Mumbai News Live Today : सोमवारी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा वांद्रे-कुर्ला येथील संकुलात पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारलाही लक्ष्य केलं. दरम्यान, ‘वज्रमूठ’ सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला आता भाजपाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. हा विषय आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Live News Update Today : मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना अवमान नोटीस; विकासकावरील कारवाईत निष्क्रियता दाखविल्याने उच्च न्यायालयाकडून कारवाई
पुणे: एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी भागात १३ वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या निर्घृण खून प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई: बेकायदा बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने पुन्हा फटकारल्यानंतरही महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कार्यरत होईल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
मुंबई: शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची व पदपथांची कामे सुरू असून ही कामे करताना कंत्राटदार झाडांची योग्य ती काळजी घेत नाहीत.
बुलढाणा: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहे. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘साहेब राजीनामा मागे घ्या’ च्या घोषणा दिल्या आहे.
पुणे : राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असून, त्यांच्याकडून राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातदेखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचे जाहीर केले.
कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवृत्तीबाबत शरद पवार दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
पुणे : प्रियकराच्या त्रासामुळे एका १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निवृत्तीबाबत शरद पवार दोन ते तीन दिवसांत अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये, असं माझं मत आहे. वयाच्या ८२व्या वर्षीही ते आम्हाला लाजवेल असं काम करतात. राजकारणात त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद असले तरी शरद पवारांसारखा नेता दुसरा नेता होऊ शकत नाही. हे मान्य करायला हवं. शरद पवार हे महाराष्ट्रापूरते नाही, तर देशाचे नेते आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहावरून जर त्यांनी राजीनामा दिला असेल तर हे दुख:दायी आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली.
मुंबई: जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांसाठी लवकरच चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी जाहीर केला आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. याच मागणीसाठी ठाण्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालय परिसरात उपोषणाला बसले आहेत.
कल्याण – आरोग्य विभागातील २०० हून अधिक सफाई कामगार रस्त्यावर झाडू मारण्यापेक्षा पालिका मुख्यालय, प्रभाग क्षेत्रांमध्ये अधिकाऱ्यांच्या दालनात वर्षानुवर्ष शिपाई म्हणून काम करत होते. काहीजण फेरीवाला हटाव पथकात वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. सफाई कामासाठी कामगार उपलब्ध होत नसल्याने अशा सफाई कामगारांना मूळ विभागात हजर होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सफाई कामगार मूळ विभागात हजर झाल्यानंतर प्रभागस्तरावर साहाय्यक आयुक्तांशी संधान साधून ‘सोयीचे’ काम सुरू करत आहेत. अशा सफाई कामगारांना घनकचरा उपायुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आता देश ज्या परिस्थितीतून त्याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याचा आपल्या सर्वांकडून सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे त्यांना राजकारणातून बाजुला जाऊन चालणार नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नागपूर : विदर्भात वाघांची संख्या वाढली तरी त्यांना असलेला शिकाऱ्यांचा धोका टळलेला नाही. शिकारीसाठी कधी वीजवाहिन्यांचा तर कधी विषप्रयोगाचा आधार शिकारी घेतात आणि मग वाघांच्या अवयवांची तस्करी केली जाते. अशीच एक तस्करी रोखण्यात वनखात्याला यश आले आहे. शिकार रोखता आली नसली तरीही ती करून अवयवांची विक्री करणाऱ्याला अधिकाऱ्यांनी अटक केली.
अमरावती: येथील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्या वतीने राणा दाम्पत्याच्या निषेधार्थ मंगळवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अजित पवार, रोहित पवार, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेसचे अनेक नेते सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कळवा परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करून शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण सुरू केल्याचे चित्र आहे.
बुलढाणा: राजकीय क्षेत्रात काहीही घडामोडी होवो, काहीही चर्चा सुरू असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून जावे लागेल असे मला वाटत नाही. अजित पवार मुख्यमंत्री होतील असे तूर्तास तरी शक्य नसल्याचे चित्र आहे. मात्र आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता मंत्रिमंडळ विस्तार आता २०२४ नंतरच होऊ शकतो. ही भाकिते आहेत सत्ताधारी पक्षासोबत असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांची.
वर्धा: राजकारणात दोन कट्टर राजकीय नेते जाहीरपणे भांडतात. मात्र, त्यांचे एकमेकांशी मधुर संबंध कायम असतात. मात्र आता हे पाहून संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
कल्याण – कल्याण ते माळशेज घाटमार्गे अहमदनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गातील आंबिवली ते मुरबाड या २८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण, मोजणीचे काम रेल्वे प्रशासन, शासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू झाले आहे. या कामात अडथळे आणून रेल्वेकडून जमिनीचा दामदुप्पट मोबदला मिळविण्यासाठी ग्रामस्थ, दलाल आणि काही स्थानिक अधिकाऱ्यांनी या रेल्वे मार्गात, मार्गालगत बेकायदा निवारे उभारण्याचे काम अधिक प्रमाणात सुरू केले आहे.
शरद पवारांचा राजीनामा मंजूर व्हावा यासाठी अजित पवार उतावीळ दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे.
https://twitter.com/anjali_damania/status/1653323191555866624?s=20
थोडा वेळ द्या, शरद पवारांशी बोलून निर्णय घेऊ, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या निर्णयाचा आदर करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
डोंबिवली – डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिराच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे वर्षभर मंदिराचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे.
शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्षात असणारच आहे, फक्त पदावर असणार नाही एवढंच म्हटलंय, असे ते म्हणाले.
मुंबई: गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ रहिवाशांपैकी ३०० जणांना महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी, तर उर्वरित रहिवाशांना ऑक्टोबमध्ये घरांचा ताबा देण्याची घोषणा म्हाडाच्या मुंबई मंडळाने केली होती.
एक वेळ अशी आली..घाणेरडे आरोप..प्रत्यारोप..राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्या मुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
https://twitter.com/rautsanjay61/status/1653305842391822338?s=20
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तुम्ही थांबलात, तर आम्हीही थांबतो, ज्यांना हा पक्ष चालवायचाय त्यांना चालवू देत, आम्ही अपक्ष म्हणून लढू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुंबईः ऑनलाइन पद्धतीने ‘घरातून कार्यालयीन काम’ करण्याची सुविधा असलेल्या कंपनीतील नोकरीच्या शोधात असलेल्या घाटकोपर येथील एका ३२ वर्षीय महिलेची चार लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाल्याचं बघायला मिळालं.
माहीममधील एका विकासकाच्या मालकीच्या सदनिका जप्त करण्याच्या आदेशाचे मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा केली आहे.