:49 (IST) 2 Jan 2025

नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा, शनिवार पेठ पोलीस चौकीत तरुणाचा गोंधळ

पुणे : पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शनिवार पेठ पोलीस चौकीत ही घटना घडली.

वाचा सविस्तर…

10:42 (IST) 2 Jan 2025

Maharashtra News LIVE Updates : नाराजीच्या चर्चेवर राजन साळवींचं स्पष्टीकरण; पक्षांतराबाबत म्हणाले…

ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ च्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो आहोत. पराभवाचं दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्यतही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. तुमच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे. अशातऱ्हेच्या बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही.

पिकल्या आंब्यावर दगड मारले जातात. तसा प्रयत्न भाजपाकडून केला गेला असेल. माझ्याशी कोणाशीही संपर्क झालेला नाही – – राजन साळवी, माजी आमदार, शिवसेना (उद्धव ठाकरे)

एसीबीची चौकशी सुरू होती. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडून निर्णय अपेक्षित आहे. आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहितेय – राजन साळवी, माजी आमदार, शिवसेना (उद्धव ठाकरे)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह